Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

उमेदवारांच्या सोईसाठी MPSC मार्फत लवकरच येणार अ‍ॅप

MPSC Will Launch App For All Online Procedure

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा(एमपीएससी) कारभार सुधारावा, गतिमानता यावी अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत असत असतात. त्यात दृष्टीने ‘एमपीएससी’ एक पाऊल पुढे टाकून ;उमेदवारांच्या सोईसाठी अ‍ॅप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

पदवी शिक्षणानंतर राज्य शासनात नोकरी मिळावी म्हणून राज्यातील पदवीधर स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतात. पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे ग्रामीण भागातील विद्यार्थी ‘एमपीएससी’च्या अभ्यासासाठी क्लास लावतात. पुण्यात तर या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून, दरवर्षी सुमारे ४० ते ५० हजार विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज भरत असतात. तर महाराष्ट्रभरातून किमान ३ ते ४ लाख विद्यार्थी विविध परीक्षां देतात.

MPSC Will Launch App For All Online Procedure

‘एमपीएससी’चा अभ्यास करताना आयोगाकडून येणाऱ्या सूचना, बदललेले नियम, परीक्षांचे वेळपत्रक व त्या संदर्भातील परिपत्रक, परीक्षा अर्ज भरणे, हाॅल तिकीट, परीक्षेचा निकाल, त्यानंतरची सर्व प्रक्रिया यासाठी संकेस्थळासाठी अवलंबून रहावे लागते. मोबाईलवर संकेतस्थळाला भेट देऊन सर्व गोष्टी तपासणे गैरसोयीचे ठरत आहे. परीक्षा अर्ज मोबाईलवर भरणे अवघड जाते, त्यामुळे लॅपटॉपची व्यवस्था करावी लागते किंवा इंटरनेट कॅफेवर जावे लागते.

उमेदवारांची गैरसोय लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ने अ‍ॅप विकसीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. पुढील काही महिन्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मोबाईल मध्ये हे अ‍ॅप असणार आहे.

काय असणार अ‍ॅपमध्ये

  • अ‍ॅपमध्ये ‘एमपीएससी’च्या कामातील प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये पारदर्शकतेसाठी मानवी हस्तक्षेप पूर्णपणे टाळून सर्व गोष्टी ऑनलाईन करता येणार आहेत.
  • दरवर्षी आयोगातर्फे दरवर्षी किती परीक्षा घेण्यात येतात, किती जिल्ह्यात किती ;सेंटर असतात, तेथे वर्ग खोल्या किती असतात, एका वर्गात किती उमेदवार परीक्षा देतात यापासून ते परीक्षा अर्ज भरण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात, प्रत्येक परीक्षेसची पात्रतेची नियमावली, निकाल लागल्यानंतरची प्रक्रिया याचाही विचार करण्यात आला आहे.
  • हे अ‍ॅप खासगी कंपनीकडून तयार करून घेतले जात असले तरी याची मालकी ‘एमपीएससी’कडे असणार आहे. तसेच उमेदवारांची वैयक्तिक माहिती, अ‍ॅपची सायबर सुरक्षा याला ही महत्व देण्यात आले आहे. याही निविदेतील नियम व अटींमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे.
दिव्यांग फ्रेंडली अ‍ॅप

राज्य शासनाच्या पदभरतीमध्ये दिव्यांगांसाठी पदे आरक्षीत असतात. त्यांना ही हे अ‍ॅप वापरणे सोपे जावे याचा विचार केला आहे. तसेच चाट विंडो, परीक्षा केंद्राचे लोकेशन, फिडबॅक, थम इंप्रेशन सह लेखी स्पष्टीकरण, तसेच वेगवेगळ्या अँगलमधून लाईव्ह फोटो काढण्याची व्यवस्था या अ‍ॅपमध्ये असणार आहे

एवढ्या जिल्ह्यात होते परीक्षा
  • – वर्षभरात होणाऱ्या परीक्षा – १०
  • – राज्यभरातील परीक्षा केंद्र – १२००
  • – एका जिल्ह्यात परीक्षा केंद्र – १ ते १५०
  • – राज्यभरात लागणारऱ्या वर्गखोल्या – १५०००
  • – एका जिल्ह्यात जास्तीत जास्त लागणाऱ्या;खोल्या – १९००
  • – एका परीक्षा केंद्रावरचे कमाला विद्यार्थी – ५०४
  • – एका खोलीत कमाला विद्यार्थी – २४
  • – परीक्षेचे दिवस – १ ते ३

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड