तरुणांनो खुशखबर ! ‘एमपीएससी’ची पाच टप्प्यात भरती

Recruitment of MPSC in Five Stages

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यावर्षी पोलिस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी, टंकलेखक, राज्य उत्पादन शुल्क या विभागांमधील पदांच्या भरतीचे नियोजन केले आहे. त्यानुसार पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा कधी होतील, जाहिरात कधीपर्यंत प्रसिध्द होईल याचेही नियोजन करुन अर्थ विभागाला सादर केले आहे. मात्र, वनसेवा परीक्षा, टंकलेखक, राज्य उत्पादन शुल्क व कर सहायक पदांसाठी शासनाने मागणीपत्र न दिल्याने या विभागांची भरती लांबणीवर पडणार आहे.

राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 5 एप्रिलला तर मुख्य परीक्षा 2, 3, 4 ऑगस्ट 2020 मध्ये घेतली जाणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्यायदांडाधिकारी प्रथम वर्गची पूर्वपरीक्षा 1 मार्चला तर मुख्य परीक्षा 14 जूनला घेण्याचे नियोजन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केले आहे. राज्य परिवहन विभागात मोठ्या प्रमाणावर सहायक मोटार वाहन निरीक्षकांची पदे रिक्‍त असून या पदांची भरतीही केली जाणार आहे. 15 मार्चला या पदांसाठी पूर्वपरीक्षा होणार असून 12 जुलैला मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. महाराष्ट्र दुय्यमसेवा संयुक्‍त पूर्वपरीक्षा 3 मे रोजी होणार असून मुख्य परीक्षा घेण्याचेही नियोजन ठरले आहे. या विभागाकडून आयोगाला मागणीपत्र प्राप्त झाले असून या पदांच्या भरतीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, वनसेवा परीक्षेचे नियोजन करुनही मागणीपत्र नसल्याने ही प्रक्रिया थांबली आहे. अभियांत्रिकी सेवा संयुक्‍त पूर्वपरीक्षा 17 मे रोजी घेण्याचे नियोजन आहे, परंतु, मुख्य परीक्षेचे नियोजन ठरलेले नाही.

मागणीपत्राअभावी नियोजन ठप्प 

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2020, पेपर क्रमांक दोन (लिपीक- टंकलेखक), दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा पेपर क्र. दोन, कर सहायक मुख्य परीक्षा पेपर क्र. दोन आणि महाराष्ट कृषी सेवा परीक्षांचे नियोजन ठप्प आहे. संबंधित विभागांनी मागणीपत्र न दिल्याने याचे नियोजन झाले नसल्याचे अव्वर सचिव राजेंद्र वाघ यांनी सांगितले.

सोर्स : सकाळ


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Vasave prabhakar dhedya says

  एमपीएससी ची आयडी पासवर्ड विसरून गेला आहे तर ते पोर्टल कडुन कसे मारावे।

  1. Prachita Z says

   या लिंक वरून आपण पासवर्ड रिकव्हर करू शकता :

   https://mahampsc.mahaonline.gov.in/Account/login/ResetPassword.aspx

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप