`या` प्रवर्गातील उमेदवारांची सोलापूर महापालिकेत भरती

Solapur Mahanagarpalika Bharti Jahirat

अनुसूचित जमाती प्रवर्गातील (एसटी) अधिसंख्य पदे भरण्यासाठी सोलापूर महापालिकेने इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. एकूण 43 जागा भरण्यात येणार असून त्यामध्ये विविध श्रेणीतील पदांचा समावेश आहे. त्यासाठीची अर्ज विक्री आजपासून (शुक्रवार) सुरु झाली असून, 27 जानेवारीपर्यंत सायंकाळी पावणेसहापर्यंत स्वीकारले जाणार आहेत. या जागांसाठीची लेखी परिक्षा 9 फेब्रुवारी 2020 रोजी होणार आहे.

म्हणून केले कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार अनुसूचित जमातीचे वैध प्रमाणपत्र न दिलेल्या कर्मचार्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. मात्र त्यांना 11 महिन्यांच्या करारावर नियुक्ती दिली गेली आहे. दरम्यान, रिक्त पदावर भरती करण्यासाठी महापालिकेने विशेष मोहिम राबविली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. अनुसूचित जमाती (एस.टी.) या प्रवर्गातील राज्यातील सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांची सेवा 31 डिसेंबर 2019 पासून थांबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र मोठ्या संख्येने असलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी त्यांना तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यांची नेमणूक देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही

बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आदिवासींच्या अधिकारांवर घाला घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 6 जुलै 2017 रोजी दिला होता. मात्र, या निर्णयाला राज्य सरकारने निवडणुका जवळ आल्याने दुर्लक्ष केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला खडे बोल सुनावत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 31 डिसेंबर 2019 पर्यंतचा वेळ दिला होता. अखेरीस सर्वोच्च न्यायालयाला 31 डिसेंबर 2019 पूर्वी या कर्मचारी अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, याचा अहवाल सादर करावयाचा असल्याने मंत्रिमंडळाने तसा निर्णय घेतला.

अधिसंख्य पदांची होणार निर्मिती

सरकारची दिशाभूल करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कशाप्रकारे कारवाई करता येईल, सेवाविषयक आणि सेवानिवृत्तीविषयक लाभांबाबत सविस्तर अभ्यास करून शासनास शिफारशी करण्यासाठी स्वतंत्र मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली आहे. खऱ्या आदिवासींना सरकारी सेवेचा अधिकार मिळावा, त्यासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जावी, ही त्यामागची भूमिका असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

या जागांसाठी होणार भरती (कंसात संख्या)

  • स्थापत्य अवेक्षक – कनिष्ठ अभियंता (3),
  • वीज पर्यवेक्षक, सहायक आरेक्षक, शिक्षण सेवक, अनुरेखक, लॅम्पलायटर (प्रत्येकी एक),
  • कनिष्ठ श्रेणी लिपीक (8),
  • मिडवाईफ, वाहनचालक व माळी (प्रत्येकी दोन), शिपाई (7)
  • आणि मजूर (3)

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी

https://mahabharti.in/solapur-mahanagarpalika-bharti-2020/


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप