नासाने अंतराळवीरांची शोधमोहीम सुरू केली आहे

NASA hire more astronauts for upcoming space programme

वॉशिंग्टन: भविष्यातील अंतराळ मोहीम लक्षात घेऊन नासाने अंतराळवीरांची शोधमोहीम सुरू केली आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) याबाबत मंगळवारी घोषणा केली आहे. नासाने अंतराळवीरांसाठीचे निकष पात्रता जाहीर केले आहेत.

भविष्यातील अंतराळ मोहीमा चंद्रासह मंगळ ग्रहावरदेखील होणार आहेत. त्यादृष्टीने नासाने प्रयत्न सुरू केले आहेत. नासाचे प्रशासकीय प्रमुख जिम ब्रिडेनस्टाइ यांनी सांगितले की, या वर्षी आम्ही अंतराळात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे २० वर्ष जल्लोषात साजरे करणार आहोत. आम्ही २०२४ पर्यंत चंद्रावर पहिली महिला अंतराळवीर पाठवण्यास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

इच्छुक उमेदवाराकडे विज्ञान, अभियांत्रिकी किंवा गणित विषयातील पदव्युत्तर पदवी असावी. त्याशिवाय, पीएचडी असल्यास उमेदवाराची ही जमेची बाजू ठरेल. जर उमेदवाराकडे वैद्यकीय पदवी असल्यासही उमेदवाराचा दावा आणखी भक्कम होणार आहे. या अंतराळवीराकडे अमेरिकन नागरिकत्व असावे अशी पूर्वअट आहे.
याशिवाय इच्छुक उमेदवाराकडे दोन वर्षांचा उड्डाणाचा व्यावसायिक अनुभव असणेही आवश्यक असल्याचे नासाने स्पष्ट केले आहे. पायलटसाठी कमीत कमी १००० तासांचा पायलट इन कमांडचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवाराला दोन तासांची एक ऑनलाइन चाचणी द्यावी लागणार आहे. नासाकडून निवडण्यात आलेल्या उमेदवारांना चांगले वेतनही देण्यात येणार आहे. नासाकडून ५३ हजार ८०० डॉलर ते ७० हजार डॉलरपर्यंतचे वेतन मिळणार आहे.
नव्या अंतराळ मोहिमेसाठी २०२१ पर्यंत अंतराळवीर मिळतील असा नासाला विश्वास आहे. उमेदवारांच्या निवडीनंतर त्यांना दोन वर्षाचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. उमेदवारांचे प्रशिक्षण ह्युस्टन येथील जॉनसन स्पेस सेंटर येथे होणार आहे. प्रशिक्षणात स्पेस वॉकिंग, लॅब्स, रोबोटिक्स, इंटरनेशन स्पेस सेंटर सिस्टीम आदी बाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सौर्स : मटा

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप