Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरतीचा मार्ग मोकळा; लवकरच 124 पदांची होणार भरती

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2022

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2022

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2022 : The Maharashtra Jeevan Pradhikaran has cleared the way for recruitment of posts on a compassionate basis which has been stalled for the last few years and 124 posts in various categories in Group-C and Group-D will be filled soon. Further details are as follows:-

MJP Maharashtra Bharti 2022 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्वावरील पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला असून गट- क व गट – ड मधील विविध संवर्गातील १२४ पदांची भरती करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MJP – Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2022

In Maharashtra Jeevan Pradhikaran i.e. Majipra, as per the Government Resolution dated 26th October 1994, the heirs of Group-C and Group-D employees were being employed on a compassionate basis. Till the year 2000, this system of appointment on a compassionate basis was in operation. However, as per the circular dated March 1, 2000, the state government had banned the filling of vacancies due to retirement, voluntary retirement, death, or resignation. The Maharashtra Jeevan Pradhikaran had also postponed the recruitment on compassionate grounds accordingly.

MJP Bharti 2022

यानंतर, २२ ऑगस्ट २००५ च्या शासकीय निर्णयानुसार प्रति वर्षी रिक्त होणाऱ्या पदांमधील प्रतीक्षा यादीतील ५ टक्के लोकांची पदे भरण्याला मान्यता मिळाली. तर १ मार्च २०१४ च्या निर्णयानुसार ही मर्यादा वाढवून १० टक्के इतकी करण्यात आली. आर्थिक स्थिती नाजूक असल्याने व काही वर्गवारीतील अतिरिक्त पदे बाद झाल्याने मजिप्रा मध्ये २००० नंतर अनुकंपा तत्वावरील भरतीला ब्रेक लागला होता. दरम्यान, २३ ऑगस्ट २०१६ रोजी मजिप्राच्या झालेल्या बैठकीनुसार अनुकंपा तत्वावरील भरतीला मान्यता देण्यात आली. यानुसार २०१६ साली ११ तर २०१८ व २०१९ साली प्रत्येकी १५ पदे भरण्यात आली.

  • दरम्यान, ११ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार २० टक्के पदे विचारात घेऊन प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
  • यातील आधीची १५ पदे वगळता आता एकूण १२४ पदांची भरती करण्यात येणार आहे.
  • यात ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर परिमंडळातील पदांवर अनुकंपा तत्वधारकांना नियुक्ती देण्याबाबत तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे विभागाला निर्देश दिले आहेत.
  • राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतल्याने १२४ अनुकंप धारकांना नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे.

MJP Maharashtra Vacancy 2021

MJP Maharashtra Bharti 2021 : Two cities, Ambernath and Badlapur, are governed by the Ambernath branch. This branch should have 235 employees as per the scheme. However, at present, the entire branch is run on the reliance of only 129 employees. 

MJP Maharashtra Bharti 2021 – चौथी मुंबई म्हणून नावारूपाला येणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ शाखेत तब्बल ४५ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण मंजूर २३५ पदांपैकी अवघे १२९ कर्मचारीच कार्यरत असून त्यामुळे प्राधिकरणाच्या कारभारावर परिणाम होतो आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

देखभाल-दुरुस्तीच्या कामांमध्ये अडचणी येत असून त्यामुळे गळती, चोरी वाढल्याचे दिसून आले आहे. नव्याने होऊ घातलेल्या जलवाहिन्यांच्या नियमानुकूल प्रक्रियेवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होते आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ शाखेत तब्बल ४५ टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर अशा दोन शहरांचा कारभार अंबरनाथ शाखेतून चालतो. या शाखेत आकृतिबंधानुसार २३५ कर्मचारी असणे आवश्यक आहे. मात्र सध्याच्या घडीला फक्त १२९ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर संपूर्ण शाखेचा कारभार हाकला जातो आहे. तर सुमारे १०६ पदे सध्याच्या घडीला रिक्त आहेत. या पदांमध्ये वरिष्ठपदी असलेले कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, शाखा अभियंता यांच्यासह वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, सहाय्यक आरेखक, भांडारपाल, वाहन चालक, शिपाई आणि चौकीदार अशा एक ते चार वर्गातील विविध पदांचा समावेश आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Emran sheikh says

    No

  2. Nitesh says

    Age limit 30-45 tevha… Police bharti..

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड