एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, सोलापूरचा वैभव नवले राज्यात प्रथम

MPSC Exam Result Announced

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीव्दारे २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरिक्षक पदाच्या परीक्षेत सोलापूरचा वैभव अशोक नवले हा राज्यातून प्रथम आला आहे. अहमदनगरमधील ज्ञानदेव रघूनाथ काळे हा मागास प्रवर्गातून प्रथम आला आहे. तर महिला प्रवर्गातून सातारा जिल्ह्यातील दिपाली सुर्यकांत कोळेकर पहिली आली आहे.

MPSC PSI मुख्य परीक्षा २०१८ पात्रता यादी 

कोरोना मुळे MPSC ५ एप्रिल परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी 

एमपीएससीमार्फत पोलिस उपनिरिक्षक गट ब संवर्गातील एकूण ३८७ पदांसाठी २६ ऑगस्ट २०१८ रोजी पेपर क्र.१ आणि २ सप्टेंबर २०१८ रोजी पेपर क्र. २ घेण्यात आला. या परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी (दि.१७) रोजी जाहीर करण्यात आला आहे.

पोलिस उपनिरिक्षक परिक्षा पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर या जिल्ह्यात घेण्यात आली. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारिरीक चाचणी आणि मुलाखतीसाठी १ हजार ६५९ उमेदवार पात्र ठरले होते. या उमेदवारांच्या मुलाखती ६ नोव्हेंबर २०१९ ते २९ जानेवारी २०२० या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. त्यातून ३८७ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांच्या माहितीसाठी परिक्षेचा निकाल आणि प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

सोर्स : पुढारी


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप