स्टाफ सिलेक्शन परीक्षा – १३०० हून अधिक पदांसाठी मेगाभरती

SSC Recruitment 2020 Online Apply

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने फेज ८ च्या भरतीकरिता अधिसूचना जारी केली आहे. या टप्प्यात एकूण १३०० हून अधिक पदे भरली जाणार आहे. यात DEO, क्लर्क, UDC, उपनिरीक्षक, कनिष्ठ संगणक, इन्स्ट्रक्टर (स्टेनोग्राफी) लॅब असिस्टंट, ऑफिस अटेंडंट, टेक्निकल ऑपरेटर, स्टोअर कीपर पासून डायटिशीअन पर्यंत विविध पदांसाठी भरती होत आहे.

इच्छुक उमेदवारांनी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २० मार्च २०२० पर्यंत आहे. इच्छुकांना केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन (कर्मचारी निवड आयोग) च्या प्रादेशिक/उपप्रादेशिक कार्यालयांमध्ये अधिक माहितीसाठी संपर्क साधता येईल.
महत्त्वाच्या तारखा –

 • ऑनलाइन अर्ज – २१ फेब्रुवारी २०२० ते २० मार्च २०२०
 • अर्ज करण्याची अंतिम मुदत – २० मार्च २०२० रात्री २३.५९ वाजेपर्यंत
 • ऑनलाइन शुल्क भरण्याची अखेरची मुदत – २३ मार्च २०२० रात्री २३.५९ वाजेपर्यंत
 • ऑफलाइन चलान भरण्याची अंतिम मुदत – २३ मार्च २०२० रात्री २३.५९ वाजेपर्यंत
 • चलानच्या माध्यमातून पेमेंट करण्याची अखेरची मुदत – २५ मार्च २०२० (कार्यालयीन वेळेत)
 • संगणकीकृत परीक्षेच्या तारखा – १० १० जून २०२० ते १२ जून २०२०

शुल्क किती ?

शुल्क १०० रुपये आहे. महिला उमेदवार, एससी, एसटी, दिव्यांग, एक्स सर्व्हिसमेन यांना शुल्कातून सवलत देण्यात आली आहे.

पेमेंट कसे करायचे?

BHIM UPI, नेटबँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा स्टेट बँक ऑफ इंडियातून चलानच्या माध्यमातून शुल्क भरता येईल.

प्रत्येक पदाच्या कॅटेगरीसाठी वेगळा अर्ज करायचा आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Nikhil Valmik Bare says

  Stap selection madhye
  10 th pass studantsathi konti pade ahe?

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप