Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

RTE प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीला सुरुवात- ६ ते १८ मार्चपर्यंत होणार नोंदणी! | RTE Admission Alternative Link – RTE Admission 2023 @ student.maharashtra.gov.in

RTE Admission 2023

RTE Admission Registration Process 

 

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया लागू असणाऱ्या शाळांची नोंदणी प्रक्रिया ६ मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. शाळा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना अर्ज करता येणार आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी आरटीई पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन सुरु केले आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेत खासगी शाळांना ६ ते १८ मार्च या कालावधीत नोंदणी करण्याचा कालावधी देण्यात आला आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी पिंपरी विभागात ६६ आणि आकुर्डी विभागात ११५ अशा एकूण १८१ खाजगी शाळा आहेत. त्यापैकी किती शाळा आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करणार हे पाहावे लागणार आहे. नोंदणी पूर्ण केल्यानंतरच पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत.

 

पाल्यांना प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी देखील लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावेळेस देखील नवीन खासगी शाळांचा तीन वर्षांपर्यत आरटीई प्रवेश प्रक्रिया लगेच समावेश होणार नाही. या शाळांची शैक्षणिक तपासणी आणि पडताळणी पूर्ण केल्यानंतरच त्यांचा समावेश प्रक्रियेत करण्यात येणार आहे. शाळांनी नोंदणी अर्ज भरल्यानंतर, त्यांच्या कागद पत्रांच्या तपासणीसाठी गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. पडताळणी यशस्वी झाल्यावर प्रवेश घेता येईल. शाळेत कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची पडताळणी होणार नाही, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

 

RTE प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे (List of Documents For RTE Admission)

निवासी पुराव्यासाठी रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज किंवा टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक किंवा घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, भाडेकरार म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केल्याची आवश्यकता आहे. शिक्षण विभागाकडून पत्त्याची पडताळणी करण्यात येईल. जन्म तारखेचा, उत्पन्नाचा पुरावा आणि दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.

 


RTE Admission 2023 All the rounds of the RTE admission process have been completed in the month of August. However, 606 of the 4,062 seats in capacity remain vacant. Parents said it was the result of a delayed process; According to the education department, the seats remained vacant only because parents insisted on admission in certain schools. Under the Right to Free and Compulsory Education Act, 2009, children of parents belonging to economically weaker sections are admitted to 25 per cent seats in private schools. This year, the process for the academic year 2023-2024 started in January. His entry draw was drawn in March.

 

आरटीई प्रवेश प्रक्रियेतील सर्व फेऱ्यांची प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात पूर्ण झाली आहे. परंतु, तरी देखील क्षमतेच्या ४ हजार ६२ पैकी ६०६ जागा रिक्त राहिल्या आहेत. विलंबाने होत असलेल्या प्रक्रियेचा हा परिणाम असल्याचे पालकांनी म्हटले आहे; तर ठराविक शाळांमध्येच पालकांचा प्रवेश हट्ट असल्यानेच जागा रिक्त राहिल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात येतो. यंदा शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठीची प्रक्रिया जानेवारीत सुरू करण्यात आली. तर त्याचा प्रवेशाचा ड्रॉ हा मार्चमध्ये काढण्यात आला होता.

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ५४५ शाळा यंदा आरटीई प्रवेशासाठी पात्र ठरल्या असून, त्यांची प्रवेश क्षमता ४ हजार ६२ आहे. त्यापैकी ३ हजार ४५३ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. नियमित चार फेऱ्या आणि चार विशेष फेऱ्यानंतरही ६०६ जागा या रिक्त राहिल्या आहेत.दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेत ठराविक शाळांकडे पालकांचा कल अधिक असतो. अशा काही नामांकित शाळांकडून प्रवेशासाठी पालकांची अडवणूक केली जाते. त्याअनुषंगाने यंदा खबरदारी म्हणून शाळांनी प्रवेशासाठी आडमुठेपणा केल्यास कारवाईचा इशारा शिक्षण विभागाने दिला होता.

त्यामुळे प्रवेश प्रक्रिया नियमानुसार झाल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. तर विद्यार्थ्याचे प्रतिक्षा यादीत नाव असताना प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने नाईलाजास्तव पालकांनी इतर शाळांमध्ये मुलांचे प्रवेश घेतल्याचे पालकांनी सांगितले.

✅2023 RTE प्रवेशासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्र – RTE Admission 2023 Documents list


The RTE admission process is currently underway and students who have qualified in the draw were given a deadline of May 8 to confirm their admission. But the admission process could not be completed even within this deadline. Only 1965 candidates were admitted within the given time limit.
Hence, the deadline was extended till May 15 to determine the remaining admissions. This deadline is Monday, While ending on May 15, now again for the third time due to lack of response and due to technical difficulties, the deadline has been extended till May 22 and since the draw, this is the third time extension for admission.

‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी बालकांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. मे महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल, अशी आशा पालकांना होती. परंतु प्रत्यक्षात प्रवेशाची प्रक्रिया सुरु न झाल्याने आरटीई पात्रांची प्रवेश निश्चिती कधी करणार? अशी विचारणा पालक आता करू लागले आहेत. आता आरटीई प्रवेशासाठी २२ मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

शहरातील स्वयंअर्थसहाय्यित, खासगी विनाअनुदानित आणि खासगी कायम विनाअनुदानित शाळांतील २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना ‘आरटीई’ अंतर्गत मोफत शिक्षण दिले जाते. या वर्गातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, हा यामागे उद्देश आहे.

मागील महिन्यात उशिरा म्हणजे ५ एप्रिलला आरटीई सोडत काढण्यात आली आहे. तर १३ एप्रिलपासून बालकांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी सुरवात केली होती. त्यानुसार ५ मेपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत दिली होती. मात्र, पहिल्या दिवसापासूनच आरटीईचे पोर्टल बंद पडल्याने पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यात अडचणी उद्भवत होत्या. परिणामी आरटीई अंतर्गत  प्रवेश घेता यावेत, यासाठी शिक्षण विभागाने ८ मेपर्यंत मुदत वाढवून दिली होती. त्यास पुन्हा १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, अनेक बालकांचे प्रवेश अद्यापही निश्चित झाले नाहीत. त्यामुळे आता आरटीई प्रवेशासाठी २२ मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

वाढीव मुदतीतील दाखले ग्राह्य धरणार

याप्रकरणी कागदपत्रांची तपासणी करणे व प्रवेश निश्चितीकरीता २२ मेपर्यंतच्या वाढीव मुदतीच्या कालावधीतील दाखले (कागदपत्रे) ग्राह्य धरण्यात यावेत. तद्नंतर या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या प्रतिक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाला सुरवात होणार आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले


RTE Date Extend

RTE Admission 2023 New Update: The RTE admission lottery was announced on 5th April, after which the actual admission process started from 13th April. However, many parents faced difficulties in getting admission as RTE’s website was not working properly. The Directorate of Primary Primary Education has once again extended the deadline till May 15 for admission to 25 percent reserved seats of RTE admissions in private schools. Director of Education Sharad Gosavi has appealed to parents to take admission in term extension.

खाजगी शाळांतील आरटीई प्रवेशाच्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पुन्हा एकदा १५ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुदत वाढीत पालकांनी प्रवेश घेण्याचे आवाहन शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केले आहे.

RTE प्रवेश संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आरटीई प्रवेशाची लॉटरी ५ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली होती, त्यानंतर प्रत्यक्षांत प्रवेशाची प्रक्रिया ही १३ एप्रिलपासून सुरू झाली. मात्र आरटीईचे संकेतस्थळ नीट चालत नसल्याने असंख्य पालकांना प्रवेश घेण्यासाठी अडचणी आल्या होत्या. त्यामुळे शिक्षण संचालकांनी हे प्रवेश घेण्यासाठी सोमवारी, ८ मे पर्यंत मुदत दिली होती. मात्र त्यानंतरही हजारो जागांवरील प्रवेश अद्यापही होऊ शकले नसल्याने पुन्हा एकदा १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे

प्रवेशाची आकडेवारी

नोंदणीकृत शाळा ८८२३
एकूण जागा १०९८४६
आलेले अर्ज ३६४४१३
प्रवेश जाहीर ९४७०० – झालेले प्रवेश ४९९६६ –
रिक्त जागा : ५१८८०

यादरम्यान शाळांनी प्रलंबित प्रवेशाच्या तक्रारी, अपील अर्जाची , सुनावणी घेत त्यासाठीचे सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे आदेशही संचालकांनी शाळांना दिले आहेत.

राज्यातील ८ हजार ८२३ शाळांमध्ये १ लाख १ हजार ८४६ आरटीई प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत ४९ हजार ९६६ जागांवर प्रवेश निश्चित झाले असून उर्वरित तब्बल अर्ध्याहून अधिक म्हणजेच ५१ हजार ८८० जागांवर प्रवेश होऊ शकले नाहीत. त्यामुळे पालकांनी मुदतीत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केले.

‘आरटीई’चे पर्यायी संकेतस्थळ : https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

 

RTE Admission 2023

RTE Admission 2023 – The date for RTE admission has been extended and admissions can now be done till May 8. This letter of extension has been issued by Director of Primary Education 5 Sharad Goswami on Monday (24th). So now the parents have got the same relief. An online lottery was held on April 5 itself to provide 25 percent free admission to children from weaker sections under RTE. After that SMS was sent to the parents from 12th April. Due to this, the attention of all parents is towards mobile. 863 parents of Ashat district received ‘Good News’ through mobile SMS. The period for determining admission was given from 13th to 25th April. But since this period is short for admission, on Monday (24th), the deadline for admission has been extended to May 8.

 

आरटीई प्रवेशासाठी तारीख वाढविण्यात आली असून, ८ मेपर्यंत आता प्रवेश घेता येणार आहेत. मुदतवाढीचे हे पत्र प्राथमिक शिक्षण 5 संचालक शरद गोस्वामी यांनी सोमवारी (दि. २४) काढले आहे. त्यामुळे आता पालकांना तेवढाच दिलासा मिळाला आहे. आरटीईअंतर्गत दुर्बल घटकातील मुलांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी ५ एप्रिल रोजीच ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली. त्यानंतर १२ एप्रिलपासून पालकांना एसएमएस पाठविण्यात आले. यामुळे सर्वच पालकांचे लक्ष मोबाइलकडे लागून होते. अशात जिल्ह्यातील ८६३ पालकांना मोबाइल एसएमएसच्या माध्यमातून ‘गुड न्यूज’ मिळाली. प्रवेश निश्चित करण्याचा कालावधी १३ ते २५ एप्रिलदरम्यान देण्यात आला होता. परंतु हा कालावधी प्रवेशासाठी अल्प असल्यामुळे सोमवारी (दि. २४) पत्र काढून प्रवेशाची मुदत वाढवून ८ मे देण्यात आली आहे.

या कालावधीत आरटीईअंतर्गत प्रवेश घेणाऱ्या लोकांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांनी केले आहे. आता या पालकांना कागदपत्रांची पडताळणी करून मिळालेल्या शाळेत प्रत्यक्ष प्रवेश करावयाचा आहे. म्हणजेच, आता त्यांची प्रवेशासाठी लगबग वाढणार आहे.

शिक्षणापासून एकही मूल वंचित राहू नये, यासाठी शासनाने शिक्षणाचा सक्तीचा अधिकार आणला आहे. याअंतर्गत गरजू-गरीब घटकातील मुलांनाही इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेता यावे, यासाठी २५ टक्के जागांचे आरक्षण करण्यात आले आहे. मात्र, यासाठी पालकांना अर्ज करावे लागत असून, लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या शैक्षणिक सत्रासाठी जिल्ह्यातील १३१ शाळांमध्ये ८६४ जागा आरक्षित असून, त्यासाठी ३९५९ अर्ज आले आहेत.
६२ प्रवेश झाले निश्चिंत संपूर्ण राज्यासाठी ५ एप्रिल रोजी लॉटरी काढण्यात आली. अशात पालक आपल्या मुलांचा नंबर लागतो की नाही, यासाठी एसए- मएस’ची वाट बघत होते. मात्र, हे एसएमएस १२ एप्रिलपासून पाठविण्यात आले आहे. जिल्ह्याला ८६४ जागा आरटीईअं- तर्गत भरावयाच्या असून, यातील ६२ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. आता मुदत वाढ झाल्याने पालकांना थोडा आधार मिळाला आहे. वेळेच्या आत आपल्या पाल्यांचे प्रवेश करता येईल.


RTE Admission 2023: The website for admission to 25 percent reserved seats under the Right to Education Act (RTE) is continuously being closed. Therefore, the primary education department has now made available an alternative website for the admission of children. According to RTE, 25 percent reserved seats are given to students from economically weaker and disadvantaged sections in private schools. Online admission process was implemented by the Primary Education Department for admission to these seats

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे संकेतस्थळ सातत्याने बंद पडत आहे. त्यामुळे बालकांच्या प्रवेशासाठी आता प्राथमिक शिक्षण विभागाने पर्यायी संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. आरटीईनुसार खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. RTE प्रवेश संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या बालकांच्या अर्जातून ऑनलाइन सोडत काढण्यात आली. यामध्ये ९४ हजार ७०० बालकांची प्रवेश देण्यात आला. या निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी पालकांना बुधवारपासून ‘एसएमएस’ जाण्यास सुरूवात झाली, परंतु दरम्यान आरटीई पोर्टलची तांत्रिक यंत्रणा कोलमडली.

 

पालकांमधील गोंधळाची दखल

आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या बालकांच्या प्रवेशासाठी बुधवारी दुपारी चार वाजल्यापासून पालकांना एसएमएस जाण्यास सुरवात झाली. पण प्रवेशाचे संकेतस्थळ बंद पडल्याने आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला की नाही, हे पालकांना संकेतस्थळावर पाहता येत नव्हते. परिणामी पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण झाले. त्याची दखल घेत अखेर शिक्षण विभागाने प्रवेशाची माहिती पाहण्यासाठी पर्यायी संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.

पालकांसाठी सूचना…

  • प्रवेशासाठी निवड झाल्यानंतर संबंधित पालकांना एसएमएस पाठविणार.
  • पालकांनी आरटीई पोर्टलवर अर्ज क्रमांकांची स्थिती तपासून पहावी.
  • प्रवेश मिळाल्याचा संदेश प्राप्त झाल्यावर अॅलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी
  • अॅलॉटमेंट लेटरवर पडताळणी समितीचा पत्ता असेल तेथे जाऊन आवश्यक कागदपत्रांची पू्र्तता व पडताळणी करून घ्यावी
  • त्यानंतर प्रवेश निश्चित झाल्याची प्रिंट पडताळणी समितीकडून करून घ्यावी.
‘आरटीई’चे पर्यायी संकेतस्थळ : https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

RTE Lottery Date 2023 – https://student.maharashtra.gov.in/

RTE Admission 2023 Another Link: RTE Lottery Date is published now. The candidates can check the lottery from this page. The link is given below. The lottery will be published on 5th April 2023. alternative link system has now been made available by the Education Department to apply for Free and Compulsory Education (RTE) admission process for children. It has been clarified through the education department that if there are any difficulties in filing the application from the link on the main portal, the parents can file the application from this link.

‘RTE’ प्रवेशासाठी प्राप्त अर्जांची सध्या पडताळणी सुरु आहे. काही दिवसात ते काम पूर्ण होईल. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रवेशाची लॉटरी काढली जाईल. त्यानंतर प्रवेश कितीजणांनी घेतले हे पाहून प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी दिली जाणार आहे.

 

प्रवेश निश्चित करण्यासाठी संबंधित शाळेत जाताना पालकांनी त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, मुलाचे आधारकार्ड, अशी प्रवेश अर्जावेळी भरलेल्या माहितीनुसार सर्व कागदपत्रे घेऊन जावी लागतील. तसेच खुल्या प्रवर्गातील एसईबीसी प्रवर्गातील मुलांसाठी एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा पालकांचा उत्पन्न दाखला लागतो. दरम्यान, प्रवेश निश्चित झालेल्या म्हणजेच लॉटरीत नंबर लागलेल्या मुलांच्या पालकांच्या मोबाईलवर मेसेज येणार आहेत.

 

RTE Lottery Date – RTE Admission 2023 @ student.maharashtra.gov.in

पुण्यात ६६ हजार अर्ज Pune RTE Admission 2023 
आरटीईअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ९३६ शाळांमध्ये रिक्त असलेल्या १५ हजार ६५५ जागांसाठी ६६ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. नाशिक ४,८५४ रिक्त जागांसाठी १८ हजार १३०, तर सातारा जिल्ह्यात १,८२१ जागांसाठी ३८२६ अर्ज आले आहेत.

लवकरच लाॅटरीची तारीख जाहीर हाेणार RTE Lottery Result 2023

ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर ऑनलाइन साेडत लाॅटरी काढण्याकरिता तारीख निश्चित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व रिक्त जागांसाठी एकाच टप्प्यात लाॅटरी काढून शाळांमध्ये आरटीई अंतर्गत रिक्त जागांएवढी प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. लाॅटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेसा कालावधी देण्यात येणार आहे.

 

बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण (आरटीई) प्रवेशप्रक्रियेत अर्ज दाखल करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत आता पर्यायी लिंकची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्य पोर्टलवरील लिंकवरून अर्ज दाखल करण्यात अडचणी येत असल्यास पालकांना या लिंकवरून अर्ज दाखल करता येणार असल्याचे शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

RTE प्रवेश संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

‘आरटीई’अंतर्गत प्रवेशासाठी पालकांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झाली होती. त्यासाठी १७ मार्चपर्यंत मुदत असून, राज्यभरातून या प्रवेशप्रक्रियेला पालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दहा दिवसांतच या प्रवेशांसाठी राज्यभरातून एक लाख एक हजार ९६९ जागांसाठी दोन लाखांवर प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत.

राज्यभरातून सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे मूळ पोर्टलवरील अर्ज दाखल करण्याच्या student.maharashtra.gov.in लिंकला अनेक समस्या येत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन साइट संथ असल्यास पुन्हा अर्ज भरण्याचा प्रयत्न करण्याची सूचनाही शिक्षण विभागामार्फत देण्यात आली होती. परंतु, गेल्या काही दिवसांत समस्या अधिकच वाढल्याने अनेक पालकांनी पैसे खर्च करून इंटरनेट कॅफेमध्ये अर्ज भरण्यास प्राधान्य दिले.

या समस्यांमुळे वैतागलेल्या पालकांनी ही सुविधा सुरळीत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आरटीई प्रवेश अर्जांसाठी rte25admission.maharashtra.gov.in ही पर्यायी लिंकही उपलब्ध करून देण्यात आली आहे. १७ मार्चला मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पालकांना मूळ पोर्टल किंवा नव्याने उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर अर्ज दाखल करता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज कुठे करणार?

यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत 8 हजार 827  शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 926 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज आणि प्रवेश प्रक्रिया, कागदपत्रांबाबतची माहिती https://student.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

…तर अर्ज बाद होणार

प्रवेश प्रक्रियेसाठी लॉटरीसाठी अर्ज विचारात घेतला जावा यासाठी अनेक पालक एकापेक्षा अधिक अर्ज भारतात. मात्र, यंदापासून एकहून अधिक अर्ज भरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याचे एकापेक्षा अधिक अर्ज भरले असल्याचे निदर्शनास आल्यास त्याचा अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, हे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

लॉटरी कधी निघणार?

ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑनलाईन लॉटरीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. 25 टक्के आरक्षणातंर्गत जागांसाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार आहे. शाळेतील जागांनुसार प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात येईल. लॉटरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना कागदपत्रे घेऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

आरटीईसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे

आरटीईसाठी अर्ज निवासी पुराव्यात ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यातील एका पुरावा ग्राह्य धरता येण्यार आहे. या शिवाय जन्मतारखेचा पुरावा, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय पुरावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्गातून येत असल्याचा वार्षिक उत्पन्नाचा पुरावा, अनाथ बालकांची आवश्यक प्रमाणपत्रे, विधवा/ घटस्फोटीत महिला असल्याचा पुरावा अशी विविध कागदपत्रे ही प्रवेशाच्या वेळी पालकांना सादर करावी लागणार आहेत.

 

RTE Admission 2023-24

RTE म्हणजेच शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराअंतर्गत कोणत्याही प्रवर्गातील पालकांना आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. सरकार कडून हि खास शिक्षणाच्या अधिकारातली योजना आहे. सर्वाना शिक्षकानं मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे.

Name of the Registration Maharashtra RTE Admission
Authority School Education and Sports Department, Maharashtra
State Maharashtra
Year 2023-24
Act Right To Education or RTE
Purpose Free School Education to Underprivileged Students in Private Schools
Beneficiaries Underprivileged students up to Class 8
Reservation 25%
Academic Session 2023-2024
Application Mode Online
Application Started  20 February 2023
Last Date to Apply March 2023
Selection Procedure Lottery पद्धती

List Documents for RTE Admission 2023 – अर्जासाठी कागदपत्रं

List of Documents For RTE Admission are given below.

RTE प्रवेश प्रकीरियेत सहभागी होण्यासाठी आपण खालील डॉक्युमेंट्सची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  • ओळखीचा पुरावा म्हणून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आवश्यक आहे.
  • पालकांच्या पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, गॅसचे बुक, भाडेपट्टी, लाईट बिल,पाण्याचे बील इत्यादी कागदपत्र वापरू शकतात
  • आरक्षित संवर्गातून अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे
  • आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांचे 1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्याचे जन्म दाखला असणे आवश्यक आहे
  • विद्यार्थी अपंग असल्यास अपंग असल्याचा पुरावा

20 फेब्रुवारी 2023 पासून RTE प्रवेश सुरु होण्याची अपेक्षा आहे. पुढील सर्व अपडेट्स साठी महाभ्रतीला भेट देत रहा.

Age Criteria, Limit For RTE Admission 2023 Maharashtra

Age Limit For RTE Admission 2023 Maharashtra

RTE Admission 2023 district wise Maharashtra

District RTE Schools RTE Vacancy
Ahmadnagar 364 2825
Akola 190 1946
Amravati 236 2305
Aurangabad 546 4069
Bhandara 89 763
Bid 225 1827
Buldana 227 2246
Chandrapur 186 1503
Dhule 93 1006
Gadchiroli 66 462
Gondiya 131 864
Hingoli 75 539
Jalgaon 282 3122
Jalna 284 2273
Kolhapur 325 3270
Latur 200 1669
Mumbai 272 5202
Mumbai 65 1367
Nagpur 653 6577
Nanded 232 2251
Nandurbar 45 340
Nashik 401 4854
Osmanabad 107 877
Palghar 266 5483
Parbhani 155 1056
Pune 936 15688
Raigarh 264 4256
Ratnagiri 92 929
Sangli 226 1886
Satara 211 1712
Sindhudurg 49 287
Solapur 295 2320
Thane 628 12270
Wardha 111 1111
Washim 99 786
Yavatmal 194 1940
Total 8820 101881

RTE Admission 2023 Online Application @ student.maharashtra.gov.in

RTE Admission 2023: The latest update for RTE Admission 2023. As per the latest news, Out of the total number of RTE seats in Nagpur district for students from economically weaker sections, two thousand seats are vacant. Further details are as follows:-

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आरटीईच्या नागपूर जिल्ह्यातील एकूण जागांपैकी दोन हजार जागा शिल्लक राहिल्या आहेत. गेले काही महिने आरटीईची प्रक्रिया राबविल्यानंतरही या जागा भरल्या गेल्या नाहीत.

  • नागपूर जिल्ह्यात ६६३ शाळांनी आरटीईअंतर्गत नोंदणी केली आहे.
  • या शाळांमधील ६ हजार १८६ शाळा या आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
  • या जागांवर प्रवेश घेण्यासाठी एकूण ३१ हजार ४११ विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज केले होते.
  • या अर्जांची पडताळणी शिक्षण विभागाद्वारे करण्यात आली.
  • या पडताळणीनंतर ६ हजार १०६ विद्यार्थ्यांची आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी निवड झाली.
  • विद्यार्थ्यांना त्यासंदर्भात मोबाइल संदेशही पाठविण्यात आले.
  • या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विविध प्रवेश फेऱ्या राबविण्यात आल्या.
  • या प्रवेश फेऱ्यांतून आजवर केवळ ४ हजार १३३ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत.
  • याचा अर्थ उर्वरीत २ हजार ५३ जागा अद्यापही रिक्त राहिल्या आहेत.

अर्जप्रक्रियेदरम्यान, ३१ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले असले तरी प्रत्यक्षात जागा रिकाम्या राहिल्या आहेत. राज्यातही एक लाखांहून अधिक जागांसाठी २ लाख ८२ हजार अर्ज आले होते. त्यासाठी ९० हजार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यातही ६२ हजार ६४९ विद्यार्थ्यांनीच आपले प्रवेश निश्चित केले आहेत. पसंतीच्या शाळा न मिळणे, अर्ज फेटाळले जाणे, अशा विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांनी आरटीई प्रक्रियेद्वारे प्रवेश न घेतल्याचे सांगण्यात येत आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

11 Comments
  1. MahaBharti says

    RTE New Update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड