Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्यात LLB प्रवेशाच्या 5 हजार जागा रिक्त!! जाणून घ्या

Law Admission 2022

Law Admission 2022

Law Admission 2022 : Preference forms for admission will be filled up by 1st February. Admission will be completed by February 3, while the cutoff for admission will be on February 11. However, even after two admission rounds, it is known that 5,000 LLB seats are vacant in this academic session. Further details are as follows:-

पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन फेऱ्या संपल्या. एकूण ११ हजार ७५५ जागांपैकी आतापर्यंत ६ हजार ३०५ प्रवेश पूर्ण झाले आहेत. संस्थास्तर फेरीला प्रारंभ झाला. १ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशासाठी पसंतीक्रम भरले जाणार आहेत. ३ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश पूर्ण केले जाईल, तर ११ फेब्रुवारी प्रवेशाची कटऑफ राहील. मात्र, दोन प्रवेश फेऱ्यांनंतरही यंदाच्या शैक्षणिक सत्रात एलएलबीच्या ५ हजार जागा रिक्त असल्याची माहिती आहे.

राज्यातील प्रचलित शिक्षण पद्धतीनुसार कोणत्याही शाखेचे विद्यार्थी तीन वर्षांचा कायदेविषयक अभ्यासक्रम किंवा बारावी उत्तीर्ण होऊन पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाला पसंती देतात. यंदा नोंदणीत वाढ झाली. मात्र, प्रत्यक्ष कॅप फेरीत मात्र प्रवेश कमी झाल्याचे दिसून येत आहेत. या अभ्यासक्रमासाठी सीईटीतून पात्र झालेले सुमारे १६ हजार विद्यार्थी होते. त्यापैकी प्रवेशासाठी १३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. विधी महाविद्यालयातील १० हजार ६४८ जागा या कॅम्पमधून प्रवेश घेण्यासाठी उपलब्ध होत्या. संस्थास्तरावरील १ हजार ७ जागा होत्या. यापैकी दोन फेरीमतध्ये ६ हजार ३०५ प्रवेश पूर्ण झाले आहेत. राज्यात ५ हजार ४५० जागा अजूनही रिक्त आहेत. आता संस्थास्तरावर प्रवेश पूर्ण केला जाणार असून ११ फेब्रुवारीही प्रवेशाची कटऑफ असणार आहे.

LLB Admission Status 

  • विधी महाविद्यालये १३२
  • सीईटी पात्र १६०७१
  • प्रत्यक्ष नोंदणी १२८८९
  • एकूण जागा ११७५५
  • आतापर्यंतचे प्रवेश ६३०५
    • रिक्त जागा ५४५०

संस्थास्तर फेरीला प्रारंभ

पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन फेऱ्या संपूनही पाच हजार जागा रिक्त आहेत. त्यामुळे आता कॉलेज संस्थास्तर फेरीला प्रारंभ करण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात एलएलबी पाच वर्षे अभ्यासक्रमांसाठी १३२ महाविद्यालये आहेत. ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत संस्थास्तरावरील प्रवेशाची कटऑफ असणार आहे.


Law Admission 2021 : law admission 2021 extension for 3 year LLB admission process in Maharashtra –  तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला (3 year LLB) आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही प्रक्रिया १२ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. तीन वर्षे विधी अभ्यासक्रमासाठी ६ जानेवारी रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या यादीतील त्रुटींबाबत विद्यार्थ्यांना तक्रारी नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्लूएस कोट्यातून प्रवेशास मुभा देण्यात आली. यासाठी आवश्यक प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांनी मुदत वाढ देण्याची मागणी केली होती. याबाबत स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी पाठपुरावा केला होता. यामुळे ही तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्न्यानंतर विद्यार्थ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी १२ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड