परीक्षा लांबणीवर; रद्द नाही: मुंबई विद्यापीठाने केले स्पष्ट

Mumbai University : Prolong the exam, Not canceled

करोना व्हायरसमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत, रद्द झालेल्या नाहीत, असे स्पष्टीकरण मुंबई विद्यापीठाने केले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये छापून आलेल्या ‘पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द’ ही बातमी मॉर्फ करून ‘विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द’ अशी चुकीची माहिती पसरवण्याचा खोडसाळपणा कोणीतरी केला आणि विद्यापीठ प्रशासनाला आज मोठा मनस्ताप झाला. परीक्षा रद्द झाल्या का अशी चौकशी विद्यार्थी करू लागले.

याबाबत विद्यापीठाने असे स्पष्टीकरण दिले की, ‘आज मराठीतील एका दैनिकाच्या जुन्या बातमीचे संपादन करून ‘मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द होऊन सर्वांना पुढील वर्गात प्रवेश’ अशी चुकीची बातमी सोशल मीडियावर आली. ही बातमी खोटी असून राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या २०२० च्या उन्हाळी सत्राच्या सर्व परीक्षा रद्द झालेल्या नसून त्या ३१ मार्च २०२० पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.’

‘मुंबई विद्यापीठाने शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि. २३ मार्च २०२० पासून होणाऱ्या सर्व परीक्षा ३१ मार्च २०२० पर्यंत पुढे ढकलल्या आहेत. तशा आशयाच्या परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आलेले आहे. या परीक्षा रद्द झालेल्या नाहीत तर पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठ परीक्षा व इतर महत्वाच्या सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तात्काळ प्रसिद्ध करीत असते. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. समाजमाध्यमावरील अशा चुकीच्या बातम्या दुसऱ्यास पाठवू नयेत. शासनाच्या निर्देशानुसार परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील. त्या तारखा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील,’असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

‘हे दिवस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे’

करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नये, हे दिवस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे असून या कालावधीत त्यांनी घरात बसून अभ्यास करावा, कुटुंबियांसोबत वेळ व्यतीत करावा, युट्युबच्या माध्यमातून अभ्यास करावा,अभ्यासाच्या काही समस्या असतील तर आपल्या शिक्षकांना समाजमाध्यमाच्या माध्यमातून संपर्क साधून त्या सोडवाव्यात तर काही वेळ आपला छंद जोपासावा. मिळालेल्या या बहुमूल्य वेळेचा आपण सदुपयोग करावा.
– डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ

सौर्स : मटा

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप