करोनाच्या संकटातही ‘मेगा भरती’ची संधी, लाखोंना मिळणार रोजगार

Read the news, if you want to work in the Amazon

करोनातही संधी शोधणाऱ्या कंपन्यांमध्ये आता एमेझॉनची भर पडली आहे. एमेझॉनवर ऑनलाईन वस्तु खरेदीवर वाढत्या मागणीमुळे आता करोनाचा उलटा फटका बसत असल्याने एमेझॉनने एक मोठा निर्णय घेतला आहे. एमेझॉनने जगभरात वाढत्या ऑनलाईन मागणीमुळेच अतिरिक्त मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एमेझॉनच्या अनेक ठिकाणच्या डिलिव्हरी रखडण्यावर करोनाचा परिणाम झाला आहे. एमेझॉनच्या प्राईम डिलिव्हरी सेवेवरही याचा परिणाम झाला आहे.

एमेझॉन आपल्या वेअर हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. एकुण १ लाख वेअरहाऊस वर्कर्सची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या कामगारांमध्ये एकुण ३५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणुक करण्याचेही एमेझॉनमार्फत जाहीर करण्यात आले आहे. डिलिव्हरी ऑपरेशन, अंतर्गत सेंटर्स आणि रिटेल स्टोअर्स अशा कामांसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे पैसे गुंतवण्यात येतील असे एमेझॉनने स्पष्ट केले आहे. सध्याच्या वेतनामध्ये २ डॉलरने वाढ केली आहे. तर युरोपियन देशात २ युरोची प्रति तास अशी वाढ करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या घरापर्यंत सेवा पुरवणे हे एक सोशल डिस्टन्सिंगचे महत्वाचे माध्यम आहे. त्यामुळेच जगभरातून ऑनलाईन खरेदीमध्ये वाढ झाली असल्याचे एमेझॉनचे जगभरातील ऑपरेशनचे प्रमुख डेव्ह क्लर्क यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र सरकार मेगा भरती २०२० पूर्ण माहिती 

जगभरात एमेझॉनच्या कर्मचाऱ्यांची संख्या ही ९ लाखांपर्यंत वाढवण्याचा एमेझॉनचा मानस आहे. सध्या एमेझॉनचे ७ लाख ९८ हजार इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱी आहेत. जगभरात हॉस्पिटॅलिटी, रेस्टॉरन्ट, पर्यटन यासारख्या व्यवसायातील नोकऱ्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच लोकांकडून आमच्या या पुढाकारासाठी मदत करण्यात येईल, तसेच आमच्या टीमशी जोडले जातील असेही त्यांनी सांगितले. आमच्या सध्याच्या डिलिव्हरी सिस्टिममध्ये दिरंगाई होत असल्याचे त्यानी मान्य केले आहे. एमेझॉन फ्रेश या सेवेत किरणा मालाची डिलिव्हरीत मोठी वाढ झाल्यानेच काही काळासाठी ही सेवा खंडित झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ऍमेझॉन मध्ये नोकरी कशी मिळवाल ?

अॅमेझॉनमध्ये (Amazon) नोकरी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते. अॅमेझॉन या कंपनीत काम मिळावे यासाठी अनेक तरुण प्रयत्नशिल असतात. मात्र, तुम्हाला अॅमेझॉनमध्ये काम करण्याची संधी मिळत असेल तर! या बहुराष्ट्रीय कंपनीत काम मिळणे तसे अवघड असते. मात्र, अॅमेझॉन कंपनीने तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. तुम्ही अर्धवेळ किंवा पूर्णवेळ काम करु शकता. तुम्ही महिन्याला ५० हजार रुपये कमवू शकता. चला तर मग ही नोकरीची संधी कशी मिळले ते पाहू?

डिलिव्हरी बॉयसाठी नोकरी संधी

अॅमेझॉनला त्याचे उत्पादन वितरीत करण्यासाठी हजारो डिलिव्हरी बॉयची आवश्यकता आहे. डिलिव्हरी बॉयला कंपनीच्या गोदामातून वस्तू दिल्या जातात. त्या वस्तू दिलेल्या पत्त्यावर देण्याचा असतात. असे काम करणाऱ्या तरुणांना कंपनी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देत ​​आहे. या नोकरीत कोणताही दबाव नाही. जर आपण दिवसभर काम करू शकत नाही तर अर्धवेळ नोकरीचीही तरतूद आहे.

तुम्हाला इतकी मिळेल सॅलरी

अॅमेझॉन दरमहा डिलिव्हरी बॉयला नियमित पगार देते. कंपनी आपल्या डिलिव्हरी मुलाला अनुभवानुसार पगार देते. जर एका डिलिव्हरी बॉयने एका दिवसात १५० किंवा अधिक पॅकेट्स वितरित केली तर सहज दरमहा ५० हजारांहून अधिक पगार सहज मिळवू शकता.

पात्रतेचा निकष नाही!

अ‍ॅमेझॉनचे पॅकेट्स किंवा पार्सल वितरीत करण्यासाठी डिलिव्हरी बॉयला जास्त शिक्षणाची गरज नाही. दहावी पास असेल तरीही त्याला काम करण्याची संधी मिळते. दहावी पास देखील येथे सहज नोकरी मिळवू शकेल. परंतु अधिक पात्रताधारक तरुण असेल तर त्याला तसा पगार वाढण्याची शक्यता जास्त असते. आपण डिलिव्हरी बॉय जॉबसाठी थेट अ‍ॅमेझॉनच्या बेवसाईटवर https://logolog.amazon.in/applynow थेट अर्ज करू शकता.

सोर्स : Zee News


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Ashvin wankhede says

    Kahi nahi

  2. नितेश says

    आता ही नवीन मेगा भरती होणार आहे ती नवीन फॉर्म पुन्हा भरावी लागणार आहेत का

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप