शिक्षक भरतीच्या नियुक्तीत अडसर

जिल्ह्यात शिक्षक भरतीतल्या २०३ उमेदवारांच्या नियुक्तीपत्र देण्या शिक्षणाधिकारी कार्यालयाने ‘समानीकरणा’ची प्रक्रिया सुरू करून पुन्हा एकदा खोडा घातला आहे. शिक्षक भरतीत पात्र उमेदवारांचे बुधवारी समुपदेशन होणार आहे. समुपदेशनानंतर गुरुवारपासून नियुक्तीपत्र दिले जाणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, बदलीप्रक्रिया सुरू केल्यामुळे नियुक्ती अडचणीची ठरणार आहे.

राज्यात रखडेली शिक्षक भरती बेरोजगारांच्या आंदोलनानंतर निवडणुकीपूर्वी मार्गी लागली. प्रक्रियेतील पहिला टप्पा मुलाखतीशिवाय भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचे आदेश चार सप्टेंबर रोजी शिक्षण आयुक्तांनी काढले. नऊ वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती सुरू झाल्याने बेरोजगारांनी त्याचे स्वागत केले. मात्र, अद्याप शिक्षणाधिकारी कार्यालयस्तरावरून नियुक्तीपत्रे मिळालेली नाहीत. त्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रकही शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून जाहीर नाही. काही ठिकाणी समुपदेशन केल्यानंतर नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही समुपदेशन प्रक्रिया ११ सप्टेंबर रोजी होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, विद्यार्थ्यांपर्यंत तो संदेशच पोहचला नाही. त्यात ‘पवित्र पोर्टल’नुसार नवीन शिक्षक भरतीपूर्वी समानीकरणाच्या जागा खुल्या करत शिक्षणाधिकारी कार्यालयाने बदली प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे समुपदेशन आणि नियुक्तीपत्र केंव्हा हा प्रश्न कायम आहे. औरंगाबादमध्ये ‘पवित्र पोर्टल’च्या २०३ नवीन शिक्षकांची नियुक्ती होणार आहे.

प्रशासनाकडून अडचणी

रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया काही अंशी सुरू झाली. त्यात निवडक १५ उमेदवारांना शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याला आठवडा होत आला तरी राज्यातील नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. आचारसंहितेच्या कचाट्यात ही प्रक्रिया सापडू नये यासाठी राज्यातील बेरोजगारांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात पाच हजार ८२२ उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर अडचणी निर्माण केल्या जात आहेत. औरंगाबादमध्ये शिक्षक बदलीची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये विस्तारीत आणि रँडम राउंडची प्रक्रिया होत आहे. त्यासाठी २४० जागा शिक्षणाधिकाऱ्यांनी खुल्या केल्या. त्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या पात्र उमेदवारांना नियुक्ती कोणत्या शाळेवर दिली जाणार, हा प्रश्न कायम आहे. अनेकांना नियुक्ती दूरच्या शाळेत असेल असे सांगण्यात येत आहे.

Source : मटा

अन्य महत्वाचे जॉब बघा..
2 Comments
  1. Shital k says

    When second round of selection of school on pavitra portals teachers will started

  2. Vaishali says

    मी पवित्र पोर्टल वर obtion फार्म भरवा नाही तरी परत ती process सुरु होण्याची शक्यता आहे का

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !