10 वी, 12 वी आणि पदवीधरांसाठी SSC ची मेगाभरती

तुम्ही पदवीधर आहात आणि तुम्हाला नोकरीची चिंता सतावत आहे का ? असेल तर लवकरच ही चिंता संपणार आहे. कारण स्टाफ सिलेक्शन कमीशनतर्फे बारावी पास ते पदवीधरांसाठी १३५१ पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. SSC कमीशनमार्फत देशभरात ही नोकरभरती करण्यात येणार आहे.

 

 

या नोकरभरतीसाठी तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला यात काही आवश्यक बाबींची पुर्तता करावी लागणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे.

पदाचे नाव – वेगवेगळी पदे

पदांची संख्य़ा – १३५१

किमान वेतन – लेवल १ ते ७

परिक्षेसाठी अर्ज करण्यासाठी खुला वर्ग आणि ओबीसी वर्गातील परिक्षार्थीसाठी शंभर रुपये परिक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. इतर वर्गासाठी परिक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. भीम, य़ुपीआय, नेट बॅंकिंग, वीजा, मास्टरकार्ड, मेस्ट्रो आणि रुपे आदी माध्यमातून स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये चलनाच्या स्वरुपात परिक्षा शुल्क स्विकारण्यात येईल.

अर्ज करण्याची मुदत –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – ६ ऑगस्ट २०१९
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – ३१ ऑगस्ट २०१९
  • परिक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख – २ सप्टेंबर २०१९
  • चलनामार्फत शुल्क भरण्याची अंतिम तारीख – १४ ते १८ ऑंक्टोंबर २०१९
  • ऑनलाईन परिक्षेची तारीख – १४ ते १८ ऑंक्टोंबर

जाहिरात अर्ज करा


Leave A Reply

Your email address will not be published.