महावितरणची १३४ पदे लवकरच भरणार

MahaVitaran Recruitment of 134 Posts will be soon

महावितरणच्या लातूर परिमंडळ विभागातील जवळपास 134 रिक्त सहायक व कनिष्ठ अभियंतापदे काही दिवसांत भरली जातील, अशी माहिती लातूर परिमंडल विभागातील मानव संसाधन विभागाचे (एचआर विभाग) सहायक महाव्यवस्थापक नामदेव पवार यांनी “सकाळ”शी बोलताना दिली.

अनेक वर्षांपासून लातूर परिमंडळ विभागातील उस्मानाबाद, लातूर, बीड या तीन जिल्ह्यांतील महावितरणच्या अनेक कार्यालयांत अभियंते नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सध्या या कार्यालयाचा कारभार प्रभारी अभियंते व तंत्रज्ञानावरच सुरू आहे. यामुळे उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांतील वीज ग्राहकांची गैरसोय होत आहे.

तांत्रिक बिघाड, रोहित्रे दुरुस्ती, वीज देयक दुरुस्ती, नवीन वीजजोडणी आदी कामे वेळेत होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. रिक्त पदे भरण्यासाठी महावितरणच्या मानव संसाधन विभागाकडून (एचआर विभाग) ऑक्‍टोबर 2019 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल 17 जानेवारीला लागला असून, मुंबई येथील प्रकाशगडच्या मानव संसाधन विभागाकडून नवीन पात्र अभियंत्याची पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गरजेनुसार ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात 17 सहायक व 26 कनिष्ठ, बीड जिल्ह्यात 28 सहायक आणि 27 कनिष्ठ; तसेच लातूर जिल्ह्यात 11 सहायक व 25 कनिष्ठ अशी एकूण 134 अभियंते लवकरच कामावर रुजू होतील. त्यामुळे अनेक वर्षांपासून अभियंत्याअभावी महावितरणच्या कार्यालयात होणारी गैरसोय लवकरच दूर होण्याची शक्‍यता आहे.

मुरूम (ता. उमरगा) येथील ग्रामीण कार्यालयातील कारभार तीन वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांवरच सुरू आहे. तत्कालीन कनिष्ठ अभियंता विनोद बळवंत यांची बदली झाल्यापासून पद रिक्तच आहे. दरम्यान, रिक्त पदांचा विषय “सकाळ’ने लावून धरला होता.

सोर्स : सकाळ


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Salim shaikh says

    Sir zp form bharun 1year hot aaye pan ajun kahi exam zail nahi kadhi honar aahe

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप