करोनामुळे UPSC ने देखील बदललं शेड्युल

UPSC New Schedule due to CORONA

देशातल्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्व विद्यापीठ, महाविद्यालये, शाळांमधील परीक्षा एकतर लांबणीवर पडल्या आहेत किंवा रद्द झाल्या आहेत. स्पर्धा परीक्षांची स्थितीही वेगळी नाही. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयोगाने आपल्या भरती प्रक्रियेचं वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एक नोटिफिकेशन जारी केलं आहे.

यूपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा २०१९ च्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू होणार होती. ही प्रक्रिया १७ फेब्रुवारी २०२० पासून सुरू आहे. नियोजित वेळापत्रकानुसार या परीक्षेच्या मुलाखती ३ एप्रिलपर्यंत चालणार होत्या. पण ही प्रक्रिया करोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आली आहे. २३ मार्च २०२० ते ३ एप्रिल २०२० या दरम्यान ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते, त्यांना आता नव्या तारखा देण्यात येणार आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार नाही असे आयोगाने कळवले आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप