मैदानी चाचणी संपली, पोलीस भरती लेखी परीक्षा दोन एप्रिलला ! – Pune Police Bharti 2023

Pune Police Bharti 2023

Pune Police Bharti 2023 – The recruitment process in the city police force is underway and the field test of the interested candidates was completed on Friday. After that, the police force informed that the written exam will be held on April 2 for the post of police constable. Meanwhile, for the first time, five third parties have participated in this recruitment process. The ‘Police Recruitment-2021’ process for the Pune City Police Force started on December 3. Verification of educational documents of interested candidates has been completed. After that, field test was conducted for physical test.

 

शहर पोलिस दलामध्ये भरती प्रक्रिया सुरू असून, इच्छुक उमेदवारांची मैदानी चाचणी शुक्रवारी पूर्ण झाली. त्यानंतर पोलिस शिपाई पदासाठी दोन एप्रिल रोजी लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती पोलिस दलाकडून देण्यात आली. दरम्यान, या भरती प्रक्रियेत पहिल्यांदाच पाच तृतीयपंथीयांनी सहभाग नोंदविला आहे. पुणे शहर पोलिस दलासाठी ‘पोलिस भरती-२०२१’ प्रक्रियेस तीन डिसेंबर रोजी प्रारंभ झाला. इच्छुक उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर शारीरिक चाचणीसाठी मैदानी परीक्षा घेण्यात आली.

 

यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मेरीट यादी पाच-सहा दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस मुख्यालयातील अधिकारी दशरथ हटकर यांनी दिली. दरम्यान, गृह विभागाच्या परिपत्रकानुसार पोलिस चालकपदाची लेखी परीक्षा २६ मार्च रोजी होणार आहे. तर, पोलिस शिपाई पदाची लेखी २ एप्रिल रोजी घेतली जाणार आहे.

 

मुंबई उच्च न्यायालयाने ९ डिसेंबर २०२२ रोजी दिलेल्या आदेशानंतर तृतीयपंथीयांना पोलिस भरतीमध्ये पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. पुणे शहर पोलिस दलामध्ये शिपाई आणि चालक भरतीसाठी नऊ तृतीयपंथीयांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. परंतु त्यापैकी एका महिला उमेदवाराने चुकून अर्ज भरला होता. तर, उर्वरित आठपैकी पाच तृतीयपंथीयांनी शुक्रवारी (ता. १७) मैदानी परीक्षेत सहभाग घेतल्याची माहिती पोलिस मुख्यालयाकडून देण्यात आली.

 

 पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई चालक भरती प्रकीयेला 18 फेब्रुवारी पोसून सुरुवात झाली आहे. त्यातील महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रीया येत्या गुरुवार (दि.9 March 2023) पासून सुरु करण्यात येणार आहे. मध्यतंरी पोटनिवडणूक प्रक्रियेमुळे या भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती मात्र पुन्हा ही प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.

 

त्यानुसार गुरुवारी महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु होणार असून ज्या महिला उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्यांनी महा आयटी वेबसाईटवरून प्रवेशपत्र प्राप्त करावे. प्रवेशपत्रावरील  तारखेनुसार शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करीता पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे उपस्थित रहावे, अशी माहिती पोलीस उप आयुक्त रोहिदास पवार यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड