वनरक्षक, तलाठी परीक्षा निकालांची चौकशी होणार

Govertment Teacher College Nanded Bharti 2020

‘महापरीक्षा पोर्टलद्वारे वनरक्षक, तलाठी, लिपिक पदांसाठी झालेल्या परीक्षांची; तसेच निकालांची चौकशी करण्यात येणार असून, त्यानंतर भरती प्रक्रियेबाबात योग्य निर्णय घेण्यात येईल,’ असे आश्वासन माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, सध्या सुरू असणाऱ्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेला स्थगिती मिळावी, अशी परीक्षार्थ्यांची मागणी कायम आहे.

‘महापरीक्षा पोर्टल’द्वारे विविध सरकारी विभागांमधील पदभरतीसाठी झालेल्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे ‘महाराष्ट्र टाइम्स’ने अनेकवेळा समोर आणले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वनरक्षक, तलाठी पदभरतीच्या परीक्षा; तसेच निकालांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले. काही दिवसांपूवीच राज्य मंडळाच्या कनिष्ठ लिपिक पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात उत्तीर्ण झालेल्या गुणवतांच्या चुका एकसारख्या असल्याचेही उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या समन्वयातून मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सतेज पाटील यांनी एमपीएससी समन्वय समिती, एमपीएससी स्टुडंट्स राइट्स, स्पर्धा परीक्षा संघर्ष समिती या स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी लढणाऱ्या संघटनांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. या वेळी ‘महापरीक्षा पोर्टल’चे अधिकारी उपस्थित होते.

‘बैठकीत पोर्टलच्या अधिकाऱ्यांनी चुका मान्य करून, त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत होते; तसेच परीक्षा एकाच दिवशी घेण्याबाबत सांगत होते. मात्र, पोर्टल बंद करण्याची मागणी आम्ही लावून धरली. त्यानंतर सतेज पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पोर्टल बंद करण्याचा पुराव्यानिशी प्रस्ताव तयार करून, तो अभ्यास करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याससोर मांडण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश दिला’स असे शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले. महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षा आणि निकालांची चौकशी करण्यासोबतच, येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पोर्टल बंद करण्याबाबत बैठकीचे आयोजन करू, असे आश्वासन पाटील यांनी दिल्याचे शिष्टमंडळातर्फे सांगण्यात आले. शिष्टमंडळामध्ये राहुल कवठेकर, विशाल पाटील, बळवंत शिंदे, किरण निंभोरे आदींचा समावेश होता.

सोर्स : महाराष्ट्र टाइम्स


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप