टीईटी परीक्षा होणार आता 11 एप्रिल रोजी

TET Exam 2020 on 11 April 2020

बेळगाव – परीक्षेची तयारी पूर्ण झाली नसल्याचे कारण देत शिक्षक भरतीसाठी रविवारी (ता. 15) होणारी टीईटी पुढे ढकलली होती. मात्र, शिक्षण खात्याने आता 11 एप्रिल रोजी टीईटी घेणार असल्याचे कळविले आहे. आता 11 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता पहिला पेपर तर दुपारी दोन वाजता दुसरा पेपर होणार आहेत. परीक्षेबाबत शिक्षण खात्याच्या संकेतस्थळावर अधिकृत माहिती उपलब्ध करुन दिली आहे.

शिक्षक भरतीसाठी असलेल्या कर्नाटक  टीईटीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण खात्याने डिसेंबरमध्ये केले होते. त्याला डीएड व बीएडधारकांतून मोठा प्रतिसाद मिळाला होता. तसेच टीईटीकरीता मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. सुरवातीला टीईटी 15 मार्चला होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार संबंधित परीक्षा केंद्रावर तयारी करण्यात येत होती. परंतु, टीईटी पुढे ढकलल्याची माहिती शिक्षण खात्याने मंगळवारी दिली. तसेच ही परीक्षा 29 मार्चला परीक्षा घेण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु, वेळापत्रकात पुन्हा बदल करीत 11 एप्रिल रोजी टीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात 2014 पासून शिक्षक भरतीसाठी टीईटी घेण्यात येत आहे. अनेक शैक्षणिक जिल्ह्यात शिक्षकांच्या जागा रिक्‍त आहेत. तसेच शिक्षण खात्याकडून जागा मंजूर होऊनही सर्व जागांवर शिक्षक भरती होऊ शकलेली नसल्यामुळे टीईटी लवकर व्हावी, अशी परीक्षार्थींची अपेक्षा आहे. आता नवीन तारीख जाहीर झाल्यामुळे परीक्षार्थींमधून समाधान व्यक्‍त केले जात आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

3 Comments
 1. Swapnil u sonale says

  MAHATET 19/01/2020.

  La zaleli ahe na mag hi konti TET ahe sir plz tell me

 2. बारगळ खंडू मनोहर says

  टिईटी परीक्षा कोणती? mahatet का ?

  1. MahaBharti says

   नाही, हि कर्नाटक-TET २०२० बद्दल माहिती आहे – बेळगाव मधील मराठी वाचकांसाठी बातमी आहे…

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप