Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

‘कर सहायक’ मुख्य परीक्षेसह टंकलेखन कौशल्य चाचणी निकाल नियमानुसार | MPSC Group C Result 2024

MPSC Group C Result 2024-mpsc.gov.in

MPSC Group C Tax Assistant Result 2024

MPSC Group C Result 2024:  The Commission has clarified that only the candidates who have opted for ‘Tax Assistant’ cadre in the application form for preliminary examination of Maharashtra Group-C Services Joint Examination of Maharashtra Public Service Commission – 2023 are qualified on merit for the main examination and typing skill test.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा – 2023 मधील पूर्व परीक्षेसाठीच्या आवेदनापत्रात ‘कर सहायक’ संवर्गाचा विकल्प दिलेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी आणि टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता गुणवत्तेवर पात्र ठरविण्यात आले असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. कट ऑफ बघण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (मुख्य) परीक्षा – 2023 या परीक्षेचा निकाल आयोगाकडून दिनांक 16 एप्रिल, 2024 रोजी जाहीर करण्यात आला आहे. निकाल संगणकीय संस्करण पद्धतीने तयार करण्यात आला असून पूर्णत: अचूक आहे. प्रस्तुत पदासाठी अर्ज केलेला नसतानाही उमेदवार पात्र ठरले असल्याची तसेच पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेली नसतानाही टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरले असल्याची बाब काही वर्तमानपत्रातील बातम्यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून ती पूर्णत: चुकीची आहे.

आयोगाकडून निकालाची कार्यवाही प्रचलित नियमांआधारे करण्यात आलेली असून ती योग्य आहे. प्रस्तुत निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येत नाही. शासनस्तरावर प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याच्या अधीन राहून उमेदवारांची शासनास शिफारस करण्यात येते.

कर सहायक या संवर्गाकरिता प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व अंशकालीन पदवीधर उमेदवार या वर्गवारीस आरक्षण नाही. तथापि, सदर वर्गवारीच्या काही उमेदवारांनी अर्जात सामाजिक आरक्षणाचा (अ.ज.,अ.जा.,वि.जा.(अ), भ.ज.(ब), भ.ज.(क), भ.ज.(ड), इ.माव., आ.दु.घ. इ.) तसेच अन्य समांतर आरक्षणाचा (महिला, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग इ.) दावा केलेला आहे. सदर दावे व उमेदवारांनी लेखी परीक्षेत प्राप्त केलेले गुण विचारात घेऊन त्यांचा टंकलेखन कौशल्य चाचणीच्या निकालाकरिता विचार करण्यात आला आहे. या परीक्षेच्या जाहिरातीमधील परि. क्र. 6.3.4 मध्ये नमूद केल्यानुसार सदर उमेदवारांना टंकलेखन प्रमाणपत्रे धारण करण्यापासून संबंधित शासन निर्णयांन्वये सूट देण्यात आली आहे.

आयोगाकडून सर्वच परीक्षा अत्यंत सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने घेण्यात येतात तसेच प्रचलित नियमांनुसार व निव्वळ गुणवत्तेवर निवडप्रक्रिया राबविण्यात येतात. आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निकालाच्या अनुषंगाने विपर्यास करणाऱ्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्यांकडे उमेदवारांनी लक्ष न देता आगामी परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे, असे आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

परीक्षा नियंत्रकपदाचे स्पष्टीकरण कधी?

एमपीएससीच्या आकृतीबंधामध्ये परीक्षा नियंत्रक असे कोणतेही पद नाही. तरीदेखील एका अधिकाऱ्याऱ्यांची इच्छा नसताना त्याला या पदावर बसविण्यात आले आहे. या अधिकाऱ्याला पुन्हा मंत्रालयात मूळ नोकरीत जायचे आहे, असे असताना त्यांना परीक्षा नियंत्रकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान परीक्षांच्या निकालांमध्ये गोंधळ होत असल्याची माहिती समोर येत आहे. मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना एमपीएससीच्या सदस्यांच्या नावाने निनावी फोन जात आहेत. तसेच ‘ऑप्टिंग आऊट’ हा पर्याय वापरून स्पर्धेतून बाहेर पडावे, यासाठी प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांकडून थेट संबंधित उमेदवारांना फोन लावले जात आहेत. उमेदवारांचे फोन नंबर कसे काय बाहेर पडत आहेत? हा एकप्रकारे उमेदवारांच्या माहितीच्या गोपनीयतेचा भंग होत आहे. असे असतानादेखील एमपीएससीने याबाबत कोणतेही स्पष्टीकरण अद्याप दिलेले नाही. त्यामुळे एमपीएससीच्या हेतूवर विद्यार्थ्यांकडून संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.

 


MPSC SUB INSPECTOR, STATE EXCISE Final Merit List

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक संवर्गाच्या अनाथांची दोन पदे जाहिरातीत समाविष्ट करून एकूण ३७८ पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. कट ऑफ बघण्यासाठी येथे क्लिक करा

आयोगाने प्रसिद्ध केलेली गुणवत्ता यादी तात्पुरत्या स्वरूपाची असून, उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दावा आणि शिफारशीत बदल होऊ शकतो. तसेच खेळाडू प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिकाऱ्यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे. तसेच त्यांचा तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये समावेश केला आहे. न्यायालयात दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्याय निर्णयाच्या अधीन राहून यादी जाहीर केल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

 

MPSC Group C Result 2024-mpsc.gov.in: Maharashtra Public Service Commission on December 17, 2023 held at Navi Mumbai along with Aurangabad, Amravati, Nagpur, Nashik and Pune Maharashtra Group-C Services (Main) Examination-2023 Technical Assistant, Group-C Cadre Final Result Dated April 10, 2024 has been announced on Accordingly, 01 candidate is being recommended for the given post.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १७ डिसेंबर, २०२३ रोजी नवी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे येथे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ मधील तांत्रिक सहायक, गट-क या संवर्गाचा अंतिम निकाल दिनांक १० एप्रिल, २०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ०१ उमेदवाराची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात येत आहे.

  • सदर परीक्षेमध्ये सोलापूर जिल्हयातील श्री. घुगे विकास अशोक (बैठक क्रमांक AU045053) हे राज्यातून व मागासवर्गवारीतून प्रथम आले आहे.
  • उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व भ.ज. (ड) सर्वसाधारण प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेला उमेदवाराचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
  •  प्रस्तुत निकालाधारे शिफारसपात्र ठरलेला उमेदवाराचे शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहेत. उमेदवारानी
  • आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास, शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य
    कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. ६. प्रस्तुत निकालानुसार मागास आरक्षित पदावर शिफारसपात्र उमेदवाराची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
  •  प्रस्तुत परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या मुद्दयांसदर्भात तसेच अन्य मुद्दयासंदर्भात मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणामध्ये दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकरणांमधील अंतिम न्यायनिर्णयांच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.
  • प्रस्तुत अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.
Download MPSC Group C SI Final Merit List
MPSC Technical Assistant Merit List

MPSC Group C Opting Out Link

MPSC Group C Result 2024-mpsc.gov.in: The General Merit List and Provisional Selection List of the Secondary Inspector, State Excise, Technical Assistant, Directorate of Insurance in the Subject Examination has been published on the website of the Commission and based on that the candidates are invited to opt out of the recruitment process. A ‘Post Preference / Opting Out’ web link is being made available in the ‘ONLINE FACILITIES’ menu on the Commission’s website https://mpsc.gov.in for opting out of the recruitment process of the present cadre. The said weblink will be open from 12.00 PM on 28th March, 2024 to 23.59 PM on 03rd April, 2024.  The said General Merit List and Provisional Selection List are purely provisional and there may be changes in the claims / recommendation of some candidates after verification before the final result as per the various claims in the application of the candidates.

विषयांकित परीक्षेतील दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहायक, विमा संचालनालय या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून त्याआधारे उमेदवारांकडून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत आहे. सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी या निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाच्या असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये / शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दिनांक २८ मार्च, २०२४ रोजी १२.०० वाजेपासून दिनांक ०३ एप्रिल, २०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.

  • प्रस्तुत सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी मा. न्यायालय / मा. न्यायाधिकरण येथे दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.
  • प्रस्तुत संवर्गाच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दिनांक २८ मार्च, २०२४ रोजी १२.०० वाजेपासून दिनांक ०३ एप्रिल, २०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
  • ऑनलाईन पध्दतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियांतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राहय धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब / निवेदने / पत्रव्यवहार तनंतर विचारात घेतली जाणार नाहीत.
  •  भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्पाआधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणा-या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही.
  • भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support- online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.
Click Here For MPSC Group C Opting Out – Active On  28th March 2024

Notice For Opting Out

Provisional Selection List

General Merit List


MPSC Group C List 2023 – mpsc.gov.in

MPSC Group C Result 2023 : Maharashtra Group-C Services (Main) Examination 2022- Final Merit List and Final Recommendation List of Clerk-Typist has been published on the official MPSC handle. Candidates can check their Group C Mains Final Merit List at below. We have given you a direct link to download your MPSC Group C Clerk Typist Mains Result pdf so that you can get your result without any interference. Scroll Below to get your MPSC Clerk-Typist Final Merit List PDF

जा.क्र.113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2022- लिपिक-टंकलेखक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8185

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8186

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8187

 


जा.क्र.058/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाकरीता प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8089

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8090


MPSC Group C Result 2023-mpsc.gov.in: Maharashtra Public Service Commission on February 04, 2023 and March 04, 2023 held at Aurangabad, Amravati, Nagpur, Nashik and Pune District Centers, Maharashtra Group-C Service (Main) Exam-2022.  Final Result of Tax Assistant Group-C Cadre has been announced on November 24, 2023. Accordingly, a total of 475 candidates of Tax Assistant Group-C are being recommended for the given post. Download MPSC Group C Result 2023, Check How To Download MPSC Group C Tax Assistant Mains Result PDF at below:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२३ व दिनांक ०४ मार्च, २०२३ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ मधील कर सहायक गट-क या संवर्गाचा अंतिम निकाल दिनांक २४ नोव्हेंबर, २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार कर सहायक गट-क या संवर्गाच्या एकूण ४७५ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात येत आहे.कट ऑफ बघण्यासाठी येथे क्लिक करा

जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 5) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे

LIST OF CANDIDATES – ELIGIBLE FOR RECOMMENDATION THROUGH WAITING LIST (LOT – 5)
MPSC Group C Tax Assistant Final Merit List PDF
  • कर सहायक गट-क या संवर्गातून औरंगाबाद जिल्हयातील श्री. राठोड विशाल पंढरीनाथ (बैठक क्रमांक -AU००२३८०) हे राज्यातून व मागासवर्गवारीतून प्रथम आले आहेत. महिला वर्गवारीतून लातूर जिल्हयातील श्रीमती सुर्यवंशी सुलभा बालाजी (बैठक क्रमांक AU००३१७४) ह्या प्रथम आल्या आहेत.
  • उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
  • प्रस्तुत निकालाधारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहेत. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास, शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
  • प्रस्तुत निकालानुसार मागास आरक्षित पदावर शिफारसपात्र उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
  • प्रस्तुत परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या मुद्दयांसदर्भात तसेच अन्य मुद्दयासंदर्भात मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणामध्ये दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकरणांमधील अंतिम न्यायनिर्णयांच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.
  • प्रस्तुत अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.
Download CATEGORYWISE DETAILS OF NO. OF POSTS ADVERTISED AND CANDIDATES ELIGIBLE FOR RECOMMENDATION AS PER THEIR ORIGINAL CATEGORY

MPSC Group C Result 2023 Link

MPSC Group C Result 2023: Maharashtra Group-C Service (Main) Examination – 2022 List of Candidates Qualified for Typing Skill Test from Clerical Typist (Marathi / English) and Tax Assistant Cadres thrice the advertised number of posts dated 03 May 2023 and 18 May 2023 respectively. It was released on 2023. Typing skill test of said candidates was conducted on 24th and 25th July 2023 by the commission. The category wise result of the present Typing Skill Test has been published on the website of the Commission on 14 September 2023. Download MPSC Group C Result 2023, MPSC Group C Mains Result 2023, MPSC Group C Clerk Typist Result 2023, MPSC Group C Tax Assistant Result 2023

जा.क्र.113/2022 & 115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा-2022 मधील लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) व कर सहायक या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

????MPSC लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या व तात्पुरत्या निवड याद्या प्रसिध्द! -MPSC Group C Selection And Merit List


MPSC Group C Result 2023

टंकलेखन सॉफ्टवेअरपासून ते परीक्षेच्या निकषांपर्यंत विविध कारणांनी बहुचर्चित ठरलेल्या लिपिक-टंकलेखक भरतीचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने गट-क सेवा परीक्षा २०२१मधील लिपिक टंकलेखक आणि करसहायक पदासाठीचा अंतिम निकाल घोषित केला आहे. टंकलेखक भरतीमध्ये मराठी संवर्गातून लातूर जिल्ह्यातील सूरज फडणीस आणि इंग्रजी संवर्गातून कोल्हापूर जिल्ह्यातील विनायक वजरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर महिलांमध्ये अनुक्रमे राधिका गोलहार आणि ज्योती काटे यांनी बाजी मारली आहे. आयोगाने लिपिक टंकलेखक पदासाठी मराठी संवर्गात एक हजार ६२ तर इंग्रजी संवर्गासाठी १६ उमेदवारांची अंतिम शिफारस यादी घोषित केली आहे. आयोगाच्या वतीने कर सहायक संवर्गाचाही अंतिम निकाल घोषित करण्यात आला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील राहुल विजय जेंगठे यांनी प्रथम तर महिला वर्गवारीतून अहमदनगर जिल्ह्यातील रिंकल हाडके यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ‘एमपीएससी’ने २२५ उमेदवारांची शिफारस जाहीर केली आहे. उमेदवारांना क्रमवारीसह त्यांचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. न्यायिक प्रकरणांमध्ये अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निकाल जाहीर केल्याचे ‘एमपीएससी ने स्पष्ट केले आहे. निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची आहे, अशा उमेदवारांनी १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

 

जा.क्र.58/2022 व 60/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

 

MPSC Group C Result 2023: A LIST OF CANDIDATES – ELIGIBLE FOR RECOMMENDATION THROUGH WAITING LIST has been published on MPSC official Site. Those candidates who had applied for MPSC Group C Industrial Inspector Exam 2021 can download this list. And Check your result from the below PDF by finding your roll Number.

उमेदवारांची यादी – प्रतीक्षा यादीद्वारे शिफारस करण्यास पात्र एमपीएससीच्या अधिकृत साइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी एमपीएससी ग्रुप सी इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर परीक्षा २०२१ साठी अर्ज केला होता ते ही यादी डाउनलोड करू शकतात.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC Group C Industrial Inspector Waiting List 2021

MPSC Group C Result 2023

 


MPSC Group C Result 2023

MPSC Group C Result 2023 – LIST OF CANDIDATES – ELIGIBLE FOR RECOMMENDATION THROUGH WAITING LIST has been published on MPSC official handle. Those candidates who had applied for MPSC Group C Technical Assistant Exam 2021 can download this list. And Check your result from below PDF by finding your roll Number.

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – २०२९ (जाहिरात क्रमांक-६१/२०२२) तांत्रिक सहायक संवर्गाच्या प्रतीक्षायादीवरील उमेदवारांच्या शिफारशीबाबत शासनाने दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२३ रोजीच्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा – २०२१ मधील तांत्रिक सहायक संवर्गाच्या (जाहिरात क्र. ६१ / २०२२) प्रतीक्षायादी मधून एकूण ०६ उमेदवारांची शिफारस शासनास करण्यात येत आहे.

  • प्रस्तुत परीक्षेच्या प्रतीक्षायादीवरील उमेदवारांच्या शिफारशी त्यांनी प्रस्तुत परीक्षेच्या अर्जात नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता नियुक्तीपूर्वी शासन स्तरावरुन मूळ प्रमाणपत्रांच्या आधारे तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून शासनाकडे करण्यात येत आहेत. सदर तपासणीत उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता न केल्यास शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना किंवा अन्य कारणामुळे अपात्र ठरणा-या संबंधित उमेदवारांची उमेदवारी/ शिफारस कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
  •  प्रस्तुत परीक्षेच्या अर्जात माजी सैनिक असल्याचा केलेला दावा विचारात घेऊन या उमेदवारांची शिफारस माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या पदावर ते सैनिकी सेवेतील विहित वैध / पुरेसा अनुभव धारण करतात व ते माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या पदासाठी पात्र आहेत आणि त्यांच्याकडे माजी सैनिकांसाठी आवश्यक असलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे आहेत, हे नियुक्तीपूर्वी शासनस्तरावर होणा-या विनिर्दिष्ट पडताळणीत पात्र ठरण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
  •  उमेदवारांच्या माहितीसाठी प्रतीक्षायादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC Group C Result 2023


MPSC Group C Answer Sheet 

MPSC Group C Result 2022 – Maharashtra Group C Services Joint Prelims Exam 2022- Scan answer sheet as well as mark sheet of candidates are available now to download. Students can see their marks in Group C prelims EXam in their Account. You have to login to your MPSC Profile and their you can see OMR Display and download Your MPSC Group C Prelims Answer Sheet.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विषयांकीत परीक्षांकरीता उपस्थित उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रतिमा, निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवाराच्या संबंधित प्रवर्गांकरीताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा उमेदवाराच्या प्रोफाईलमधील ‘My Account ‘ या विभागामधील संबंधित परीक्षेसमोरील View’ व तदनंतर ‘OMR Display ‘ समोरील ‘View वर क्लिक केल्यास उपलब्ध होईल.
उपरोक्त परीक्षेचे गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये दिसत नसल्यास आयोगाच्या १८००- १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support-online@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल.


MPSC Group C Result 2022

MPSC Group C Result 2022 – Finally Wait Is Over !! Maharashtra Public Service Commission has Published Maharashtra Group C Bharti Prelims Exam 2022 on its Official Website Today. Students who have applied For CLERK – TYPIST (MARATHI / ENGLISH), TAX ASSISTANT, SUB INSPECTOR, STATE EXCISE, INDUSTRY INSPECTOR can check their Name in MPSC Group C Qualified candidates List, which is Given below.  All the Students who had applied need to check their Marks in the MPSC group C Prelims Exam and also can see the MPSC Group C Prelims Cut Off Marks.  Candidates who score above this cut off list are named in the MPSC Group C Result 2022  : 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र गट-क सेवा प्रिलिम्स परीक्षा 2022 लिपिक – टंकलेखक (मराठी / इंग्रजी), कर सहाय्यक, उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उद्योग निरीक्षक संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

MPSC Group C Qualified Candidates List

MPSC Group C Prelims Result 2022
Organisation Maharashtra Public Service Commission (MPSC)
Recruitment MPSC Group C 2022
Vacancies 900
Category Sarkari Result
Status Released
MPSC Group C Result 2022 26th Dec 2022
Selection Process Prelims- Mains
Official website https://www.mpsc.gov.in/

MPSC Group C Prelims Result 2022

१.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार दिनांक ०५ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोजित महाराष्ट्र गट-क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा – २०२२ मधील उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहायक व लिपिक-टंकलेखक या संवर्गांसाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांचा संवर्गनिहाय निकाल स्वतंत्रपणे दिनांक २६ डिसेंबर, २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत पदांकरीता पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

२. प्रस्तुत पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या तसेच परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.

३. आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल. ४. मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्रमांक १ व संवर्गनिहाय स्वतंत्र पेपर क्रमांक २ च्या तारखा मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये कळविण्यात येतील…

५. प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या / समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

६. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल.

७. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरीता स्वीकारार्ह ठरतील.

LIST OF CANDIDATES -Clerk Typist – https://bit.ly/3hgQPwG
LIST OF CANDIDATES -Tax Assistant – https://bit.ly/3hgQPwG
LIST OF CANDIDATES – Sub Inspector- https://bit.ly/3hgQPwG
LIST OF CANDIDATES – Industrial Inspector – https://bit.ly/3hgQPwG

MPSC Group C Result 2022: Maharashtra Public Service Commission has declared the Maharashtra Group-C Services (Main) Exam 2021 Technical Assistant, Directorate of Insurance cadre final result. Click on the below link to download the result.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2021 तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC Group C Main Exam Final Result

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०६ ऑगस्ट, २०२२ व दिनांक १० सप्टेंबर, २०२२ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ मधील तांत्रिक सहायक, विमा संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल दिनांक ८ डिसेंबर, २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण १४ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात येत आहे.

  • सदर परीक्षेमध्ये सांगली जिल्हयातील श्री. पाटील मंजूनाथ गोपाळ (बैठक क्रमांक – PN013239) हे राज्यातून प्रथम आले आहेत. मागासवर्गवारीतून हिंगोली जिल्हयातील श्री. पायघन ओमेश किसन (बैठक क्रमांक AU 001198) प्रथम आले आहेत. महिला वर्गवारीतून अमरावती जिल्हयातील श्रीमती पाचंगे अंकिता सुरेश (बैठक क्रमांक AM001079) ह्या प्रथम आल्या आहेत.
  • उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
  • प्रस्तुत निकालाधारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहेत. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास, शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
  • प्रस्तुत परीक्षेच्या अर्जात माजी सैनिक असल्याचा केलेला दावा विचारात घेऊन या उमेदवारांची शिफारस माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या पदावर ते सैनिकी सेवेतील विहित वैध / पुरेसा अनुभव धारण करतात व ते माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या पदासाठी पात्र आहेत आणि त्यांच्याकडे माजी सैनिकांसाठी आवश्यक असलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे आहेत, हे नियुक्तीपूर्वी शासन स्तरावर होणा-या विनिर्दिष्ट पडताळणीत पात्र ठरण्याच्या अटीच्या अधीन राहून, करण्यात येत आहे.
  • प्रस्तुत निकालानुसार दिव्यांग, खेळाडू, मागास इत्यादींसाठी आरक्षित पदावर शिफारसपात्र उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
  • प्रस्तुत परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या मुद्दयांसदर्भात तसेच अन्य मुद्दयासंदर्भात मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणामध्ये दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकरणांमधील अंतिम न्यायनिर्णयांच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.

प्रस्तुत अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.

MPSC Group C Technical Assistant Final Result 

LIST OF CANDIDATES – ELIGIBLE FOR RECOMMENDATION – https://bit.ly/3hgQPwG
MERIT LIST – https://bit.ly/3hcNXkD

Previous Update –

MPSC Group C Result 2022

MPSC Group C Result 2022: Maharashtra Public Service Commission has declared the candidate’s list of eligible for recommendate through the waiting list. Click on the below link to download the list.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत कर सहायक (मुख्य) परीक्षा 2019 ची प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC Tax Assistant Main Exam Result 2022

कर सहायक (मुख्य) परीक्षा-२०१९ (जाहिरात क्रमांक – १६/२०१९) मधून शासनाने दिनांक १५ सप्टेंबर, २०२२ रोजीच्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार १४ उमेदवारांची शिफारस प्रस्तुत पदाच्या प्रतीक्षायादीमधून शासनास करण्यात येत आहे.

  • प्रस्तुत परीक्षेच्या प्रतीक्षायादीवरील उमेदवारांच्या शिफारशी त्यांनी प्रस्तुत परीक्षेच्या अर्जात नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता नियुक्तीपूर्वी शासन स्तरावरुन मूळ प्रमाणपत्रांच्या आधारे तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून शासनाकडे करण्यात येत आहेत.
  • सदर तपासणीत उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता न केल्यास शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना किंवा अन्य कारणामुळे अपात्र ठरणा-या संबंधित उमेदवारांची उमेदवारी/ शिफारस कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
  • अर्जात प्राविण्यप्राप्त (गुणवत्ताधारक) खेळाडूचा दावा केलेल्या उमेदवारांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक १ जुलै, २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार तसेच त्यास अनुसरुन प्रसिध्द करण्यात आलेल्या दिनांक १८ ऑगस्ट, २०१६ व दिनांक ११मार्च, २०१९ रोजीच्या शुध्दीपत्रकातील तरतुदीनुसार आणि तद्नंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार विषयांकित गट-क पदासाठी निश्चित केलेली क्रीडा विषयक अर्हता व क्रीडा प्रमाणपत्र पूर्व परीक्षेच्या अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांकास (६ मे, २०१९) किंवा तत्पूर्वी धारण करणे आवश्यक राहील.
  • तसेच त्यासंदर्भातील संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालकांचा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीबाबतचा अहवाल नियुक्तीपूर्वी शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे.
  • दिव्यांगाकरिता राखीव असलेल्या पदावर शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे वैद्यकीय मंडळाकडून तपासून घेण्याच्या अधीन राहून त्यांची शिफारस करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या वयोमर्यादेचा फायदा घेऊ इच्छिणा-या उमेदवारांनी शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक अप्रकि२०१८/प्रक्र.४६/आरोग्य-६, दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ मधील आदेशानुसार SADM या संगणक प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
  • उमेदवारांच्या माहितीसाठी प्रतीक्षायादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नोटीस – https://bit.ly/3yvNgbx
यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3CNKfpo

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    Final Result of Tax Assistant Group-C Cadre

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड