जिल्हा परिषद भरती चार हजार 382 अर्ज अपात्र

Satara ZP Bharti News 2020

सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने राबवण्यात येत असलेल्या अनुसूचित जमातीच्या 69 जागांसाठी 14 हजार 454 अर्ज दाखल झाले होते. छानणीत चार हजार 382 अर्ज अपात्र ठरले असून टीईटी नसल्याने 1918 शिक्षण सेवकांना फटका बसला आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र, अपात्र उमेदवारांची यादी बुधवारी प्रसिध्द करण्यात आली असून दि. 22 जानेवारीला 17 केंद्रांवर लेखी परीक्षा होणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये विविध विभागात अनुसूचित जातीच्या 69 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. या भरतीसाठी रेकॉर्डब्रेक 14 हजार 454 अर्ज दाखल झाले होते. परिचर (शिपाई) वर्ग 4 च्या 14 पदांसाठी 8500 अर्ज, कंत्राटी ग्रामसेवक वर्ग 3 च्या सात जागांसाठी 2950 अर्ज, औषध निर्माता वर्ग 3 च्या एका पदासाठी 340 अर्ज, स्थापत्य अभियांत्रिकी वर्ग 3 च्या एका पदासाठी 625 अर्ज, शिक्षण सेवक वर्ग 3 च्या 43 पदांसाठी 2039 अर्ज दाखल झाले होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी अर्ज दाखल करुन घेण्यासाठी योग्य नियोजन केले होते. रेकॉर्डब्रेक अर्ज दाखल झाल्यानंतर त्याच्या छानणीची प्रक्रिया झाली. यामध्ये टीईटी नसल्याने 1918 शिक्षण सेवक पदासाठीचे अर्ज अपात्र झाले.

भरती प्रक्रिया दिलेल्या मुदतीत पूर्ण व्हावी यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम केले. इच्छुक उमेदवारांचे अर्ज मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. छानणी प्रक्रियेत स्थापत्य अभियांत्रिकीमधील 79 अर्ज, शिक्षण सेवकांचे 1918, कंत्राटी ग्रामसेवकांचे 789, परिचर एक हजार 551, औषध निर्माता पदासाठीचे 45 अर्ज अपात्र ठरले आहेत. लेखी परीक्षा दि. 22 जानेवारी रोजी होणार असून पात्र, अपात्र उमेदवारांची यादी बुधवारी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी दिली.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप