Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नोकरी किंवा व्यवसाय करीत MBA शिकण्याची संधी…

MBA Via Distance Learning

MBA Via Distance Learning: नोकरी करता करता व्हा एमबीए! 

MBA Via Distance Learning : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळेने नोकरी किंवा व्यवसाय करीत एमबीए शिकण्याची संधी MBA Via Distance Learning:उपलब्ध करून दिली आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आज (शुक्रवारी) १५ जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांना कमी शुल्कात एमबीचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

पुणे विद्यापीठात मुक्त अध्ययन प्रशाळेची स्थापना करण्यात आली आहे. या प्रशाळेकडून बीए, एमए, बीकॉम, एमकॉम अशा अभ्यासक्रमांसोबतच, आता दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळणार आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होणार असून, साधारण महिनाभर इच्छुक विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या www.unipune.ac.in/soc या लिंकवर जाउन ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहे. मात्र, पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, किमान दोन वर्षे कामाचा किंवा व्यवसायाचा अनुभव असणाऱ्यांनाच अर्ज भरता येणार असून, प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

हा अभ्यासक्रम सेमिस्टर पद्धतीने पूर्ण होणार आहे; तसेच प्रत्येक सेमिस्टरसाठी साधारण १६ हजारांच्या आसपास शुल्क ठेवण्यात आले आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रशाळेने निवडलेले केंद्र निवडावे लागणार आहे. प्रत्येक केंद्रात साधारण २० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून, यंदा प्रवेशासाठी साधारण १० केंद्रांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशाळेचे सल्लागार डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली आहे. याबाबत अधित माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड