मुंबई महापालिकेत 37 हजार जागा रिक्त!

Mumbai Mahanagarpalika Bharti 2020

मुंबई महानगरपालिका कामगार भरती होणे गरजेचे

कोणत्याही शहराचा विकास होण्यासाठी मनुष्यबळ महत्वाचे आहे. कितीही तंत्रज्ञान आले मनुष्यबळ तितकेच गरजेचे आहे. परंतु मुंबई महानगरपालिका आर्थिक तोट्यात आहे म्हणून मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना ती रिक्त पदे भरण्याची जबाबदारी टाळत आहे. आणि एकीकडे नको त्या गोष्ठीसाठी अनावश्यक खर्च करत आहे त्या पेक्षा मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे त्या कडे लक्ष देवून स्वच्छता पँटर्न यशस्वी होण्यासाठी हि भरती त्वरीत होणे गरजेचे आहे.

मुंबई महापालिकेतिल सफाई कामगारांची रिक्त पदे त्वरीत भरली पाहिजेत पण त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन खात्याचे योग्य आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण ही झाले पाहिजे. त्या कर्मचाऱ्यांना चांगली साधने व किमान सोई दिल्या पाहिजेत.मुंबई शहर नाईटलाईफ साठी नाही तर स्वच्छतेसाठी ओळखले गेले पाहिजे.

सौर्स : मटा

अर्थसंकल्पावरील भार कमी करण्यासाठी जोवर महसुलात वाढ होत नाही, तोपर्यंत रिक्त पदावरील भरती तात्पुरती थांबवण्यात येत असल्याची घोषणा पालिका आयुक्तांनी केली आहे. मात्र पालिकेत तब्बल 37 हजार जागा रिक्त आहेत. मात्र नोकरभरतीची जागा तूर्तास बंद केल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढणार आहे.

मालमत्ता कर आणि विकास नियोजन विभागातून मिळणारे उत्पन्न घटल्यामुळे पालिकेच्या महसुली उत्पन्नात मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. महसुली उत्पन्नाच्या तुलनेत आस्थापना खर्च ५० टक्के इतका झाला. त्यामुळे कामगारांच्या वेतन आणि वेतनादी खर्चामुळे अर्थसंकल्पावर मोठय़ा प्रमाणावर भार येऊ लागला आहे. महसुली उत्पन्न वाढून हा भार कमी होत नाही तोपर्यंत सर्व रिक्त पदांवरील भरती बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच कामगार सेवानिवृत्त झाल्यामुळे निर्माण होणारी रिक्त पदे भरण्यात येणार नाहीत. यामुळे प्रतिवर्षी २५० कोटी इतकी बचत अपेक्षित आहे. काटकसरीसाठी रिक्त पदे न भरण्याच्या या निर्णयामुळे पालिकेच्या कामगारांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे.

पालिकेत सध्या 1 लाख 5 हजार 981 कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. तरीही तब्बल 1लाख 43 हजार 901 कर्मचारी, अधिकाऱ्यांची गरज आहे. सध्या 37 हजार 820 जागा रिक्त आहेत. अर्थसंकल्प सादर करताना पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी नवीन नोक भरतीची दारे तूर्तास बंद केल्याचे स्पष्ट केले. अर्थसंकल्पावरील भार कमी करण्यासाठी जोवर महसुलात वाढ होत नाही, तोपर्यंत रिक्त पदावरील भरती तात्पुरती थांबवण्यात येत असल्याची घोषणा आयुक्तांनी केली आहे. त्यामुळे निवृत्तीमुळे होणारी रिक्त पदे भरण्यात येतील. या निर्णयामुळे प्रतिवर्षी 250 कोटी रुपये एवढी बचत अपेक्षित असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

  • १,४३,८०१  –  पालिकेतील  एकूण पदे 
  • १,0५,९८१  – सध्या कार्यरत पदे
  •  ३७,८२०- रिक्त पदे
  • १० ते १५ टक्के दरवर्षी सेवानिवृत्त होणारे कर्मचारी

जेव्हा अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि उत्पन्नात भर पडेल, तेव्हा आढावा घेऊन नवीन भरती करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असेही आयुक्तांनी म्हटले आहे. मात्र आधीच रिक्त पदे असताना भरती बंद केली जाणार असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरील ताण वाढणार आहे. लिपिकांची एकूण पदे पाच हजार 255 असताना 3 हजार 571 लिपिक सध्या कार्यरत आहेत. आयुक्तांच्या घोषणेनंतर कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

मुंबईच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक  कामगारांची संख्या राखली गेली पाहिजे, असे कामगार संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्व कामगार संघटना मिळून आम्ही आयुक्तांची भेट घेणार असून या निर्णयाचा पुनर्विचार करावा तसेच सरसकट भरती बंद करू नये, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात येईल, असेही देवदास यांनी म्हटले आहे. पालिकेमध्ये दरवर्षी साधारण १० ते १५ टक्के सेवानिवृत्त होत असतात. त्यामुळे दरवर्षी कामगारांची संख्या १० हजारांनी कमी होत असते. त्यामुळे महसूल वाढेपर्यंत रिक्त पदांची संख्या वाढत जाईल, जे पालिकेला परवडणारे नसल्याचे मत कामगार संघटनांनी व्यक्त केले आहे.

विविध खात्यांमध्ये मूलभूत प्रशासकीय कामे करणारे लिपिक आणि उद्याने, विधी आणि अभियंता खात्यातील तांत्रिक कर्मचारी यांसारख्या कामांसाठी 6 महिने किंवा 1 वर्ष या कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार घेण्यात येणार आहेत. त्यांना विद्यार्थी-वेतन देण्यात येईल. मात्र त्यांचा महापालिकेच्या नोकरीवर अधिकार राहणार नाही. या शिकाऊ उमेदवारांनी महापालिकेत काम करून महापालिकेतील कामांच्या अनुभवाच्या जोरावर अन्य ठिकाणी त्यांना नोकरीचा मार्ग खुला होईल, असेही म्हटले आहे. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांमधील तरतुदीनुसार महापालिका या शिकाऊ उमेदवारांना मूलभूत विद्यार्थी-वेतन देऊ शकेल.

वेतनावरील खर्च कमी करण्यात येणार असल्याने आस्थापना खर्च कमी होणार आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या अतिकालिक भत्त्याचे प्रमाण कमी होईल. त्यासाठी कर्मचाऱ्यांची कर्तव्ये आणि कामाचे तास निश्‍चित करण्यात येणार असल्याचेही अर्थसंकल्पात स्पष्ट केले आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप