पुणे मेट्रोसाठी दोनशे पदे भरणार

Pune Metro Bharti 2020-200 Vacancy

मेट्रोच्या संचलनासाठीची पदे, देखभाल-दुरुस्तीसाठीची पदे

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी आणि पुण्यातील प्राधान्य मार्गाच्या संचलन आणि देखभाल-दुरुस्तीसाठी (ऑपरेशन अँड मेन्टेनन्स) १९५ पदे भरण्याचा निर्णय महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) घेतला आहे. मेट्रो स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर यांपासून ते रूळ, सिग्नल आणि इतर यंत्रणांच्या देखभाल-दुरुस्तीच्या दृष्टीने मेट्रो कार्यान्वित होण्यापूर्वी ही पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना मेट्रोतून सफर करण्यासह प्रत्यक्ष मेट्रोमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

पिंपरीतील संत तुकारामनगर ते फुगेवाडी आणि पुण्यातील आनंदनगर ते गरवारे कॉलेज अशा शहरातील सुमारे १० किमीच्या मार्गावर पुढील काही महिन्यांत मेट्रो सेवा सुरू करण्याचे संकेत ‘महामेट्रो’ने दिले आहेत. ही सेवा सुरू करण्यापूर्वी पुणे मेट्रो प्रकल्पासाठी विविध स्वरूपातील पदे भरणे गरजेचे असून, ‘महामेट्रो’च्या संचालक मंडळाने नुकतीच त्याला मान्यता दिली आहे. मेट्रोच्या संचलनासाठी ८५, तर देखभाल-दुरुस्तीसाठी ११० पदे भरण्यात येणार आहेत. या संदर्भातील पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश संचालक मंडळाने व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत.

मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही मार्गांवर प्रत्येकी दोन स्टेशन कार्यान्वित केली जाणार आहेत. त्यामुळे मेट्रो संचलनाच्या वेळेत स्टेशनवरील विविध कामांसाठी पदभरती केली जाणार आहे. यामध्ये स्टेशन कंट्रोलर, स्टेशन मॅनेजर, ड्रायव्हर इन्स्ट्रक्टर, मनुष्यबळ, वित्त आणि भांडार यांसह ऑपरेशन अँड कमांड सेंटरसाठी (ओसीसी) पदांची भरती करण्यात येणार आहे. त्याशिवाय, प्रत्यक्ष मेट्रो ट्रेन चालविण्यासाठी १३ ट्रेन ऑपरेटरची नियुक्ती केली जाणार आहे. मेट्रोचे संचलन सुरू झाल्यानंतर रूळ, सिग्नल, कम्युनिकेशन, विद्युतप्रवाह अशा विभागांतर्गत देखभाल-दुरुस्तीसाठी स्वतंत्र मनुष्यबळाची गरज पडणार आहे. त्यादृष्टीने, देखभाल-दुरुस्तीकरिता ११० पदे भरण्यात येणार आहेत.

महिलांसाठी संधी

नागपूर मेट्रो कार्यान्वित झाली, त्या वेळी पहिल्यांदा ट्रेन चालविण्याची संधी महिलाचालक सुमेधा मेश्राम यांना मिळाली होती. नागपूर मेट्रोमध्ये इतरही विविध पदांवर महिलांची नियुक्ती करण्यात आली असून, पुण्याच्या मेट्रोसाठी सुरुवातीला मंजूर झालेल्या पदांमध्येही महिलांना संधी मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

स्टेशनच्या कामांवर भर

पिंपरीमध्ये मेट्रो मार्गिकेसह स्टेशनची कामे पूर्ण करण्याकडे सध्या सर्वाधिक भर देण्यात आला आहे. संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, फुगेवाडी स्टेशनचे काम साठ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. याच मार्गावर सध्या दोन ट्रेन दाखल झाल्या असल्याने ही दोन्ही स्टेशन पूर्ण करण्यासाठी ‘महामेट्रो’कडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

 

म. टा. प्रतिनिधी, पुणे


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Arpit Andhare says

    येथे १० बेस वर Apprenticeship साठी जागा आहेत का ?

  2. Ankita Uday Shinde says

    There is job for diploma Electronics and Telecommunications students.

  3. Sushma Waghmare says

    Government Job for architects

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप