मालेगाव महापालिकेत ६० टक्के पदे रिक्त

Malegaon Mahanagarpalika Bharti 2020

मालेगाव महापालिकेत ६० टक्के पदे रिक्त

२६७५ पैकी १५९४ पदे रिक्त : शासनाने नोकर भरतीसाठी उत्पन्नाच्या ३५ टक्क्यांच्या आत आस्थापना खर्चाचे निर्बंह घातल्यामुळे येथील महापालिकेत एल तपापासून नोकरभरती रखडली असून आजच्या घडीला तब्बल ६० टक्के पदे रिक्त झाली आहेत.

सद्यस्थितीत वर्ग एकची मंजूर ३२ पैकी २६ पदे रिक्त आहेत. वर्ग दोनची ६७ पैकी ५६ पदे रिक्त आहेत. वर्ग तीनची १०४८ पैकी ७९७ तर वर्ग चारची १५२८ पैकी ७१५ पदे रिक्त आहेत. अशा रीतीने महापालिका आस्थापनेवरील एकूण २६७५ पदांपैकी १५९४ म्हणजेच तब्बल ६० टक्के पदे रिक्त असून केवळ ४० टक्के अधिकारी – कर्मचाऱ्यांवर महापालिकेच्या कारभाराचा गाडा हाकलण्याची कसरत सुरु आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे एकीकडे प्रशासकीय कामावर ताण अडत असताना दुसरीकडे महापालिका अस्तित्वात आल्यापासून गेल्या १८ वर्षात किरकोळ अपवाद वगळता कर्मचाऱ्यांना पदोन्नती देतांनाही प्रशासनाने सरकारी धोरणाला हरताळ फासल्याचे वास्तव आहे.

२००१ मध्ये येथील नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाले. प्रारंभी पालिका आस्थापनेवरील रिक्त पदांच्या प्रमाणात नोकरभरती होत असे. २००६ मध्ये महापालिकांच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत ३५ टक्क्यांहून अधिक आस्थापना खर्च असल्यास नोकरभरतीवर टाच आणणारा फतवा शासनाने काढला. यामुळे ४५ टक्क्यांच्या आसपास आस्थापना करच असलेल्या मालेगाव महापालिकेच्या सरळसेवा भरतीसाठी हात बांधले गेले. दरवर्षी अधिकारी, कर्मचारी निवृत्त होतात. परंतु त्यांच्या जागेवर भरती करता येत नसल्याने महापालिका आस्थापनेवरील पदसंख्या मोठ्या प्रमाणावर रिक्त होत आहे. यामुळे पालिकेच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. अनेक कर्मचाऱ्यांना एकापेक्षा अधिक पदांची जबाबदारी पेलावी लागत आहे. यावर प्रशासनाने कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर कर्मचारी नियुक्तीचा मार्ग अवलंबवला. पण ते कायमस्वरूपी कर्मचारी नसल्याने त्यांच्यावर त्या, त्या पदांची सर्वस्वी जबाबदारी सोपविणे अनेकदा अशक्य होते. शिवाय त्यांची संख्याही पुरेशी नसल्याने पालिकेला परिणामकारक काम करणे अवघड जात आहे. वर्ग तीन आणि वर्ग चार मिळून सुमारे ७०० कंत्राटी कर्मचारी सध्या महापालिकेच्या सेवेत आहेत. सरळसेवा भरती रखडली असतांना पदोन्नतीने भरती न केल्याने रिक्तपदांची संख्या वाढत आहे. आस्थापना खर्चाच्या कमाल मर्यादेमुळे सरळसेवा भरती करणे अश्यक्य असले तरी पदोन्नती कोट्यातील पदांची भरती करण्याचा सुलभ मार्ग पालिकेकडे उपलब्ध होता. मात्र अहर्ताप्राप्त कर्मचाऱ्यांमधून वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यास टाळाटाळ करून शासन धोरणालाच पालिका प्रशासनाने हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.

२० वर्षात विशिष्ठ पदांची, किरकोळ स्वरूपातील पदोन्नतीचा अपवाद वगळता बहुसंख्य कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा हक्क वर्षानुवर्षे नाकारला गेला आहे.

विशेष म्हणजे पदोन्नती दिली जात असतांना बहुसंख्य खातेप्रमुखांचा प्रभारी कार्यभार तृतीय, चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप