Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीत “या” प्रवर्गाला एकही राखीव पद मिळाले नाही, बिंदूनामावली चुकविली !professors Bharti 2024

professors Bharti 2024

Professors Bharti 2024

professors Bharti 2024:There are 34 posts of Assistant Professors in the newly established Government Medical College Dharashiv and 30 posts in Sindhudurg. In this, the tribal community with seven and a half percent reservation does not have a single post. Online applications are invited for the recruitment of Assistant Professor, Medical Education and Research Service, Group-B posts in various departments of Government Medical Colleges as well as newly established Government Medical Colleges, Dharashiv, Alibag, Sindhudurg, Nandurbar, Parbhani and Satara. Such advertisement has been given through MPSC on 5th December 2023. There are 580 posts of assistant professors, including 185 posts in the newly established six government medical colleges out of a total of 765 posts. Get all details about professors Bharti 2024 at below

नव्याने स्थापन झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे सहायक प्राध्यापकांची ३४ पदे असून, सिंधुदुर्गमध्ये ३० पदे आहेत. यामध्ये साडेसात टक्के आरक्षण असलेल्या आदिवासी समाजाला एकही पद नाही. अलिबागमध्ये २९ पदे असून, यात आदिवासींना केवळ एक पद, साताऱ्यात ३१ पदे असून, इथेही एकच पद आहे. परभणीत २२ पदे असून, यात दोन पदे आदिवासींना आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच नव्याने स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, धाराशिव, अलिबाग,  सिंधुदुर्ग, नंदुरबार, परभणी व सातारा येथील विविध विभागातील सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट- ब या संवर्गातील पदांच्या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. एमपीएससीमार्फत ५ डिसेंबर २०२३ रोजी तशी जाहिरात देण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक पदांच्या ५८० जागा असून, नव्याने स्थापन झालेल्या सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील १८५ पदे अशा एकूण ७६५ जागांचा समावेश आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

एनटी, एसबीसी या प्रवर्गालाही बसला फटका :

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीत धाराशिव, सिंधुदुर्ग मध्ये एनटी ( सी), एनटी (डी) व एसबीसी प्रवर्गाला एकही राखीव पद मिळाले नाही. अनुसूचित जाती व जमाती यांचे सार्वजनिक सेवा योजनेचे आरक्षण हे भारतीय राज्य घटनेच्या कलम १५(४), १६ (४) ( ४ क), कलम ३३५ , कलम ३४२ व आरक्षण अधिनियम २००४ नुसार अबाधित आहे. परंतु बिंदूनामावली चुकविल्यामुळे अनुसूचित जमातीच्या आरक्षणावर गदा आली आहे. त्यामुळे विहित आरक्षणानुसार प्रतिनिधित्व मिळत नाही. प्रत्येक संवर्गाला आरक्षण धोरणानुसार त्यांचा वाटा मिळाला पाहिजे. कोणावरही अन्याय होऊ नये, अशी मागणी ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रमोद घोडाम यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

Maharashtra Pradhyapak Bharti 2024

Know More details about Maharashtra Pradhyapak Bharti 2024 so that you will get idea about Lastest Ongoing Recruitments in Maharashtra. Check Subject Wise Professors vacancies in Maharashtra State at below

Maharashtra Pradhyapak Bharti 2024

‘या’ विषयाची पदे

  1. शल्यचिकित्साशास्त्र, क्ष-किरणशास्त्र,
  2. शरीररचनाशास्त्र, विकृतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, क्षयरोग व उरोरोगशास्त्र, त्वचा व गुप्तरोगशास्त्र,
  3. चिकित्साशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्र, शरीरक्रिया शास्त्र, बालरोग रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध
  4. वैद्यकशास्त्र, जीवरसायनशास्त्र, औषधशास्त्र, अस्थिव्यंगोपचार शास्त्र,
  5. कान, नाक व घसाशास्त्र, बधिरीकरण शास्त्र, औषध वैद्यकशास्त्र,
  6. नेत्रशल्यचिकित्सा, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र.

Maharashtra Professors Bharti 2023 News

Professors Bharti 2023 : Colleges of Engineering and Pharmacy had been clamoring for vacancies for many years. Also, many interested letter holders had given a statement to the government for recruitment. After that, the government will create the post and soon the recruitment will be done. So many will get relief.

राज्यातील शासकीय अभियांत्रिकी, औषधनिर्माण पदवी व पदव्युतर पदवी महाविद्यालयांत तसेच लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात प्राध्यापकांची १०५ पदे निर्मिती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे आता अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांतील पदभरतीला गती येणार आहे. यामुळे हजारो इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

लवकरच प्राध्यापक आणि अन्य पदांची भरती होणार !!

ग्रेड वेतन ७६०० किंवा त्यापेक्षा जास्त ग्रेड वेतनाची ही पदे असतील. यामध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विभाग प्रमुख, अधिष्ठाता, संचालक अशी विविध पदे असतील. यासाठी २३ कोटी ५२ लाख खर्चास मान्यता देण्यात आली. यामुळे लवकरच प्राध्यापक आणि अन्य पदांची भरती होणार आहे.

अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण महाविद्यालयात अनेक वर्षांपासून रिक्त पदांची ओरड होती. तसेच अनेक इच्छुक पत्रधारकांनी सरकारला पदभरतीसाठी निवेदन दिले होते. त्यानंतर आता शासनाने पदनिर्मिती करून लवकरच पदभरती होणार आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.


Maharashtra Pradhyapak Bharti 2023 Update

Principal professors Bharti 2023 – Although the Directorate of Higher Education has started the process to fill the large number of vacancies in the senior colleges of the state, it has come to light that the aided colleges have ignored it. Due to this, the Directorate has given these colleges a deadline of June 15 to file proposals for filling up the vacancies. After that, if the proposals are not filed, the department informed that direct action will be taken.

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाने कार्यवाही सुरू केली असली तरी अनुदानित महाविद्यालयांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले असल्याची बाब समोर आली आहे.यामुळे संचालनालयाकडून या महाविद्यालयांना रिक्त जागा भरण्यासाठीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर जर प्रस्ताव दाखल करण्यात आले नाहीत तर थेट कारवाई केली जाणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

राज्यातील १२२ अनुदानित महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या ५२३ जागांसाठी मागील काही महिन्यांपासून ना-हरकत आणि मागणी प्रस्ताव दाखल केला नाही. या जागा भरण्यासाठी विभागाकडून वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली असतानाही त्यासाठी अनेक महाविद्यालयांनी दुर्लक्ष केले आहे.

विशेष म्हणजे या रिक्त असलेल्या या जागा अनेक महत्त्वाच्या विषयाच्या आणि राखीव गटातील आहेत. त्या भरण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने परवानगी दिली दिली आहे; मात्र संस्थाचालक आणि संबंधित महाविद्यालय प्रशासनाकडून या जागा भरण्यासाठी दिरंगाई केली जात असल्याने त्यांना विभागाकडून अखेरची संधी देण्यासाठी आदेश जारी करण्यात आले आहेत.


राज्यात १ ऑक्टोबर २०१७ रोजी रिक्त पदांनुसार राज्यात २ हजार पदे भरण्यास शासनाने १२ नोव्हेंबर २०२१ रोजी मान्यता दिली. त्यानुसार, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात सहायक प्राध्यापकांच्या १८४ रिक्त पदांचा समावेश आहे. उच्च शिक्षण विभागाने २१ जुलैनंतर सातत्याने प्राचार्य, सहसंचालक, विद्यापीठाचे संबंधित अधिकारी यांच्या बैठका घेतल्या. बिंदूनामावलीची प्रक्रिया पूर्ण करावी व ‘ऑनलाइन’ ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याच्या सूचना दिल्या. मात्र, संस्थाचालकांनी जुमानले नाही.

Marathwada Principal Bharti 2023

उच्च शिक्षण प्रधान सचिवांनी विद्यापीठनिहाय आढावा बैठक घेत रिक्त पदे तातडीने भरण्याच्या सूचनाही केल्या. मात्र, तरीही महाविद्यालये जुमानत नसल्याने अखेर उच्च शिक्षण संचालकांनी १२ ऑक्टोबर रोजी परिपत्रक काढून मंजूर पदे असलेल्या महाविद्यालयांना ३१ ऑक्टोबरपर्यंत ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र घेण्यासाठी मुदत दिली. अन्यथा पदे इतर संस्थांना वर्ग करण्याचा इशारा दिला. तरीही संस्थाचालकांनी जुमानले नाही. अनेक संस्थांचे प्रस्ताव मावक, रोस्टर, विद्यापीठ, उच्च शिक्षण विभागाच्या फेऱ्यात अडकले असल्याने भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह आहे. आचारसंहितेनंतर गती महाविद्यालयांना ३१ ऑक्टोबरपर्यंत ना-हरकत प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. महाविद्यालयांनी मंजूर पदे भरण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्याचे वारंवार आवाहन करत आहोत. आतापर्यंत राजूर येथील संस्थेच्या ४, भूम येथील संस्थेच्या १७ पदांची जाहिरात निघाली आहे. जालना येथील संस्थेस १७ पदांची एनओसी मिळाली आहे. शिक्षक मतदार संघ निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यानंतर भरती प्रक्रियेला गती येईल.

जिल्हानिहाय अनुदानित महाविद्यालये

  • औरंगाबाद – ३९
  • बीड – ४०
  • जालना – १४
  • उस्मानाबाद – २२

 

Principal Bharti 2023

Principal Bharti 2023: Administration Has Given A Deadline For The Appointment Of Principals To The Colleges. If the post of Principal is vacant, the examination applications and eligibility applications of the students of such colleges will not be accepted. For more details about Principal Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

तांत्रिक अडचणीमुळे नियमित प्राचार्य भरण्यासाठी अडचण आली आणि प्रभारी प्राचार्य असेल, तर त्याची विद्यापीठाकडून १० ऑगस्टपर्यंत मान्यता घ्यावी लागणार आहे. प्राचार्य पद रिक्त असेल, तर अशा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज, पात्रता अर्ज स्वीकारले जाणार नाहीत; तसेच इतर पत्र व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Principal Bharti 2023

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रडावर आता प्राचार्यांची पदे न भरणारी महाविद्यालये आहेत.
  • दहा ऑगस्टपर्यंत महाविद्यालयांना प्राचार्य नियुक्तीची प्रशासनाने डेडलाइनच दिली असून, मुदतीत प्राचार्य पदावर नियुक्ती केली नाही, तर विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्जच स्वीकारले जाणार नाहीत, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.
  • प्राचार्यांशिवाय महाविद्यालये चालविणाऱ्या संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे.
  • पायाभूत सुविध, पात्र शिक्षकांची नेमणूक नसलेल्या पदव्युत्तर महाविद्यालयांच्या तपासणी प्रक्रियेसह आता प्राचार्य नसलेल्या महाविद्यालयांकडे प्रशासनाने मोर्चा वळवला आहे.
  • कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या विशेष अधिकारातून महाविद्यालयांची तपासणी सुरू असून, यात सहा महाविद्यालयांवर अनेक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश बंदी, यासह दंडात्मक कारवाई करण्यात आली.
  • त्यानंतर आता प्राचार्य नियुक्तीवरून महाविद्यालयांवर कारवाईची तयारी सुरू केली असल्याचे सांगण्यात येते.

विद्यापीठाने बुधवारी प्राचार्य भरती न करणाऱ्या महाविद्यालयांना पत्राद्वारे प्राचार्य पद तात्काळ भरा, असे स्पष्ट केले. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या ४८०पेक्षा अधिक आहे. त्यापैकी अनुदानित वगळता इतर बहुतांश महाविद्यालयांकडे प्राचार्य पदे रिक्त किंवा प्रभारी नियुक्ती आहे. अनेक प्रभारी प्राचार्यांच्या नियुक्तीबाबतही गोंधळ आहे. त्यामुळे प्रशासनाने महाविद्यालयांना सविस्तर पत्र पाठवून नियमांनुसार प्राचार्य पदे भरण्याचे निर्देश दिले. सोबत नियमावलीही देण्यात आली आहे. दहा ऑगस्टपर्यंत भरावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

निवृत्त संवर्गातील अध्यापकांमधून प्राचार्य निवडीलाही मर्यादा

  • विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कायम विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये निवृत्त संवर्गातील अध्यापकांची एका शैक्षणिक वर्षासाठी नियुक्त करण्याची पद्धत होती; परंतु, २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षापासून निवृत्त संवर्गातील अध्यापकांची महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी एक वर्षासाठी नियुक्ती करता येणार नाही.
  • यासह अभ्यासक्रमाच्या कार्यभारानुसार पदवी अभ्यासक्रमासाठी अध्यापक, शारिरीक शिक्षण निर्देशक, ग्रंथपाल पदे पुर्णवेळ भरणे आवश्यक आहे.
  • पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र अध्यापक यांसह नॅक मूल्यांकन, पुनर्मुल्यांकन करणे अनिवार्य आहे.
  • तसे न केल्यास महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड