राज्य पुरातत्त्व विभागात पन्नास टक्क्यांहून अधिक पदे रिक्त

More than fifty percent of vacancies in the State Archeology Department

महाराष्ट्रातील गड, किल्ले, पुरातन वास्तूंचे वैभव वाचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशा गर्जना सरकार करीत असले तरी वास्तव मात्र वेगळेच आहे. या गड, किल्ल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी राज्याच्या ज्या पुरातत्त्व खात्याची आहे, त्यातील मंजूर ३०० पदांपैकी तब्बल १२८ पदे रिक्त आहेत.

अंशात्मक टिकून राहिलेले, थोडेफार अवशेष असलेले, फक्त तटबंदीच्या स्वरूपात शिल्लक असलेले आणि बऱ्यापैकी टिकून असलेले राज्यात एकूण ३५० किल्ले आहेत. या किल्ल्यांपैकी ४७ किल्ले राष्ट्रीय संरक्षित स्मारके असून ते केंद्र सरकारच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारित आहेत. ४९ किल्ले राज्य संरक्षित स्मारके म्हणून घोषित झाले आहेत. या सर्व किल्ल्यांचे रक्षण आणि जतन करण्याचे काम राज्याच्या पुरातत्त्व विभागाकडे आहे.

गड-किल्ल्यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन-संवर्धन व्हावे, यासाठी शासनाने गड संवर्धन समितीची स्थापना केली. पुरातत्त्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालयाने राज्यातील १४ किल्ले निवडून त्यांच्या जतन-संवर्धनाचा पहिला टप्पा पार पाडला. पण, संवर्धनाच्या मार्गात रिक्त पदांचाही अडसर जाणवू लागला आहे. अनेक किल्ल्यांसाठी राखणदारांची कमतरता आहे.

सद्यस्थितीत पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालये संचालनालयात गट अ ते ड मधील तीनशे पदे मंजूर असून त्यापैकी गट अ, ब, क आणि ड संवर्गातील अनुक्रमे २, १४, ३७ आणि ७५ अशी एकूण १२८ पदे रिक्त आहेत. राज्यातील वारसा (हेरिटेज) वास्तूंमध्ये राज्य पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारितील ५१ किल्ल्यांचा समावेश असून या वारसा वास्तूंच्या देखभालीसाठी सध्याचा कर्मचारी वर्ग अपुरा आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये विविध संवर्गातील केवळ ६ पदे भरण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पुरातत्त्व विभागात मध्यंतरीच्या काळात पदभरती न झाल्याने आणि अनेक कर्मचारी निवृत्त झाल्याने रिक्त पदांची संख्या वाढली. या विभागात शिपाई, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि राखणदारांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. बहुतेक ठिकाणी रोजंदारीवर कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. किल्ले आणि स्मारकांची दुर्दशा रोखणे त्यांच्या आवाक्याच्या पलीकडे गेले आहे. दुसरीकडे, पुरातत्त्व विभागाला मिळणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे देखील अनेक प्रश्न उपस्थित आहेत.

अनेक स्मारकांचे विद्रूपीकरण

राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांचे संवर्धन होणे गरजेचे असताना इतिहासाविषयीची अनास्था त्यांच्यासाठी घातक ठरू लागली आहे. अनेक किल्ले हे पर्यटकांच्या हैदोसाची ठिकाणे बनली आहेत. स्मारकांचे विद्रूपीकरण केले जात आहे. त्याला रोखण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. स्मारकांच्या बाहेर लागलेले इशारा देणारे फलक हे नावापुरते उरले आहेत. कोणावरही कारवाई होत नसल्याने हा ऐतिहासिक वारसा हळूहळू नामशेष होताना दिसत आहे.

सोर्स : लोकसत्ता


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप