Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

‘पीएसआय’ भरतीचा निकाल जाहीर करण्यास मनाई – ‘मुलाखती घ्या, परंतु निकाल नको’ | MPSC PSI Result 2024

MPSC PSI Result 2024 -mpsc.gov.in

‘PSI’ recruitment result barred

MPSC PSI Result 2024: A dispute has reached the Maharashtra Administrative Tribunal (MAT) over the fact that the seats reserved for ‘orphan’ candidates in the recruitment process for the posts of Police Sub-Inspector (PSI) like one per cent reservation in the open category were left vacant and were not included in the next recruitment process. Therefore, ‘MAT’ has given an interim order to the government not to announce the result till March 21 while seeking a reply from the state government.

 

पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांच्या भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गातील एक टक्का आरक्षणाप्रमाणे ‘अनाथ’ उमेदवारांसाठी राखीव असलेल्या जागा रिक्त राहिल्यानंतर त्या पुढच्या भरती प्रक्रियेत समाविष्ट केल्या नसल्याचा वाद महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) पोचला आहे. त्यामुळे ‘मॅट’ने याबाबत राज्य सरकारकडे उत्तर मागतानाच २१ मार्चपर्यंत निकाल जाहीर न करण्याचा अंतरिम आदेश सरकारला दिला आहे. या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाच्या २ एप्रिल २०१८ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे (जीआर) अनाथ मुलामुलींना शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २८ फेब्रुवारी २०२० रोजीच्या जाहिरातीप्रमाणे राबवलेल्या ६५० पीएसआय पदांच्या भरती प्रक्रियेत सहा जागा अनाथ उमेदवारांसाठी राखीव होत्या. त्यातील दोन जागा या पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने रिक्त राहिल्या. त्यानंतर एमपीएससीने २८ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या जाहिरातीद्वारे ३७६ पीएसआय पदांची भरती प्रक्रिया सुरू केली. त्यात अनाथ उमेदवारांसाठी चार जागा राखीव ठेवण्यात आल्या. परंतु, आधीच्या रिक्त दोन जागा या भरतीप्रक्रियेत समाविष्ट करण्यात आल्या नाहीत. वास्तविक आधीच्या दोन व नंतरच्या चार, अशा सहा जागा राखीव ठेवणे आवश्यक होते, असे निदर्शनास आणत अमोल शिंदे यांनी अॅड. आशीष गायकवाड यांच्यामार्फत ‘मॅट’ मध्ये अर्ज केला आहे.

MPSC PSI Result 2024

२०२० मधील भरती प्रक्रियेतील रिक्त जागा पुढे ओढणे बंधनकारक नाही

‘संबंधित भरती वर्षांत अनाथ उमेदवार उपलब्ध न झाल्यास आरक्षणाचा अनुशेष पुढे न ओढता खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार इतर उमेदवारांची नियुक्ती करावी, असे सरकारच्या २ एप्रिल २०१८ रोजीच्या जीआरमध्ये स्पष्ट केलेले आहे. तसेच २३ ऑगस्ट २०२१ रोजीचा जीआर हा पुढील काळात लागू राहणार आहे. त्यामुळे २०२० मधील भरती प्रक्रियेतील रिक्त जागा पुढे ओढणे बंधनकारक नाही’, असा युक्तिवाद मुख्य सरकारी वकील स्वाती मणचेकर यांनी ‘मॅट’च्या अध्यक्ष न्या. मृदुला भाटकर व सदस्य देवाशिष चक्रवर्ती यांच्या खंडपीठासमोर मांडला.

‘मुलाखती घ्या, परंतु निकाल नको’

चालू भरती प्रक्रियेत १९ व २० मार्च रोजी मुलाखती होत असल्याने अंतरिम आदेश आवश्यक आहे, असे म्हणणे अॅड. गायकवाड यांनी मांडले. तर उत्तर दाखल करण्यासाठी मुदत देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली. त्यामुळे मुलाखती घ्या; मात्र सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत म्हणजे २१ मार्चपर्यंत निकाल जाहीर करू नका, असा अंतरिम आदेश खंडपीठाने सरकारला दिला


MPSC PSI Bharti Result 2024

MPSC PSI Result 2024: Maharashtra Secondary Service Main Examination-2022 Combined Paper No.1 and Paper No.2 Police Sub-Inspector Result has been announced on 13th March 2024. Exam was conducted by Maharashtra Public Service Commission on October 01, 2023 and October 29, 2023 respectively.  The list of names and cut-off marks along with meeting numbers of the candidates who have qualified in the main examination for the given cadre has been released on the Commission’s website https://mpsc.gov.in.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अनुक्रमे दिनांक ०१ ऑक्टोबर, २०२३ रोजी व दिनांक २९ ऑक्टोबर, २०२३ या दिवशी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०२२ संयुक्त पेपर क्रमांक १ व पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षक या संवर्गामधून शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक १३ मार्च, २०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत संवर्गाकरीता मुख्य परीक्षेत अहंताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

  • प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीसंदर्भात मूळ अर्ज क्रमांक ६४४/२०२२ अंतर्गत दाखल संकीर्ण अर्ज क्रमांक १२४/२०२४ वरील मा. न्यायाधिकरणाच्या निकालाच्या अधीन तृतीयपंथी उमेदवारांचा निकाल राखून ठेऊन मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत आहे.
  • प्रस्तुत मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, मुख्य परीक्षेच्या निकालाआधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.
  • प्रस्तुत निकालाआधारे शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या व अर्जात प्राविण्यप्राप्त (गुणवत्ताधारक) खेळाडूचा दावा केलेल्या उमेदवारांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक १ जुलै, २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार तसेच त्यास अनुसरुन प्रसिध्द करण्यात आलेल्या दिनांक १८ ऑगस्ट, २०१६ व दिनांक ११ मार्च, २०१९ रोजीच्या शुध्दिपत्रकातील तरतुदीनुसार तसेच दिनांक २४ ऑक्टोबर, २०१९ रोजीच्या शुध्दीपत्रकानुसार विषयांकित अराजपत्रित गट-ब पदाकरिता त्यांचे क्रीडा विषयक प्रमाणपत्र वैध ठरते किंवा कसे याच्या पडताळणीकरीता सदर प्रमाणपत्र संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालकांकडे पूर्व परीक्षेचा अर्ज स्वीकारण्याच्या दिनांक २३ जून, २०२२ या अंतिम दिनांकास किंवा तत्पूर्वी सादर केल्याची पोचपावती, उक्त दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे संबंधित क्रीडा प्रमाणपत्र व सदर क्रीडा विषयक प्रमाणपत्र गट-ब पदाकरिता वैध ठरत असल्याबाबतचा संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालकांचा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल मुलाखतीच्या वेळेस सादर करणे अनिवार्य राहील
  • प्रस्तुत मुख्य परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जाद्वारे सादर केलेले दावे/अर्हतेच्या आधारेच निवडीसाठी पात्रता आजमाविण्यात येईल.
  • आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
  • प्रस्तुत परीक्षेचा निकाल विविध मुद्यांसंदर्भात मा. न्यायालयात/मा. न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
  • सदर पदाचा शारीरिक चाचणी व मुलाखत कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर त्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावरुन स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
  • शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्यात येईल. याबाबतचा सविस्तर तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
  • प्रस्तुत निकालातील अर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुर्णाची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.
Download MPSC PSI Merit List 2024

 

Police Sub Inspector Exam Result Declared 

MPSC PSI Result 2023: Out of total 650 posts of Police Sub-Inspector Cadre in Maharashtra Secondary Services Non-Gazetted Group B Main Examination 2020 held by Maharashtra Public Service Commission on 11th September 2022 (Paper No. 1) and 25th September 2022 (Paper No. 2) of Economically Weaker Section (EWS) category. The final result of remaining 583 posts has been declared today, keeping the result of 65 posts reserved subject to the decision of the High Court.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ११ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक १) व दिनांक २५ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक २) रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा २०२० मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या एकूण ६५० पदांपैकी आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गाच्या ६५ पदांचा निकाल उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राखीव ठेवून उर्वरित ५८३ पदांचा अंतिम निकाल आज  जाहीर करण्यात आला आहे.

या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

परीक्षेच्या जाहिरातीत अनाथ प्रवर्गासाठी ०६ पदे राखीव होती. तथापि, अंतिम निकालात केवळ ०४ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले असल्यामुळे अनाथ प्रवर्गाची ०२ पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.
या परीक्षेच्या जाहीर केलेल्या निकालानुसार वाशिम जिल्ह्यातील श्री. खचकड सुनिल भगवान,  हे राज्यातून तसेच मागासवर्गातून प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून अहमदनगर जिल्हयातील श्रीमती बिडगर सुरेखा रमेश,  ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत.
आयोगाच्या संकेतस्थळावर कट ऑफ मार्क्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या ५८३ उमेदवारांचा गुणवत्ताक्रम आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गासाठी राखीव ६५ पदांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अंतिम करण्यात येईल.
अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

MPSC PSI Final Result PDF

१. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ११ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक १) व दिनांक २५ सप्टेंबर २०२२ ( पेपर क्रमांक २) रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब मुख्य परीक्षा – २०२० मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या एकूण ६५० पदांपैकी आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गाच्या ६५ पदांचा निकाल मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राखीव ठेवून उर्वरित ५८३ पदांचा अंतिम निकाल दिनांक १९ जुलै २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीत अनाथ प्रवर्गासाठी ०६ पदे राखीव होती. तथापि, अंतिम निकालात केवळ ०४ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले असल्यामुळे अनाथ प्रवर्गाची ०२ पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.
२. प्रस्तुत परीक्षेच्या जाहीर केलेल्या निकालानुसार वाशिम जिल्हयातील श्री. खचकड सुनिल भगवान, बैठक क्रमांक A001116 हे राज्यातून तसेच मागासवर्गातून प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून अहमदनगर जिल्हयातील श्रीमती बिडगर सुरेखा रमेश, बैठक क्रमांक Ns002006 ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत.
३. उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
४. प्रस्तुत ५८३ उमेदवारांचा गुणवत्ताक्रम आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) प्रवर्गासाठी राखीव ६५ पदांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अंतिम करण्यात येईल.
५. प्रस्तुत निकालाधारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठयर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहेत. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास, शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

MPSC PSI Mains 2020 Merit List

MPSC PSI Result 2023: Maharashtra Secondary Services Main Examination 2020-Police Sub-Inspector Cadre General Merit List and Provisional Selection List has been published. Also, a web link is being made available from 5th to 11th July, 2023 to exit the recruitment process. Candidates can download MPSC PSI Mains Exam 2022 Provisional selection and Merit List from below link :

जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच,भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.5 ते 11 जुलै, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

१. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा – २०२० पोलीस उप निरीक्षक या परीक्षेची तात्पुरती गुणवत्तायादी व ई.डब्ल्यु.एस. प्रवर्गासाठी राखीव असलेल्या ६५ पदांचा निकाल राखीव ठेऊन तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून त्याआधारे उमेदवारांकडून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत आहे.
२. प्रस्तुत परीक्षेची सदर तात्पुरती निवड यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये / शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो व पर्यायाने उमेदवारांचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो, उमेदवार अपात्र ठरू शकतो.
३. आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील मा. न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गासाठी राखीव पदांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
४. प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दिनांक ५ जुलै, २०२३ रोजी १२:०० वाजेपासून दिनांक ११ जुलै, २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. उमेदवारांकडून सदर विकल्प प्राप्त झाल्यानंतर आवश्यक तपासणीनंतर अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
५. ऑनलाईन पध्दतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राहय धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब / निवेदने / पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाहीत.
६. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्पाधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणाऱ्या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही.
७. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या १८०० १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा Support- online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.

Adv.No.260/2021 Maharashtra Subordinate Services Non-Gazetted Group-B Main-2020-Police Sub Inspector-Announcement regarding Provisional Selection List and Opting out

Adv.No.260/2021 Maharashtra Subordinate Services Non-Gazetted Group-B Main-2020-Police Sub Inspector-Provisional Selection List

Adv.No.260/2021 Maharashtra Subordinate Services Non-Gazetted Group-B Main-2020-Police Sub Inspector-General Merit List


MPSC PSI Result 2022

MPSC PSI Result 2022: Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the Sub Inspector of Police Limited Divisional Competition Main Exam 2021 final result & merit list. Click on the below link to download the result.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत जाहिरात क्रमांक 52/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

MPSC PSI Mains Result 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३० जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण २५० पदांपैकी २४९ पदांचा अंतिम निकाल संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अधीन राहुन दिनांक १५ डिसेंबर, २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

  • प्रस्तुत परीक्षेमधील काही उमेदवारांसंदर्भात प्रतिरोधित करण्याची कार्यवाही प्रस्तावित असल्यामुळे एका पदाचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
  • सदर परीक्षेमध्ये बीड जिल्ह्यातील श्री. नाकाडे भागवत महादेव, बैठक क्रमांक MB ००२३५५ हे राज्यात प्रथम आले आहेत.
  • उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्रस्तुत निकालात नमुद केलेल्या सर्व शिफारसपात्र उमेदवारांच्या शिफारशी, त्यांनी प्रस्तुत परीक्षेच्या अर्जात नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पदासाठीची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या तसेच आरक्षणाचे दावे/प्रमाणपत्रे विहित प्राधिकरणाकडून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून शासनाकडे करण्यात येत आहेत. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता न केल्यास, शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. 

MPSC PSI Final Result 2022

निकाल डाउनलोड करा – https://bit.ly/3jaJfoc
गुणवत्ता यादी – https://bit.ly/3WmCfmh

MPSC PSI Result 2022

MPSC PSI Result 2022: Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the Sub Inspector of Police Limited Divisional Competition Main Exam 2021 General Merit List & Temporary Selection List. Click on the below link to download the list.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत जाहिरात क्रमांक 52/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 भरतीप्रक्रियेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.10 डिसेंबर 2022 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC PSI General Merit List | MPSC PSI Temporary Selection List

राज्य शासनाच्या सेवेतील पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील २५० पदांवरील नियुक्तीसाठी दिनांक ११ फेब्रुवारी, २०२२ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार दिनांक १६ एप्रिल, २०२२ रोजी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा – २०२१ चे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या दिनांक ०९ जून, २०२२ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा – २०२१ चे आयोजन दिनांक ३० जुलै, २०२२ रोजी करण्यात आले व मुख्य परीक्षेचा निकाल दिनांक २३ सप्टेंबर, २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेच्या निकालाआधारे एकूण १०३१ उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले.

MPSC PSI Mains Result

  • शारीरिक चाचणीसाठी पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी दिनांक २८ नोव्हेंबर, २०२२ ते दिनांक ०२ डिसेंबर, २०२२ या कालावधीत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित पध्दतीने पुणे केंद्रावर घेण्यात आली. शारीरिक चाचणीचा कार्यक्रम संपल्यानंतर त्वरीत प्रस्तुत परीक्षेची २४९ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून त्या आधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत आहे.
  • सदर तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी या निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाच्या असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणी अंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये / शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.
  • प्रस्तुत तात्पुरती निवड यादी मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.
  • आयोगामार्फत घेण्यात आलेल्या प्रस्तुत परीक्षेकरीता काही उमेदवार यांचे विरुध्द प्रतिरोधीत करण्याबाबतची कार्यवाही प्रस्तावित असल्यामुळे त्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला असून त्यांचा सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
  • प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दिनांक ३ डिसेंबर, २०२२ रोजी १२.०० वाजेपासून दिनांक १० डिसेंबर, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
  • ऑनलाईन पध्दतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राहय धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब / निवेदने / पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाहीत.

भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्पाआधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणा-या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही. ९. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support-online@mpsc.gov.in या ई- मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.

तात्पुरती निवड यादी – https://bit.ly/3XRKwjD
सामान्य गुणवत्ता यादी – https://bit.ly/3uhxEGf

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    PSI Result is Out

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड