Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Tata Motors देणार नोकरीची संधी!! जाणून घ्या सविस्तर माहिती

TATA Motors Bharti 2022

TATA Motors Bharti 2022

TATA Motors Bharti 2022 : Great Opportunity to work in TATA Motors. TATA Motors gives you job opportunities. Candidates who want to work in the electric vehicle industry will be awarded an M-Tech degree. This course can be done from the Lucknow Campus of Amity University. In this, Tata Motors will give the opportunity to the graduates to work in the plant in Lucknow. Further details are as follows:-

देशातील दिग्गज ऑटोमोबाइल कंपनी असलेल्या Tata कंपनीनं सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेनं अधिक कल असलेल्या टाटा कंपनीनं आता एक उल्लेखनीय पाऊल उचललं आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

TATA Motors Recruitment 2022

  • देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक चारचाकी वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने ईव्ही तंत्रज्ञानामध्ये कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी भारतातील प्रमुख संस्था एमिटी विद्यापीठाशी हातमिळवणी केली आहे.
  • दोन्ही कंपन्यांनी एक भागीदारी करार केला असून यातून इलेक्ट्रिक वाहन उद्योगात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना एम-टेक पदवी प्रदान केली जाणार आहे.
  • एमिटी युनिव्हर्सिटीच्या लखनऊ कॅम्पसमधून हा कोर्स करता येतो. यामध्ये टाटा मोटर्स पदवीसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लखनऊ येथील प्लांटमध्ये काम करण्याची संधी देणार आहे.

कोर्समध्ये मिळणार प्रॅक्टीकल ज्ञान

  • ईव्ही तंत्रज्ञानातील एम-टेक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्ये शिकवली जातील.
  • यामुळे केवळ ईव्ही क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होणार नाही, तर देशातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कुशल मनुष्यबळही वाढेल.

दोन वर्षे आणि चार सेमिस्टरचा हा अभ्यासक्रम दोन भागात शिकविला जाणार आहे. पहिला भाग तांत्रिक अभिमुखता (Technical Orientation) असेल, ज्यामध्ये या तंत्रज्ञानाशी संबंधित सिद्धांत शिकवला जाईल. दुसऱ्या भागात प्रात्यक्षिक (practical) सत्रे असतील.

कौशल्य विकासाचा मार्ग खुला होईल

  • “टाटा मोटर्स कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे जे आमच्या भागधारकांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यास सक्षम असेल.
  • एमिटी युनिव्हर्सिटीसोबतची ही भागीदारी केवळ करिअरच्या विकासासाठीच नव्हे तर आमच्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी नवीन मार्ग उघडेल.
  • यामुळे भविष्यासाठी मनुष्यबळ तयार होण्यासही मदत होईल.”, असं टाटा मोटर्सचे अध्यक्ष आणि सीएचआरओ रवींद्र कुमार जीपी म्हणाले.

“या सहयोगी कार्यक्रमावर टाटा मोटर्ससोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. हा परस्पर फायदेशीर उपक्रम ज्ञानाच्या समृद्ध देवाणघेवाणीला प्रोत्साहन देईल आणि विद्यार्थ्यांना नवीन उद्योग कौशल्ये शिकण्याची संधी देईल”, असं एमिटी युनिव्हर्सिटीचे कुलगुरु प्रोफेसर सुनील धनेश्वर म्हणाले.


TATA Motors Bharti 2021 Details 

TATA Motors Bharti 2021 : Now a golden opportunity is available in a company of TATA, graduate candidates can apply for it. Further details are as follows:-

TATA Motors Job Recruitment 2021

आता TATA च्या एका कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध असून, पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. कोरोना संकटानंतर आता हळूहळू बहुतांश क्षेत्रे सावरताना दिसत असून, अनेकविध कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. यातच आता TATA च्या एका कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध असून, पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात, असे सांगितले जात आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

TATA Motors Recruitment 2021

Tata Motors, the country’s leading automobile company, is in the process of recruiting for senior manager positions. If you are interested in applying, you will find a link to apply online at the Business Communication Post.

TATA Motors Ltd Job Opportunity

या भरती प्रक्रियेत सहभागी असलेले उमेदवार https://careers.tatamotors.com ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या वेबसाइटवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या भरती प्रक्रियेत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र आहे. उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. Tata Motors मध्ये सिनिअर मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दिलेल्या माध्यमांद्वारे व्यवसायासाठी समग्र संप्रेषण उपाय करणे तसेच व्यवसायात भागीदारी वाढवण्याची जबाबदारी घ्यावी लागेल, असे म्हटले जात आहे.

तसेच बाह्य आणि अंतर्गत व्यक्तींशी उत्तम संपर्क ठेवून समोर येणाऱ्या संधी आणि आव्हानांसाठी सिद्ध असणे गरजेचे आहे. कंपनी आणि ब्रँडचा सकारात्मक ठसा उमटवण्यासाठी उमेदवाराला योजना आणि अंमलबजावणी करावी लागेल. संबंधित प्रवक्त्यांना मार्गदर्शन करावे लागेल, असे सांगितले जात आहे. सिनिअर मॅनेजरला ब्रँड, उत्पादन आणि व्यावसायिक यशांच्या सतत कव्हरेजसाठी योग्य संवाद दिनदर्शिका तयार करण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल. अर्जदाराने नियमितपणे कंपनी आणि उद्योगावरील अहवालांचे निरीक्षण आणि विश्लेषण केले पाहिजे.उदयोन्मुख ट्रेंडचा फायदा करून घेतला पाहिजे. तसेच व्यवसाय आणि उत्पादनांसाठी योग्य सूचना, सल्ले देणे आवश्यक आहे. वरिष्ठ व्यवस्थापकाला Tata Motors च्या उपस्थितीसह आणि महत्त्वाच्या बाजारपेठा असलेल्या शहरांवर भर देऊन देशभरातील सर्व संबंधित पत्रकार आणि प्रभावकांचा अपडेट डेटाबेस ठेवावा लागेल.

टाटा मोटर्सच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://careers.tatamotors.com करिअर पेजला भेट द्या आणि नोकरीची सूचना तपासा किंवा या पेजमध्ये दिलेली लिंक वापरा. हे तुम्हाला अर्ज पृष्ठावर घेऊन जाईल. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. अर्ज सादर करा, असे सांगितले जात आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड