आरटीईतील अंतराची अट यंदा शिथिल?

RTE gap condition relaxed this time?

आरटीई अंतर्गत यंदा एकदाच लॉटरी काढण्यात येणार असून, पूर्वी असलेली अंतराची अट लावण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवेशावेळी गोंधळ होण्याची शक्‍यता आहे.

आरटीई प्रवेशात पूर्वी पहिल्या प्रतीक्षा यादीत शून्य ते एक किलोमीटर अंतरात असलेल्यांना प्रवेश दिला जात होता. त्यानंतर तीन किलोमीटर व तिसऱ्या यादीत सहा किलोमीटर अंतराच्या शाळांसाठी यादी जाहीर केली जात होती. मात्र, यंदा प्रवेश यादी एकदाच तयार होणार असल्याने ती कोणत्या प्रकारे तयार केली जाईल, याची स्पष्टता नाही. उपलब्ध जागांएवढी प्रत्यक्ष निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी व तितक्‍याच विद्यार्थ्यांची एक प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे.

प्रत्यक्ष निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत आपल्या विभागातील पडताळणी समितीकडे जाऊन मूळ कागदपत्रे दाखवून प्रवेश निश्‍चित करावयाचा आहे. शिल्लक जागांवर प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेशाची संधी दिली जाईल; परंतु ही यादी कशी बनवली जाणार? याबाबत मात्र संकेतस्थळावर कोणतीही माहिती दिलेली नसल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याविषयी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, याविषयी त्यांच्यामध्येही संभ्रमावस्था दिसली. याबाबत प्राथमिक विभागाचे शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

संकेतस्थळावरील लॉटरी लॉजिक या मेनूमध्ये केवळ लॉटरी काढण्याच्या तांत्रिक बाबींबद्दल २०१४-१५ ची माहिती देण्यात आली असून, चालू वर्षाच्या लॉटरीमधील बदल व प्रतीक्षा यादी बनवताना त्यात नेमका कोणत्या पालकांचा समावेश होणार? याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही माहिती पालकांना लवकर उपलब्ध होणे गरजेचे आहे.

सोर्स : सकाळ


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप