दहावीच्या ऑनलाईन परीक्षा अर्जाला मुदतवाढ

तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन परीक्षा अर्ज करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यां शिक्षण मंडळाने दिलासा दिला आहे. प्रत्यक्षात ५ नोव्हेंबरला संपणारी ही मुदत आता २० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. बोर्डाच्या या निर्णयामुळे सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२० मध्ये घेतल्या जाणाऱ्या या परिक्षेसाठी १५ऑक्टोबरपासून ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ही मुदत ५ नोव्हेंबरला संपली. या काळात नागपूर विभागामध्ये दहावीसाठी १ लाख ८ हजार ८८८ विद्यार्थ्यांनी तर बारावीच्या परिक्षेसाठी १ लाख ३९ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. असे असले तरी सुमारे ५० हजारांच्या जवळपास विद्यार्थी तांत्रिक कारणामुळे अर्ज भरण्याचे राहून गेले होते. या संदर्भात बोर्डाकडे शाळांकडून पत्रव्यवहार करण्यात आल्यावर याची दखल घेऊन शिक्षण मंडळाचे ही मुदतवाढ दिली आहे. या नुसार, नियमित शुल्कासह ५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबपर्यंत वाढविली असून विलंब शुल्कासह २१ ते ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

माध्यमिक शाळांनी १६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात चलन बँकेत जमा करून ४ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या याद्या चलनासह बँकेत जमा करण्यासाठी मुदत दिली आहे. या वाढीव मुदतीमुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या नियमित, बहि:शाल, पुनर्परिक्षार्थी, श्रेणी सुधार विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी निर्माण झाली आहे.


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !