सहाय्यक प्राध्यापकांची भरती म्हणजे ‘बिनवासाची अगरबत्ती’!

Pune University Recruitment 2020

उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली; वाढत्या बेरोजगारीने मात्र संताप

While the number of Net, Set, PhD holders in the State is increasing day by day, the posts of Assistant Professor are vacant. The rulers have never made a concrete decision on whether to fill the post. The decision taken has not been efficiently implemented. Often orders issued regarding recruitment are stuck for various reasons. So the unemployment rate is increasing.

पुणे – “छोट्या संवर्गातील सुधारित बिंदूनामावलीच्या तपासणीस (रोस्टर) असलेली स्थगिती उठवून विद्यापीठ व महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक पदांची रिक्त पदे भरण्यास सुरुवात करू,’ अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली होती. प्रत्यक्षात यावर कोणतीच कार्यवाही झाली नसून, भरतीची घोषणा हवेतच विरली आहे.
राज्यात नेट, सेट, पीएच.डी.धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असताना, सहायक प्राध्यापकांची पदे रिक्तच आहेत. ही पदे भरण्याबाबत राज्यकर्त्यांनी कधीच ठोस निर्णय घेतला नाही. घेतलेल्या निर्णयाची सक्षमपणे अंमलबजावणीही झालेली नाही. भरतीबाबत अनेकदा काढलेले आदेश अनेक कारणांमुळे कचाट्यात अडकले. त्यामुळे बेरोजगारांचे प्रमाण वाढत आहे.

सुधारित बिंदूनामावलीनुसार 1 ते 30 पदे असलेल्या छोट्या संवर्गामधील एसईबीसी व ईडब्लूएस वर्गासह सरळसेवेची पदे भरताना मागास प्रवर्गातील आरक्षणाची पदे भरण्यासाठी कार्यपद्धती निश्‍चित नव्हती. यावर 21 ऑगस्ट 2019 रोजी सामान्य प्रशासन विभागाने छोट्या संवर्गातील पद भरतीबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. त्याला दुसऱ्याच दिवशी शासनाने स्थगिती दिली. तेव्हापासून ही स्थगिती कायमच आहे. यामुळे ही भरती रखडली आहे.

महाविकास आघाडीतील उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत गेल्या महिन्यात पुणे दौऱ्यावर आले असताना, त्यांनी “रोस्टर तपासणीवरील स्थगिती तत्काळ उठवून भरती प्रक्रियेतील जाहिराती प्रसिद्ध होण्यास सुरुवात होईल,’ अशी घोषणा केली होती.

यानंतर कार्यक्रम, बैठकांनिमित्त अनेक संघटना, पात्र उमेदवार शिक्षणमंत्र्यांना पाठपुराव्यासाठी भेटतच आहेत. त्यांनाही केवळ आश्‍वासनेच मिळत आहेत. पण, या भरती प्रक्रियेतील अजब कारभारावर संताप व्यक्त होत आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी मंत्र्यांनी ठोस पावले उचलण्याची आवश्‍यकता आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मुलाखतींचा फक्‍त फार्स
बहुतांश शिक्षणसंस्था या राजकीय नेते, उद्योजकांच्याच आहेत. या संस्थांमध्ये प्राचार्य व सहायक प्राध्यापक भरतीसाठी थेट लाखो रुपयांची बोलीच लावण्यात येते. मुलाखती घेण्याचा केवळ फार्स असून, गुणवंतांना डावलून “सोयी’चा उमेदवार घ्यायचा अजब पायंडाच संस्थांनी पाडला आहे. निवड समितीतील विद्यापीठ, उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालय, विषय तज्ज्ञ या सर्वच सदस्यांना अधिकार वापरण्याचे स्वातंत्र्य उरलेले नाही.

संस्था सांगेल त्याप्रमाणे उमेदवाराची निवड करावी लागते व त्या रिपोर्टवर गप्प बसून निमूटपणे सह्या कराव्या लागतात. संस्थेविरोधात जाण्याचा पवित्रा घेणाऱ्या सदस्यांना इतर ठिकाणी मुलाखतीला बोलावले जात नाही, अशी भीतीही असते. विविध कारणांनी काही सदस्य निवड समितीत जाण्यासही स्पष्ट नकार देतात. नुकत्याच एका बड्या संस्थेने सहायक प्राध्यापकांसाठी घेतलेल्या मुलाखतीत आपल्या ठराविक मतदार संघातीलच उमेदवारांची निवड करण्याची आधीच “फिक्‍सिंग’ केली होती. यामुळे बहुसंख्य उमेदवारांनी मुलाखतीकडेच पाठ फिरवली. यासारखे भरतीचे आश्‍चर्यकारक प्रकार अनेकदा घडत आहेत.

सौर्स : प्रभात


Pune University Recruitment 2020 : Savitribai Phule Pune University has announced that the advertisement will be within a month for the recruitment of 111 professors. But in the last month, nothing has happened but it has become clear that the announcement is a ‘fake’ of assurance. Read the complete details carefully and keep visit us.

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील १११ प्राध्यापकांच्या भरतीसाठी एका महिन्यात जाहिरात काढली जाईल, अशी घोषणा उच्चतंत्र शिक्षणमंत्र्यांनी केली होती. मात्र गेल्या महिनाभरात यावर काहीच झालेले नसून, हो घोषणा म्हणजे आश्‍वासनाचे ‘गाजर’ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट दिली होती. त्या वेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासोबत विद्यापीठाशी संबंधित विषयांवर चर्चा करताना प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. त्यामध्ये प्राधान्याने प्राध्यापक भरती, विद्यापीठाच्या नाशिक व नगर केंद्राचे सक्षमीकरण हे विषय घेण्यात आले होते.
युती सरकारच्या काळात मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर विविध विद्यापीठांमधील शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या भरतीचा विषयही समोर आला होता. त्या वेळी अकृषी विद्यापीठांमधील सर्व रिक्त जागा सरसकट न भरता ८० टक्के प्राध्यापकांची भरती केली जावी, असा निर्णय घेतला होता. त्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांनी तयार सुरू केली होती. राज्यातील १५ कृषी विद्यीपाठांमध्ये ६५९ प्राध्यापकांची पदे भरली जाणार होती.
त्यात पुणे विद्यापीठातील सुमारे १४५ प्राध्यापकांच्या रिक्त जागांपैकी १११ जागांचा समावेश होता. ही प्रक्रिया सुरू असताना समाजकल्याण विभागाने छोट्या संवर्गातील पदांच्या सुधारित बिंदूनामवलीस स्थगिती दिल्याने ही प्राध्यापक भरती रखडली आहे.
पुणे विद्यापीठात झालेल्या बैठकीत ही वस्तुस्थिती समोर आल्यानंतर उच्च शिक्षणमंत्री सामंत यांनी याप्रकरणात लक्ष घालून, प्राध्यापक भरतीतील समाज कल्याण विभागाच्या आदेशाबाबत सुधारणा करून, त्यातील त्रुटी दूर करू व पुढील एका महिन्यात प्राध्यापक भरतीसाठी जाहिरात काढली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र अद्याप काहीही झालेले नाही.

गुणवत्तेवर होतोय परिणाम

विद्यापीठांमधील विभागांमध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कमी मनुष्यबळात अभ्यासक्रम पूर्ण करणे, संशोधन प्रकल्प राबविणे यासह इतर कामांवर परिणाम होत आहे. एकीकडे गुणवत्ता वाढविण्यासाठी नवे प्रयोग सुरू असताना, दुसरीकडे प्राध्यापकांच्या अपुऱ्या संख्येकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. लालफितीच्या कारभार सोडून यात सुधारणा होणे गरजेचे आहे, असे मत काही प्राध्यापकांनी व्यक्त केले..

सौर्स: सकाळ

‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक पदाच्या १११ रिक्त जागांसाठी येत्या महिन्याभरात जाहिरात प्रसिद्ध होईल. त्याचबरोबर राज्याच्या अर्थ मंत्रालयाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत ८०० जागा रिक्त जागा असून, या जागांच्या भरतीसाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यात येईल,’ अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

उच्च व तंत्रशिक्षण खात्याचा पदभार स्विकारल्यावर शनिवारी विद्यापीठास भेट दिली. या वेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने उपस्थित होते. राज्य सरकारने विद्यापीठांना घालून दिलेल्या निकषांनुसार भरती प्रक्रिया पार पडेल. यामध्ये वित्त विभागाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत ८०० जागा रिक्त आहेत. सरकारने एकूण रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, सामान्य प्रशासन विभागाकडून एक निर्णय रद्द झाला. त्यामुळे भरती प्रक्रिया थांबली होती. मात्र, आता या प्रक्रियेत सुधारणा करण्यात येणार असून, प्राध्यापकांची भरती सर्व विद्यापीठांमध्ये होईल,’ असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

सामंत म्हणाले की, पुणे विद्यापीठातील १११ रिक्त जागा लवकरच भरण्यात येतील. अर्थ खात्याशी निगडीत जागांचा प्रश्न अर्थमंत्री अजित पवारांसोबत चर्चा करून सोडविण्यात येईल. विद्यापीठांप्रमाणे महाविद्यालयातील भरतीचा प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापुरता नसून सर्व विद्यापीठांतील रिक्त जागांवर भरती होईल.

शिक्षकांसाठी पुण्यात प्रशिक्षण अकादमी

‘राज्यातील कॉलेजांमध्ये सुमारे ५५ हजार शिक्षक आहेत. या शिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी पुण्यात स्वतंत्र अकादमीची स्थापना करण्यात येणार आहे. ‘रोटेशन’ पद्धतीने शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. येत्या महिन्याभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाईल. येत्या एक मार्चपासून प्रशिक्षण वर्ग सुरू होतील,’ असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

नगर-नाशिक उपकेंद्रांचे भूमिपूजन लवकर

‘नगर आणि नाशिक उपकेंद्राच्या प्रश्नात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी विशेष लक्ष घातले आहे. नाशिकच्या उपकेंद्राचे दोन भाग झाले आहेत. त्यामुळे एका जागेवर विद्यापीठाचे काम आणि दुसऱ्या जागी राहण्याची व्यवस्था केली जाईल. विद्यापीठातील सात लाख विद्यार्थ्यांपैकी दोन लाख विद्यार्थी नाशिकचे आहेत. येत्या १५ दिवसांत यासंबंधीचा निर्णय प्रसिद्ध करून एक ते दोन महिन्यात इमारतींचे भूमिपूजन होईल,’ असे सामंत यांनी सांगितले.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप