“सीईटी’साठी अर्ज प्रक्रिया सुरु

MHTCET 2020 Application Form

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) ऑनलाईन अर्ज करण्याचीप्रक्रिया सुरु झाली आहे. सीईटीसाठी अर्ज करण्याची मुदत दि. २९ फेब्रुवारीपर्यंत आहे. आतापर्यंत “एमएचटी-सीईटी’साठी अडीच लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

राज्य सीईटी सेलमार्फत केंद्रीय पद्धतीने व ऑनलाईनद्वारे ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतरच विद्यार्थ्यांना “एमएचटी-सीईटी’ परीक्षेला बसता येईल. मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत २ लाख ५४ हजार ४४७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील २ लाख २६ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच २८ हजार ५१ विद्यार्थ्यांनी अर्ज अर्धवट भरले असल्याची माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली. दरम्यान, यापुढील प्रक्रियादेखील तातडीने सुरु करण्यात आल्याचे सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सीईटीचे शुल्क निश्चित

“एमएचटी-सीईटी’ परीक्षेचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. “पीसीएम’ आणि “पीसीबी’ या दोन्ही ग्रुपची परीक्षा देणाऱ्यांना स्वतंत्रपणे शुल्क आकारले जाणार आहे. पीसीबी किंवा पीसीएम यापैकी कोणत्याही एका ग्रुपमधून परीक्षा देत असताना खुल्या गटासाठी ८०० रु. तर, आरक्षित गटासाठी ६०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. जर विद्यार्थी दोन्ही गटातील अभ्यासक्रमाची परीक्षा देणार असेल, तर खुल्या गटासाठी १ हजार ६०० रुये तर आरक्षित गटासाठी १ हजार २०० रु. शुल्क आकारले जाईल. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शुल्क भरण्यापूर्वी अर्ज व्यवस्थित तपासून घ्यावा, त्यानंतर पैसे भरावेत असे आवाहन सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी केले आहे.

सोर्स : प्रभात


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप