Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पदवीधरांसाठी नोकरीची संधी – पश्चिम रेल्वेत भरती

RRC Railway Recruitment 2020

RRC Railway Recruitment 2020: भारतीय रेल्वेत पदवीधरांसाठी नोकरीची संधी आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC) ने पश्चिम रेल्वेत ज्युनिअर टेक्निकल असोसिएटच्या विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी rrc-wr.com या संकेतस्थळावर नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे.

Western Railway

या भरतीचे तपशील, नोटिफिकेशन, अर्ज आणि संकेतस्थळाच्या लिंक्स आदी माहिती पुढे देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे भरती २०२०

पदांची माहिती

  • ज्युनिअर टेक्निकल असोसिएट (वर्क्स) – १९ पदे
  • ज्युनिअर टेक्निकल असोसिएट (इलेक्ट्रिकल) – १२ पदे
  • ज्युनिअर टेक्निकल असोसिएट (टेलिकम्युनिकेशन / एस अँड डी) – १० पदे
  • एकूण पदे – ४१

अर्जांची माहिती

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. अर्जाची लिंक पुढे देण्यात येत आहे.

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – २४ जुलै २०२०
  • ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अंतिम मुदत – २२ ऑगस्ट २०२०

अर्ज शुल्क

  • एससी, एसटी, ओबीसी, महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५० रुपये शुल्क आहे.
  • सर्वसाधारण गटासाठी अर्जाचे शुल्क ५०० रुपये आहे. प्रक्रियेत पात्र झाल्यास आणि पर्सनालिटी / इंटेलिजन्स टेस्टमध्ये सहभागी झाल्यानंतर शुल्क परत केले जाणार आहे.

आवश्यक पात्रता

  • मान्यता प्राप्त संस्था / विद्यापीठातून संबंधित इंजिनीअरिंग स्ट्रीममधून तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा बीएससी किंवा चार वर्षांची पदवी (बीई / बीटेक) आवश्यक.

वयोमर्यादा

  • उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे तर कमाल वय ३३ (सामान्य), ३६ (ओबीसी) आणि ३८ (एससी, एसटी)

निवड प्रक्रिया

  • योग्य उमेदवारांची निवड पर्सनालिटी / इंटेलिजन्स टेस्ट च्या आधारे होणार आहे.

संपूर्ण माहिती करिता येथे क्लिक करा – https://mahabharti.in/western-railway-recruitment-2020/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Kajal Rajendra Andhale says

    12 th science pass ahe mala ha job gayu shakoto ka

  2. Saiprasad ganesh naikwade says

    Sir l am 12 pass and 60per marks any job

  3. Priyanka says

    Dear,
    Sir/Mam
    Form apply sathi link ka nhi deta fkt information sathi aste

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड