खुशखबर! सात लाख पदांवर लवकरच मेगाभरती

Mega recruitment for seven lakh posts

देशातील असंख्य बेरोजगारांसाठी केंद्र सरकारकडून खूशखबर देण्यात आली आहे. केंद्र सरकार लवकरच सरकारी विभागातील रिक्त पदांवर मेगा नोकरभरती करणार आहे. यासंबंधी सर्व मंत्रालयांना केंद्राकडून निर्देश देण्यात आले आहेत.

सध्यस्थितीत केंद्रात जवळपास सात लाख पदे रिक्त आहेत. मंत्रालये तसेच केंद्र सरकारच्या विभागांना नोकरभरती संबंधी आवश्यक पाऊले उचलण्याचे आदेश डिपार्टमेंट ऑफ पर्सोनल अँड ट्रेनिंगकडून (डीओपीटी) देण्यात आले आहेत.

केंद्राच्या आदेशान्वे डीओपीटीने सर्व मंत्रालयाला परिपत्रक पाठवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळ समितीच्या निर्देशांचा उल्लेखही परिपत्रकातून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुंतवणूक तसेच वृद्धी संबंधी म़ंत्रिमंडळाच्या समितीच्या २३ डिसेंबर २०१९ च्या बैठकीनंतर केंद्र सरकारचे विविध विभाग आणि मंत्रालयांतील रिक्त पदांवर लवकरात लवकर नोकरभरीत करण्याचे निर्देश दिले होते.

प्रत्येक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, रिक्त पदांच्या भरती संबंधी प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला मंत्रालयांना अहवाल सादर करावा लागेल. येत्या ५ फेब्रुवारीला मंत्रालये सरकारी विभागांना त्यांचा पहिला अहवाल द्यावा लागेल. २०१४ पासून आतापर्यंत रिक्त पदांमध्ये जवळपास १ लाख ५७ हजार पदांची भर पडली आहे.

२०१८ पर्यंत केंद्र सरकारचे जवळपास सात लाख पदे रिक्त होती. सूत्रांच्या माहितीनुसार १ मार्च २०१८ पर्यंत ३८ लाख पदांवर केवळ ३१ लाख १८ हजार कर्मचारीच नियुक्त होते. रेल्वे विभागातील जवळपास २ लाख ५ हजार पदे रिक्त पडली आहेत. तर संरक्षण क्षेत्रातील रिक्त पदांचा आकडा १ लाख ९ हजारांच्या घरात आहे. जवळपास सर्वच मंत्रालयांमध्ये पद रिक्त आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजन करीत आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात संबंधी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोर्स : पुढारी


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Sushil tribhuwan says

    Me 10 pass ahe Iti pan zala ahe mala job pahije ahe

  2. Onkar anil SHINDE says

    Diploma electronic jal ahe job ahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप