Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सेव्हन हिल्स रुग्णालयात मोठी भरती- अनेक रिक्त पद

Sevenhills hospital Recruitment 2020

Sevenhills hospital Recruitment 2020 – सध्या  आरोग्य क्षेत्रात कोविड- १९ मुळे नोकऱ्यांच्या भरपूर संधी निर्माण झाल्या आहेत. इतक्या की नामांकित रुग्णालये समोरून ऑफर देऊनही डॉक्टर्स, नर्सेस मिळेनासे झाले आहेत. मुंबईतील अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात तब्बल ६०० डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र ही पदे भरली जात नसल्याने आता जास्त पगाराची ऑफरही रुग्णालयाने दिली आहे. या संधीचा इच्छुकांनी नक्कीच लाभ घ्यावा.

सेव्हन हिल्स रुग्णालयात तब्बल १,००४ बेड्स कोविड -१९ रुग्णांसाठी आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या रुग्णांना सेवा देण्यासाठी आरोग्य कर्मचारीही तितक्याच मोठ्या संख्येने हवे आहेत. मात्र महाराष्ट्रातून ही गरज भागत नसल्याने आता रुग्णालयाने देशपातळीवर शोधमोहिम सुरू केली आहे. रुग्णालयाच्या जाहिरातीनुसार, १०० इंटेन्सिविस्ट्स, १०० अनेस्थेटिक्स, १० नेफ्रॉलॉजिस्ट्स, ५ रेडिओलॉजिस्ट, २०० MBBS डॉक्टर्स, १०० BAMS  आणि सर्जरी डिग्रीहोल्डर्स, १०० BHMS  आणि सर्जरी डिग्रीहोल्डर्स हवे आहेत.

सध्या या रुग्णालयात १७६ डॉक्टर्स आहेत आणि आणखी ६०० डॉक्टर्सची रुग्णालयाला आवश्यकता आहे. त्यामुळे रुग्णालय नेहमीच्या वेतनापेक्षा जास्त वेतन ऑफर करत आहेत. एमडींना दरमहा २ लाख, एमबीबीएसना दरमहा ८० हजार, आयुर्वेदिक डॉक्टरांना ६० हजार तर होमिओपॅथ्सना ५० हजार रुपये दरमहा पगाराची ऑफर आहे. याशिवाय बोर्डिंग, लॉजिंग, महिन्यातील १५ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी आदी अतिरिक्त लाभही देण्यात येत आहेत.

 

सध्या असलेल्या रिक्त पदांची माहिती

  • इंटेन्सिविस्ट्स – १००
  • ऍनेस्थेटिक  – १००
  • नेफ्रॉलॉजिस्ट्स – १०
  • रेडिओलॉजिस्ट – ५
  • एमबीबीएस डॉक्टर्स – २००
  • बीएएमएस आणि सर्जरी डिग्रीहोल्डर्स – १०० ,
  • बीएचएमएस आणि सर्जरी डिग्रीहोल्डर्स – १००

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Bhujangrao vilas mohite says

    Is there Pharmasist vacancy ?

  2. Dr Kishor Bhawsar Buldhana says

    Me Dhms cch Dr aahe expriancse 15yr cha me apply.karu shakto ka

  3. Yogesh Rathod says

    Mi gavala ahe …jalgaon la tar mi aplay karu shakto ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड