NEET 2020 आरक्षणात बदल करण्याचा विचार?

NEET 2020 Exam Reservation update

नवी दिल्ली: राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे आयोजन मे महिन्यात करण्यात आले आहे. देशातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी (MBBS, BDS) ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. अन्य परीक्षांप्रमाणे या परीक्षेतही आरक्षण आहे. मात्र तामिळनाडू राज्य सरकार या आरक्षण प्रणालीत थोडा बदल करण्याच्या विचारात आहे.

नीट मध्ये सरकार एक नवं आरक्षण देण्याच्या विचारात आहे. हे आरक्षण सरकारी शाळांमधून शिकलेल्या मुलांसाठी असेल. याबाबत तामिळनाडू सरकारने स्पष्ट केलं आहे की वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांमध्ये सरकारी शाळांमधून शिकलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. विशेषत: नीट परीक्षा सुरू झाल्यानंतर हे प्रमाण घटलं आहे. सरकार हा ट्रेंड संपवण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणूनच उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आरोग्य आणि विधी विभागांच्या सचिवाची एक समिती बनवण्यात आली आहे. ही समितीत सरकारी शाळांमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय महाविद्यालयांतील स्थिती, त्यांची सामाजिक परिस्थिती आदींचा अभ्यास करून एक महिन्याच्या आत अहवाल देणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी पहिली ते १२ वीपर्यंत सरकारी शाळा, महाविद्यालयांतून शिक्षण घेतले असेल त्यांना या आरक्षणाचा लाभ देण्याचा सरकार विचार करत आहे. तामिळनाडू सरकारने हा प्रस्ताव विधानसभेत सादर केला आहे. यासंदर्भातील एक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

सौर्स : मटा

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
 1. सतीश वाडेकर says

  Sir,6 महिन्यापूर्वी एक महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ शिपाई ,चालक, मदतनीस पदासाठी भरती आली होती ,तिचे काहीच अजूनपर्यंत निकाल नाही आला ,ना अजून परीक्षा झाली
  http://www.mahapariksha.gov.in
  या वेबसाईट वरून फ्रॉम भरला होता
  कृपा करून माहिती द्या….
  मी आपला आभारी आहे…
  धन्यवाद…!

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप