सेमिकंडक्टर उद्योगात मध्ये होणार मेगाभरती! – Semiconductor Industry Jobs

Semiconductor Industry Jobs

सेमिकंडक्टर निर्मिती आणि पूरक उद्योगांमध्ये मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक वाढत आहे. चालू वर्षात या क्षेत्रात ४० ते ५० हजार रोजगारनिर्मिती होईल, तर येत्या पाच वर्षांत आठ ते दहा लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. केंद्र सरकारने नुकतीच सव्वालाख कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यात टाटासमूहाच्या ५० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचाही समावेश आहे. सेमीकंडक्टर प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक होत असल्याने २०२४मध्ये या क्षेत्रात ४० ते ५० हजार रोजगारनिर्मिती होईल, तर पाच वर्षांत दहा लाखांपर्यंत रोजगार निर्माण होतील, असे रँडस्टेंड या कामगार भरती करणाऱ्या कंपनीच्या अहवालात म्हटले आहे.

 

सेमिकंडक्टर प्रकल्पाची मागणी वाढती आहे. सेमिकंडक्टर निर्मितीसाठी पूरक इमारतबांधणी, पायाभूत सुविधांची उभारणी, चाचणी प्रणाली, संशोधन आणि विकास सुविधांच्या उभारणीसाठी तंत्रज्ञ आणि मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे सध्या या क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी असल्याचे रँडस्टँड इंडियाचे मुख्य व्यावसायिक अधिकारी येशाब गिरी यांनी सांगितले. सध्या सेमिकॉन उत्पादन आणि आऊटसोर्स सेमिकंडक्टर असेम्बलीमध्ये मागणीच्या तुलनेत कुशल मनुष्यबळ फार उपलब्ध नाही. सध्या या क्षेत्रातील चार ते १२ वर्षांचा अनुभव असलेल्यांना अधिक मागणी आहे.

 

या पदांना आहे डिमांड !
विक्री अधिकारी, फिल्ड अप्लिकेशन इंजिनिअर, इक्विपमेंट सर्व्हिस इंजिनिअर, पर्चेस मॅनेजर, सेमिकंडक्टर चिप डिझाईन, सेमिकंडक्टर फॅब्रिकेशन, असेम्बली, टेस्टिंग, मार्केटिंग आणि पॅकेजिंगसाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासेल. याशिवाय उपाध्यक्ष, संचालक, व्यवस्थापन, प्रकल्प व्यवस्थापक, उत्पादन विकसन अशा वरिष्ठ पदांसाठीही कुशल अधिकाऱ्यांची भरती केली जाईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड