माझगाव डॉकला मिळणार नवीन काम?

Mazgaon Dock gets new job?

मर्यादित काम असल्याने सध्या संकटात असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला (एमडीएल) ४५ हजार कोटी रुपयांचे नवीन काम मिळण्याची शक्यता बळावली आहे. अत्याधुनिक पाणबुड्या तयार करण्यासाठीच्या कंत्राटात केंद्रीय समितीने दोन भारतीय कंपन्यांना हिरवा कंदील दिला आहे. त्यात माझगावचा समावेश आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या एमडीएलकडे सध्या निवडक युद्धनौका व फक्त दोन पाणबुड्यांच्या निर्मितीचे काम बाकी आहे. ऐनवेळी नौदलाने विशेष समितीमार्फत निर्णय घेण्याचे ठरवल्याने ‘प्रोजेस्ट ७५ आय’ नावाच्या सहा अत्याधुनिक पाणबुड्या निर्मितीचे काम अचानक कंपनीच्या हातून गेले. या स्थितीमुळे कंपनीने नवीन रोजगार भरती थांबविली आहे. कंत्राटावरील कर्मचाऱ्यांचे कंत्राट नूतनीकरणही विलंबाने केले जात आहे. आता पुन्हा हे काम कंपनीकडे येण्याची आशा निर्माण झाली आहे.

या पाणबुड्या निर्मिती करण्यासाठी परदेशातील कंपनीची नौदलाकडून निवड होणार आहे. या परदेशी कंपनीला ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत एका भारतीय कंपनीची निवड करायची आहे. त्यासाठी माझगाव डॉकसह एल अॅण्ड टी, रिलायन्स नेव्हल (अनिल अंबानी समूह), अदानी समूह, अदानी-हिंदूस्थान शिपयार्ड लिमिटेड (एचसीएल) व हिंदूस्थान शिपयार्ड या पाच जणांनी अर्ज केला होता. या पाचही कंपन्यांची तपासणी करण्यासाठी नौदलाने विशेष समिती स्थापन केली होती. या समितीने एल अॅण्ड टी व माझगाव डॉक लिमिटेड यांची अंतिम कंत्राटासाठी निवड केली आहे.

दिवाळखोरीसंबंधी प्रकरणामुळे रिलायन्स नेव्हल कंपनी या स्पर्धेतून बाहेर गेली. तर अदानी समूह आणि अदानी-एचसीएल यांच्या संयुक्त कंपनीचा अर्जदेखील समितीने फेटाळला आहे. हा सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पण एकूणच यामुळे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडसह कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

नवीन पिढीच्या पाणबुड्या

४५ हजार कोटी रुपये खर्चून तयार होणाऱ्या या सहा पाणबुड्या तयार होणार आहेत. सध्या ताफ्यात आलेल्या कलवरी श्रेणीतील पाणबुड्यांसारखीच असेल. पण या पाणबुड्यांमध्ये ‘एआयपी’ नावाचे तंत्रज्ञान असेल. त्यामुळे पाणबुडी २१ दिवसांपर्यंत अखंडपणे पाण्याखाली राहू शकते. कलवरी श्रेणीतील पाणबुड्या दोन दिवसांहून अधिक राहू शकत नाहीत.

सौर्स : म. टा.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप