Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कृषी अधिकारी भरती प्रक्रियेतील उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश निघणार! – Krushi Vibhag Bharti 2024

Krushi Vibhag Bharti 2024

Krushi Vibhag Bharti 2024 details

 

उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीनंतर अंतिम आदेशानुसार कृषी अधिकारी भरती प्रक्रियेतील उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले जातील व त्यांना कामावर रुजू करून घेण्यात येईल, असा निर्वाळा राज्याच्या कृषी खात्याने दिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२१ मधील मागणीपत्राच्या आधारे ११ फेब्रुवारी २०२२ च्या जाहिरातीमधील अनुषंगाने परीक्षा घेतली होती. महाराष्ट्र कृषी सेवा संवर्गातील परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या शिफारशी शासनास प्राप्त झालेल्या होत्या. त्यामुळे पुढे उमेदवारांची कागदपत्र तपासणी, खेळाडू व दिव्यांग आरक्षण, चारित्र्य तसेच जात पडताळणीच्या अधीन राहून नागरी सेवा मंडळ व राज्य शासनाची मान्यता घेत नियुक्तीची कार्यवाही केली गेली होती. त्यापैकी १२१ सरळसेवा उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश १ मार्च २०२४ रोजी काढण्यात आले होते. परंतु या आदेशाला उच्च न्यायालयात असलेल्या याचिकेतील (क्रमांक ७३६९/२०२३) अर्जदारांच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता. यामुळे न्यायालयाच्या ७ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या अंतरिम आदेशाचा अवमान झाल्याचे सांगत नोटीस दिली गेली होती.

कृषी विभाग परीक्षेचे संपूर्ण स्वरूप व अभ्यासक्रम येथे तपासा  तसेच कृषी विभाग अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर सोडवून बघावे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

कृषी खात्याच्या म्हणण्यानुसार, वास्तविक २०२१ व २०२२ मध्ये आयोगाने घेतलेल्या परीक्षेबाबत कृषी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. आयोगाने परीक्षेच्या अभ्यासक्रम बदलाच्या अनुषंगाने दाखल झालेल्या या याचिकांची सुनावणी सुरू आहे. २७ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी वकीलांनी सांगितले होते, की नियुक्ती प्रक्रियेला अजून वेळ लागेल.

पुढील सुनावणीपूर्वी नियुक्ती देणे शक्य नाही, असे सांगितले होते. न्यायालयाने सुनावणीत याबाबीची नोंद घेतली होती. प्रत्येक सुनावणीच्या वेळी ही नोंद कायम ठेवली गेली. त्यामुळेच आधीचे सरकारी वकीलाने न्यायालयात दिलेली माहिती विचारात घेता १ मार्च रोजी शासनाने नियुक्तीबाबत काढलेले आदेश रद्द करण्याचे सहायक सरकारी वकिलांनी सूचित केले. त्यामुळेच चार मार्चला स्वतंत्र आदेश जारी करीत एक मार्चला काढलेले आदेश रद्द केल्याचे शासनाने जाहीर केले, असे कृषी खात्याने स्पष्ट केले.

या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी (ता. ५) पुन्हा उच्च न्यायालयात झाली. शिफारसपात्र विद्यार्थ्यांनी सुरू केलेले उपोषण, समाज माध्यमात याविषयाचा होत असलेला उल्लेख व त्यामुळे कृषी खात्याची प्रतिमा मलिन होत असल्याचे जोरदार मुद्दे सरकारी वकिलांनी या सुनावणीत मांडले. तसेच २७ सप्टेंबरला दिलेले अंतरिम आदेश मागे घेण्याची विनंतीही न्यायालयात केली.


 

Krushi Vibhag Bharti 2024: The district agriculture department, which is important for the farmers, is currently running without a superintendent of agriculture. While the Agriculture Department was already in-charge, now Deputy Director of Agriculture Chandrakant Patil has also gone on leave, so the post of the Agriculture Superintendent of the Agriculture Department in the three-ministered district is vacant.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जिल्हा कृषी विभागात सध्या कृषी अधीक्षकांविनाच कारभार सुरू असल्याचे चित्र आहे. आधीच कृषी विभागात प्रभारीराज असताना आता कृषी उपसंचालक चंद्रकांत पाटील हेदेखील रजेवर गेले असल्याने, तीन मंत्री असलेल्या जिल्ह्यातील कृषी विभाग कृषी अधीक्षकांचेच पद रिक्त असल्याचे चित्र आहे.

पाच महिन्यांपूर्वी संभाजी ठाकूर यांची बदली झाल्यानंतर पाच महिन्यांपासून जिल्हा कृषी अधीक्षकांचा पदभार हा प्रभारी अधिकाऱ्यांकडे सुरू आहे. संभाजी ठाकूर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर आत्माचे प्रकल्प संचालक असलेल्या रविशंकर चलवदे यांच्याकडे जिल्हा कृषी अधीक्षकांचा अतिरिक्त कारभार देण्यात आला होता. डिसेंब महिन्यात त्यांनी हा पदभार सोडल्यामुळे कृषी उपसंचालक चंद्रकांत पाटील यांच्याकडे हा प्रभारी पदभार देण्यात आला. मात्र, आता ते देखील खासगी कामासाठी रजेवर गेले असल्याने जिल्हा कृषी विभागाचा कारभार अधीक्षकांविनाच सुरु आहे. केळी उत्पादक शेतकरी कृषी विभागात चक्करा मारत आहेत ठिबकच्या अनुदानाच्या प्रस्तावावर कृषी अधीक्षकांची स्वाक्षरी लागते मात्र, अधिकारीच नसल्याने ही काम थांबली आहेत.


Krushi Vidyapeeth Bharti 2024

Candidates who have cleared competitive exams for various posts in Agriculture Department are likely to get the ‘good news’ of appointments soon. Sources in the Commissionerate of Agriculture informed that such a proposal has been sent for approval at the ministry level, and 198 officers will be appointed from it. Due to the new appointment, the work of the Agriculture Department is expected to be more dynamic and strengthened. New appointments and postings will be given to the candidates who passed the Maharashtra Public Service Commission examination especially for the recruitment of various posts of Agriculture Department. They mainly include 198 officers comprising Taluka Agricultural Officer (TAO) 60, Sub Divisional Agricultural Officer (SDO) 17 and Agricultural Officer (AO) 121.

कृषी विभागातील विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षांमधून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्त्यांची ‘गुड न्यूज’ मिळण्याची शक्यता आहे. मंत्रालयस्तरावर तसा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून, त्यातून १९८ अधिकाऱ्यांना नियुक्तीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. नव्याने होणाऱ्या पदस्थापनेमुळे कृषी विभागाच्या कामकाजात अधिक गतिमानता आणि बळकटी येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कृषी विभागाच्या विविध पदांच्या भरतीसाठी विशेषतः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नव्याने नियुक्त्या आणि पदस्थापना दिली जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तालुका कृषी अधिकारी पदाचे (टीएओ) ६०, उपविभागीय कृषी अधिकारी पदाचे (एसडीओ) १७ आणि कृषी अधिकारी पदांचे (एओ) १२१ मिळून १९८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कृषी विभाग परीक्षेचे संपूर्ण स्वरूप व अभ्यासक्रम येथे तपासा  तसेच कृषी विभाग अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर सोडवून बघावे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर येत्या आठवडाभरात निर्णय अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कृषी विभागात सध्या कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांमधूनही बढत्यांचे प्रस्ताव मंत्रालयस्तरावर प्रलंबित आहेत. अनेक ठिकाणच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व अन्य पदभार कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे देऊन कामकाज सुरू आहे. त्या पदोन्नत्यांमधून २१ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी उपंसचालक ४५, तालुका कृषी अधिकारी १२३ आणि १६८ कृषी अधिकारी मिळून एकूण ३५७ अधिकाऱ्यांना बढती मिळणे अपेक्षित आहे. त्यावर कृषिमंत्री धनंजय मुंडे व कृषीचे प्रधान सचिव् अनुप कुमार यांच्याकडून या दोन्ही निर्णयांवर शिक्कामोर्तब अपेक्षित मानले जात आहे.

 


 

महाराष्ट्र कृषी विभागात लवकरच पदभरती होणार आहे. या संदर्भातील नवीन परिपत्रक प्रकाशित झाले आहे. या भरती बद्दल आदेश चारही कृषी विद्यापीठात देण्यात आले आहे. 

 

महाराष्ट्र कृषी विभाग भरती निकाल जाहीर!- Maharashtra Krushi Vibhga Bharti Result

Krushi Vibhag Bharti 2023 –  The Prime Minister announced that he will double the income of farmers. However, the reality is that the system is not strong enough to take the technology to the farmers in remote areas in Krushi Vibhag Bharti 2023. In Bhandara district, out of the total sanctioned posts in the agriculture department, 235 posts are vacant. This has had an impact on agricultural expansion. The Agriculture Department plays a major role in the implementation of various schemes of the government, as well as in the expansion of technology including survey and panchnama during natural disasters. But in the last few years, the department has been crippled as a result of vacancies.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. मात्र दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोचविण्यासाठी त्याकरिता यंत्रणाच भक्‍कम नसल्याचे वास्तव समोर आले आहे. भंडारा जिल्ह्यात कृषी विभागात एकूण मंजूर पदांपैकी समोर २३५ पदे रिक्‍त आहेत. याचा परिणाम कृषी विस्तारावर झाला आहे. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, त्यासोबतच नैसर्गिक आपत्ती काळात सर्व्हेक्षण, पंचनामे यासह तंत्रज्ञान विस्तारात कृषी विभागाची मोठी भूमिका राहते. परंतु गेल्या काही वर्षांत रिक्‍तपदाच्या परिणामी हा विभाग खिळखिळा झाला आहे.

 

एकाच कर्मचाऱ्याकडे अनेक गावांचा प्रभार असल्याने योजनांची अंमलबजावणी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहते. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली हे जिल्हे नक्षलप्रवण आहेत. त्यासोबतच धानासारख्या एकाच पिकावर अवलंबिता असल्याने शेतकऱ्यांची आर्थिकस्थिती देखील भक्‍कम नाही. त्यामुळे या भागात तंत्रज्ञान प्रसार आव्हानात्मक ठरते. पुरेशा कर्मचाऱ्यांच्या बळावर हे आव्हान पेलणे शक्‍य होईल. परंतु शासन पद भरण्यासही सकारात्मक नसल्याने प्रभारीच्या भरवशावरच जिल्ह्याच्या कृषी विभागाचा गाडा हाकला जात आहे. जिल्ह्यात ४३५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २०० पदे रिक्‍त आहेत. त्यातच वरिष्ठांच्या बैठका सातत्याने असतात. त्यामुळे या बैठकांना कर्मचारी गेल्यास कार्यालय ओस पडते. शेती योजना किंवा इतर काही माहिती घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना आल्या पावली यामुळे परतावे लागते, अशी स्थिती आहे.

योजनांची अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविला जात आहे. मात्र योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्गच नसल्याने याला प्रतिसाद कसा मिळेल? असा प्रश्‍न सामान्यांमधून उपस्थित होत आहे.

 


 

 A total of 84 posts of officers and employees have been sanctioned in the Shindkheda Taluka Agriculture Office, while 47 posts are functional and 37 posts are vacant under Krushi Vibhag Bharti 2023. The schemes of the agriculture department of the government are implemented through the taluka agriculture office, where the farmers of the taluka have to stay at the taluka agriculture office due to the ‘drought’ of officials and employees.

 

शिंदखेडा तालुका कृषी कार्यलयात अधिकारी व कर्मचारी अशी एकूण ८४ पदे मंजूर असून, ४७ पदे कार्यरत असून, ३७ पदे रिक्त आहेत. शासनाच्या कृषी विभागाच्या योजना या तालुका कृषी कार्यलयामार्फत राबविल्या जातात, त्या ठिकाणीच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ‘दुष्काळ’ असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. (37 post of staff including officer vacant in agriculture department in dhule)

 

शिंदखेडा तालुक्यातील १४३ महसूल गावांतील सुमारे ९९ हजार १५० हेक्टर जमीन लागवडीयोग्य आहे. तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहाय्यक अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, कृषी पर्यवेक्षक ही सर्व पदे कार्यरत आहेत. तालुक्यात शिंदखेडा, चिमठाणे, नरडाणा व दोंडाईचा कृषी मंडळ आहे.

 

त्यात शिंदखेडा व दोंडाईचा येथील कृषी मंडळ अधिकारी यांच्या जागा रिक्त आहेत, तसेच कृषी सहाय्यकांच्या एकूण ४९ पैकी २५ जागा रिक्त आहेत. कृषी विभागाकडे पी. एम. किसान योजनेचे काम कृषी सहाय्यकांकडे देण्यात आले आहे. प्रत्येक कृषी सहाय्यक तीन-चार गावांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत.

 

पदाचे नाव मंजूर पदे । कार्यत पदे । रिक्त पदे

  • मंडळ कृषी अधिकारी ४ २ २
  • लिपिक ४ २ २
  • कृषी सहाय्यक ४९ २४ २५
  • अनुरेखक ६ २ ४
  • वाहनचालक १ ० १
  • शिपाई ७ ३ ४

In Nanded district, which is spread over as many as sixteen talukas, the vacancies of Taluka Agriculture Officers do not seem to be going away for the past several years in Krushi Vibhag Bharti 2023. In this regard, the office of the District Superintendent of Agriculture periodically gives a vacancy report to the government. But no concrete action is being taken to fill these vacancies.

 

कृषी सेवक भरतीचे ऑनलाईन अर्ज Link – Apply Now!

 

तब्बल सोळा तालुक्यांचा विस्तार असलेल्या नांदेड जिल्ह्यात तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचे ग्रहण मागील अनेक वर्षापासून सुटताना दिसत नाही. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे वेळोवेळी रिक्त पदाचा अहवाल देण्यात येतो. परंतु ही रिक्त पदे भरण्यासाठी ठोस कार्यवाही होताना दिसत नाही.

सोळापेकी तब्बल दहा ठिकाणी तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने येथील पदभार प्रभारींवर सोपविण्यात आला आहे. यामुळे ऐन खरिप हंगामात शेतकऱ्यांच्या समस्येत भर पडली आहे.

 


 Maharashtra Agriculture Department is the Most Important Department in all way. The recruitment process for a large number of posts will begin soon in the next 15 days. The Bharti process for various posts is published now. This Bharti is declared for 218 vacancies. The last Date to apply for this Bharti is 22nd July 2023. The online registration process has been started. Interested and eligible candidates can apply through below mentioned link. Know More Information About Maha Krushi Vibhag Jahirat 2023, Maharashtra Krushi Vibhag Recruitment 2023, Check Krushi Vibhag Bharti Online Application Link, and other details at below:

Recruitment for the posts of Senior Clerk, Assistant Superintendent, Short Typist, Stenographer (Lower Grade) and Stenographer (Higher Grade) on Establishment of Various Appointing Authorities under Commissionerate of Agriculture in Agriculture Department-2023 has reopen Online application. Candidates now apply for Maha Agriculture Vibhag Bharti 2023 from 13th July 2023 till 22nd July 2023. Check Below Notice.

राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क मधील लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील 218 रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 13 जुलै 2023 पासून दिनांक 22 जुलै 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

Krushi Vibhag Bharti 2023 Maharashtra – District Wise

कृषि विभाग नागपूर भरती 2023 – 24 पदे

कृषी विभाग अमरावती भरती 2023 – 19 पदे

कृषी विभाग पुणे भरती 2023 – 18 पदे

कृषी विभाग नाशिक भरती 2023 – 18 पदे

कृषी विभाग, औरंगाबाद भरती 2023 – 69 पदे

कृषी विभाग, ठाणे भरती 2023 – 26 पदे

कृषी विभाग, कोल्हापूर भरती 2023 – 18 पदे

कृषी विभाग, लातूर भरती 2023 – 20 पदे

  • पदाचे नाव –लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • पदसंख्या – 218 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज शुल्क
    • अमागास – रु. ७२०/-
    •  गासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. ६५०/-
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 13 जुलै 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in

कृषी आयुक्तालय व कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक, लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरतीसाठी जाहीराती दि.०३ एप्रिल, २०२३ ते दि.०६ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सदर जाहिरातीस अनुसरुन अर्ज करण्यासाठीचा अंतीम दिनांक ३० एप्रिल, २०२३ असा होता.
शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, दि. ४ मे, २०२३ अन्वये खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता खुल्या तसेच मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे. सदरच्या शासन निर्णयातील तरतुदी पूर्वलक्षी प्रभावाने (Retrospective) दिनांक २९.९.२०२२ नंतरच्या पदभरतीसाठी अमलात येतील.
कृषी आयुक्तालय व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील विविध पदे भरण्यासाठी विज्ञापित केलेल्या जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रणालीमध्ये जुन्या निकषानुसार खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावर अर्ज करण्यासाठी नॉन- क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसणाऱ्या महिला उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील पदाकरीता अर्ज करता आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती पाहता तसेच शासन निर्णयातील तरतुदी पूर्वलक्षी प्रभावाने अमलात आलेल्या असल्याने ऑनलाईन अर्ज करता न आलेल्या उमेदवारांना संधी देणे आवश्यक आहे, ही वस्तुस्थिती विचारात घेता सरळसेवा भरतीसाठी आवेदन पत्र सादर करण्यासाठी १० दिवसांची मुभा दण्याचा निर्णय विभागाने घेतलेला आहे.

Krushi Vibhag Vacancy 2023  

वरिष्ठ लिपिक – १०५ जागा
शैक्षणिक पात्रता- किमान द्वितीय श्रेणी पदवीधर

सहाय्यक अधीक्षक– ५३ जागा
शैक्षणिक पात्रता-  कोणत्याही शाखेतील पदवी

 

Educational Qualification For Krushi Vibhag Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लघुटंकलेखक १. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.

२. लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

लघुलेखक (निम्न श्रेणी) १. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.

२. लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

लघुलेखक (उच्च श्रेणी) १. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.

२. लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

Salary Details For Maharashtra Agriculture Department Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
लघुटंकलेखक S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
लघुलेखक (निम्न श्रेणी) S-१४ : ३८६००- १२२८०० (सुधारित – S-१५ : ४१८००-१३२३००) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
लघुलेखक (उच्च श्रेणी) S-१५ : ४१८००-१३२३०० (सुधारित – S-१६ : ४४९००-१४२४००) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

 

How To Apply For Department of Agriculture Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  •  उमेदवाराला कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संकेतस्थळावर लॉगइन (Log in) करावे लागेल.
  • अर्ज 13 जुलै 2023 पासून सुरु होतील.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 जुलै 2023 आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • या भरतीकरिता अधिक माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  • तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक13 जुलै 2023 पासून दिनांक 22 जुलै 2023 या कालावधीमध्ये करता येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Maharashtra Agriculture Department Recruitment 2023

  1. सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल.
  2. सदर परीक्षेमध्ये किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. ८.१.२
  3. संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण व व्यावसायिक चाचणीमध्ये प्राप्त गुण अशा एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
  4. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. व्यावसायिक चाचणी घेण्याबाबतचे स्थळ, दिनांक व वेळापत्रक कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.
  5. संगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा ६० प्रश्नांची व १२० गुणांची असेल. त्यासाठी ७५ मिनिटांचा कालावधी राहील.
  6. संगणक आधारीत ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे राहील:
Recruitment of Senior Clerk, Assistant Superintendent, Steno Typist, Stenographer (Lower Grade) and Stenographer (Higher Grade) in the Agriculture Department on the Establishment of various Recruitment Authorities under the Commissionerate of Agriculture-2023 / कृषि विभागातील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विविध नियुक्ती प्राधिकारी यांचे आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, लघु टंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) पदांसाठी भरती-2023
Important Events Dates Reopen
Commencement of on-line registration of application 06/04/2023 13/07/2023
Closure of registration of application 30/04/2023 22/07/2023
Closure for editing application details 30/04/2023 22/07/2023
Last date for printing your application 15/05/2023 06/08/2023
Online Fee Payment 06/04/2023 to 30/04/2023 13/07/2023 to 22/07/2023

Krushi Vibhag Bharti 2023भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Krushi Vibhag Bharti 2023 | krishi.maharashtra.gov.in Recruitment 2023

📑 शुद्धिपत्रक  https://shorturl.at/gmACU
📑 PDF जाहिरात  shorturl.at/anoK4 
📑ऑनलाईन अर्ज करा  shorturl.at/afmKV
✅ अधिकृत वेबसाईट 
krishi.maharashtra.gov.in




Krushi Vibhag Bharti 2023 – Latest Update 

Krushi Vibhag Bharti 2023 – The role of the Department of Agriculture is important to ensure that the farmers get lessons in new technologies and modern experimental farming methods, and get guidance in the field from time to time. However, the Agriculture Department (State level) in the district is living a forced life due to lack of manpower. Out of 435 sanctioned posts in the department, only 235 posts are filled and 200 posts are vacant.

 

शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिक प्रयोगशिल शेती पद्धतीने धडे मिळावे, वेळोवेळी प्रत्यक्ष शेतशिवारात मार्गदर्शन मिळावे, यासाठी कृषी विभागाची भूमिका मोठी असते. परंतु, जिल्ह्यातील कृषी विभाग (राज्यस्तरीय) मनुष्यबळाअभावी मजबुरीचे जीवन जगत आहे.विभागात मंजूर ४३५ पदांपैकी केवळ २३५ पदे भरलेली असून २०० पदे रिक्त आहेत. परिणामी कसे होणार शेतकऱ्यांचे भले, असा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. भंडारा जिल्हा कृषी प्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो. आजही जिल्ह्यातील जवळपास ६५ टक्के नागरिक शेती व शेतीशी संबंधित व्यवसायात आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून शासनाच्या अनेक योजना व प्रंकल्पांचे संचालन केले जाते. योजनांचा थेट लाभ दिला जातो. नवे तंत्र व आधुनिक बदलांसबंंधी प्रयोगशिल प्रात्याक्षिकांसह मार्गदर्शन दिले जातात. परंतु, या विभागात रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढला आहे. प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुमारे २०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे कृषी विभागाचा नाथ कुणी नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

गट ‘अ’ व ‘ब’ ची १७ पदे रिक्त
गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांची ५ पदांपैकी ४ पदे रिक्त आहेत. नुकतेच अधिक्षक कृषी अधिकाऱ्याचे पद भरले गेले आहे. कृषी उपसंचालकाची ४ पैकी ४ पदे रिक्त आहेत. गट ब प्रवर्गातील १७ पैकी ९ पदे रिक्त आहेत. गट ब प्रवर्गातील कनिष्ठ अधिकाऱ्यांची २३ पैकी २ पदे तर सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱी व लेखा अधिकाऱ्यांची प्रत्येकी एक जागा रिक्त आहे. एकूण ४२ पैकी २९ पदे भरलेली असून १३ पदे रिक्त आहेत.

गट ‘क’ प्रवर्गातील १२९ जागा रिक्त
गट क प्रवर्गातील कृषी पर्यवेक्षकांच्या मंजूर ४३ पैकी ४१ पदे भरलेली असून २ जागा रिक्त आहेत. यात कृषी सहाय्यकांची ७१ पदे रिक्त आहेत. लघुलेखक निम्नक्षेणी व अधीक्षकाची प्रत्येकी एक जागा रिक्त आहे. सहाय्यक अधीक्षकाची एक तर कनिष्ठ लिपीकांच्या ७ जागा रिक्त आहेत. आरेखक एक, अनुरेखकाच्या ३३ तर वाहन चालकांच्या ११ जागा रिक्त आहेत.

गट ‘ड’ प्रवर्गातील ५४ पदे रिक्त
या प्रवर्गातील ७० पैकी १६ जागा भरलेल्सा असून ५४ जागा रिक्त आहेत. यात रोपमळा मदनिसांच्या ६, शिपायांच्या ४० जागा रिक्त आहेत. तालुका बीजगुणन केंद्रातील मजुरांच्या ८ जागा रिक्त आहेत.

सुट्टीच्या दिवशीही कामकाज
कामे प्रलंबीत राहू नयेत म्हणून अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात कामकाज करतात. शनिवार व रविवारलाही कामात व्यस्त असतात. रिक्त पदांमुळे शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे.

एका सहाय्यकाकडे तीन साज्यांचा प्रभार
थेट योजनांवर काम व प्रकल्पांचे संचालन, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम कृषी सहाय्यक करतात. परंतु रिक्त पदांमुळे दोन ते तीन साज्यांचा प्रभार सांभाळतांना त्यांची दमछाक होते.





 

Krushi Vibhag Bharti 2023 – The Municipal Union is continuously pursuing that 121 vacant posts of Senior Field Worker, Pest Collector, Report Bearer at the establishment of Pesticide Department should be filled up immediately by promotion. But it is being ignored by the Mumbai Municipal Corporation. Due to this, the concerned workers are suffering financial and social loss. Keeping this in mind, the posts should be filled before the onset of monsoon i.e. by June 15, otherwise the Municipal Union has warned of intense agitation from June 16.

 

किटकनाशक विभागाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता, कीटक संकलक, प्रतिवेदन वाहक यांची रिक्त असलेली १२१ पदे पदोन्नतीने तात्काळ भरण्यात यावीत, याबाबत दि म्युनिसिपल युनियन सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र त्याकडे मुंबई महानगरपालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित कामगारांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पावसाळा सुरु होण्यापूर्वी म्हणजेच १५ जूनपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, अन्यथा १६ जूनपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दि म्युनिसिपल युनियनने दिला आहे.

 

वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता, कीटक संकलक, प्रतिवेदन वाहक या संवर्गाची सर्व पदे पावसाळ्यापूर्वी भरण्यात येतील, असे किटकनाशक अधिकारी यांनी आश्वासन दिले होते. परंतु दोन महिन्याहून अधिककाळ होऊन देखील तसेच पावसाळा तोंडावर आला असताना देखील या पदावर कामगारांना पदोन्नती देण्यात आलेली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झालेला आहे. हा असंतोषाचा उद्रेक कोणत्याही क्षणी होईल आणि नाईलाजाने तसे झाल्यास ऐनपावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीस आणि त्यामुळे मुंबईच्या नागरीकांना होणाऱ्या त्रासास प्रशासन जबाबदार राहील, याकडे संघटनेने प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधलेले आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता, कीटक संकलक, प्रतिवेदन वाहक यांची रिक्त पदे १५ जून २०२३ पूर्वी पदोन्नतीने न भरल्यास १६ जून २०२३ पासून किटकनाशक अधिकारी यांच्या अधिपत्याखालील सर्व कामगार प्रखर आंदोलन करतील, असा इशारा दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी दिला आहे.


Krushi Vibhag Bharti 2023 – More than 50 percent of posts are vacant in the office of Agriculture Superintendent of Ratnagiri district, which is a traditional paddy farming, foreign exchange earning mango-cashew plantation area. Out of 788 labor posts, 323 posts are filled and 465 posts are vacant. Even in the recent transfers, new officers and employees have not been appointed. With the upcoming kharif season, the question has arisen as to how to run the cart of the agriculture department in the future.

 

पारंपरिक पद्धतीने केली जाणारी भातशेती, परकीय चलन देणारे आंबा-काजू बागायतीचे क्षेत्र असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याचा गाडा हाकणाऱ्या कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयात ५० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. ७८८ मजूर पदांपैकी ३२३ पदे भरलेली असून ४६५ पदे रिक्त आहेत. नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्येही नवीन अधिकारी, कर्मचारी नियुक्त झालेले नाही. येत्या खरीप हंगामासह भविष्यात कृषी विभागाचा गाडा कसा चालवायचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. खरीप हंगाम जवळ आला असल्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्रात्यक्षिके, बांधावर खतांचे वितरण, शेतकऱ्यांना भात बियाणे उपलब्ध करून देणे, विम्याचा लाभांश देण्यासाठी प्रयत्न, नुकसान झालेल्या भागांचा सर्व्हे, कीड-रोग पसरलेल्या भागात शेतकऱ्यांना मार्गदर्शन यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठका, मंत्र्यांना द्यावे लागणारे अहवाल अशा बाबींची पूर्तता करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. काही दिवसांपूर्वी कृषी विभागातील राज्यस्तरावरील बदल्या झाल्या. त्यामध्ये परजिल्ह्यातून रत्नागिरीतील रिक्त पदांवर नियुक्त्या होतील अशी आशा होती; परंतु एकही नवीन अधिकारी आलेला नाही.

 

जिल्ह्यात कृषी उपसंचालक, कृषी विकास अधिकारी, प्रकल्प उपसंचालक आत्मा १ व २, उपविभागीय कृषी अधिकारी रत्नागिरी, उपविभागीय कृषी अधिकारी चिपळूण अशी एकूण सहा पद रिक्त असतानाही एकही अधिकारी दाखल न झाल्याने प्रभारींवरच अवलंबून राहावे लागणार आहे. डोंगराळ प्रदेश असल्याने अधिकाऱ्यांना गावागावात भेटी देण्यासाठी तारांबळ उडते. तालुका कृषी अधिकाऱ्यांची पाच पद रिक्त असल्यामुळे सध्या प्रभारींवरच सर्व भार आहे. कृषी विभागामध्ये कृषी सहायक हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांवर तोडगा काढणाऱ्या या अधिकाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. ३६३ पैकी १७७ पदे भरलेली आहेत. १८६ पदे रिक्त असल्यामुळे कृषी विभागाची मोठीच पंचाईत झाली आहे. याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

 


Krushi Vibhag Bharti 2023Maharashtra Government Agriculture Department Sangli has published a recruitment notification for the vacant post of “District Resource Person”. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 29th of May 2023. Scheme guidelines, application forms, detailed eligibility remuneration (honorary), and other terms and conditions are available in the office of District Superintendent Agriculture Officer Sangli. Also available on the central government’s official website pmfme.mofpi.gov.in. More details are as follows:-

Krushi Vibhag Sangli Bharti 2023

आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना ‘पाठपुरावा/ हाताळणी सहाय्य देण्यासाठी जिल्हा संसाधन व्यक्तींची (DRP) निवड करावयाची आहे. त्यासाठी सदर योजनेच्या मार्गदर्शक सुचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदाकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जाहिरात प्रसिद्धी पासून २९/०५/२०२३ पर्यंत राहील. योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना, सविस्तर पात्रता पारिश्रमिक (मानधन) व इतर अटी व शर्ती या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली यांचे कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच केंद्र शासन अधिकृत संकेतस्थळ https://pmfme.mofpi.gov.in/ यावर सुद्धा उपलब्ध आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावजिल्हा संसाधन व्यक्ती
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – सांगली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सांगली यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली-मिरज रोड, सांगली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मे 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in

Educational Qualification For Krushi Vibhag Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जिल्हा संसाधन व्यक्ती  १. नामांकीत राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय व विद्यापीठ / संस्थाकडून संसाधन अन्न तंत्रज्ञान / कृषि अभियांत्रिकी मधील पदव्युत्तर / पदवी व्यक्ती

२. कृषि व कृषि संबंधित पदव्युत्तर पदवी इ. (DRP)

३. इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर / पदवी इ.

प्राधान्यक्रम :

अ) सेवानिवृत्त बँक/ शासकीय अधिकारी / सनदी लेखापाल हमी अन्न सुरक्षा | (CA) / सल्लागार संस्था (Consultancy Firm ) / बँक व्यवस्थापन यासाठी सल्ला अधिकारी / बँक मित्र / वैयक्तिक व्यवसाईक व्यक्ती / विमा देण्यासंदर्भातील ३ ते प्रतिनिधी वर्षाचा अनुभव तसेच

ब) विद्यापीठ / संस्था यांचेकडील अन्न तंत्रज्ञान / कृषि अभियांत्रिकी सविस्तर प्रकल्प आर- मधील पदव्युत्तर / पदवीधर इ.

क) कृषि व कृषि संबंधित पदव्युत्तर / पदवीधारक इ.

ड) इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर/पदवीधारक इ.

How To Apply For Department of Agriculture Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर बंद लिफाफ्यात पाठवावे.
  • सदर पदाकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जाहिरात प्रसिद्धी पासून २९/०५/२०२३ पर्यंत राहील. योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना, सविस्तर पात्रता पारिश्रमिक (मानधन) व इतर अटी व शर्ती या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली यांचे कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच केंद्र शासन अधिकृत संकेतस्थळ https://pmfme.mofpi.gov.in/ यावर सुद्धा उपलब्ध आहेत.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 मे 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Instructions For Maharashtra Agriculture Department Recruitment 2023

  1.  सदर पदासाठी मुलाखत घेतली जाणार आहे.
  2. वेळेनंतर आल्यास त्यांच्या मुलाखतीचा विचार केला जाणार नाही. 
  3. ज्यांना कामाचा अभव आहे त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. 
  4. निवड झाल्यानंतर संसाधन व्यक्ती यांनी कमीत कमी २ प्रस्ताव हे डी.एल.सी. कडे मंजुरीसाठी पाठवणे बंधनकारक आहे.
  5. मानधन तत्वावर तात्पुरती नेमणूक केली जाईल. 
  6. काम समाधानकारक नसल्यास आपली निवड रदद्द करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत. ६. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी काम करण्याची तयारी असावी.
  7. निवड झालेल्या जिल्हा संसाधन व्यक्ती यांना या योजनेंतर्गत ऑनलाइन / ऑफलाईन प्रशिक्षण दिले जाईल. 
  8. शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यास अर्ज करता येणार नाही.
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Krushi Vibhag Sangli Recruitment 2023 – Eligibility Criteria

Krushi Vibhag Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Krushi Vibhag Bharti 2023 | krishi.maharashtra.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात  https://shorturl.at/gjMW2
✅ अधिकृत वेबसाईट I
krishi.maharashtra.gov.in
✅ अधिकृत वेबसाईट II
pmfme.mofpi.gov.in

Agriculture Assistant Bharti Exam Update

Krushi Vibhag Bharti 2023: The Agriculture Minister had clarified that action will be taken within 15 days to fill the posts of Agricultural Assistant in the state. However, as there is still no movement in this regard, the candidates for these posts are waiting. They are asking when this recruitment advertisement will come. Know More details about Krushi Sahayak Bharti Update at below :

राज्यात कृषी सहायकाची पदे भरण्याबाबत १५ दिवसात कार्यवाही केली जाईल, असे विधी मंडळाच्या अधिवेशनादरम्यान कृषिमंत्र्यांनी  स्पष्ट केले होते. मात्र, अद्यापही याबाबत काही हालचाली दिसत नसल्याने या पदांसाठीचे उमेदवार प्रतीक्षेत थांबलेले आहेत. या नोकरभरतीची जाहिरात कधी येईल याबाबत विचारणा करीत आहेत. कृषी विभाग परीक्षेचे संपूर्ण स्वरूप व अभ्यासक्रम येथे तपासा  तसेच कृषी विभाग अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर सोडवून बघावे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कृषी खात्यात कृषी सहायकाची नोकरभरती अनेक दिवसांपासून झालेली नसल्याने कृषी पदवीधर परीक्षार्थी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. गेल्या काळात झालेल्या विधी मंडळाच्या अधिवेशनात विधान परिषद सदस्य आ. सतीश चव्हाण यांनी प्रश्नोत्तरामध्ये कृषी सहायक पदभरतीबाबत प्रश्‍न विचारला होता.

याला उत्तर देताना तेंव्हा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी १५ दिवसात जाहिरात प्रसिद्ध करू असे सांगितले होते. यानंतर आता दीड महिना लोटला आहे. अद्यापही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही, असे कृषी परीक्षार्थी सांगत आहेत.

राज्यातील हजारो कृषी पदविका व कृषी पदवीधारक परीक्षार्थी जाहिरातीच्या प्रतिक्षेत आहेत. मंत्र्यांनी तातडीने जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत सूचना द्यावी अशी मागणी परीक्षार्थी करीत आहेत.

आधीच कृषी विभागात सहायकांची पदे रिक्त असल्याने फिल्डवर योजना राबवताना अडचणी येत आहेत. अनेक कृषी सहायकांकडे पदभारांचे ओझे वाढलेले आहे. यामुळे कार्यरत कृषी सहायकही कंटाळले. तर दुसरीकडे नोकर भरती झालेली नसल्याने या परीक्षेसाठी तयारी करीत असलेले परीक्षार्थी प्रतिक्षा करून थकले आहेत.

पदभरतीसाठी सातत्याने मागणी तसेच पाठपुरावा केला जात आहे. विधी मंडळ अधिवेशनात मंत्र्यांनी १५ दिवसात जाहिरात निघेल असे स्पष्ट केल्यानंतर या परीक्षार्थ्यांमध्ये एकच आनंदाचे वातावरण बनले होते. दरम्यानच्या काळात परीक्षार्थी दररोज जाहिरातीची प्रतीक्षा करीत राहिले.

मात्र, अद्यापही जाहिरातीचा पत्ता नसल्याने पदभरतीचे घोडे नेमके कुठे अडले याचीच चर्चा आता त्यांच्यात होत आहे.याबाबत कुठल्याही स्तरावर परीक्षार्थ्यांना स्पष्टीकरणही मिळत नसल्याने गोची आणखी वाढलेली आहे. तातडीने पदभरती व्हावी यासाठी हे उमेदवार मागणी करीत आहेत.


Krushi Vibhag Bharti 2023 New Update

Krushi Vibhag Bharti 2023 : Mr. Sattar gave instructions to check the fertilizers and pesticides by the bharari team to prevent the farmers from getting in the way and also to take strict action to check the malpractices by taking care that bogus seeds from outside states do not come into our district. The Agriculture Minister also said that action will be taken soon to fill 80 percent posts in the Agriculture Department.

गेल्या अनेक वर्षांपासून कृषी विभागातील मनुष्यबळाचा प्रश्न आहे. कृषी विभागाच्या कामकाजाची व्याप्ती लक्षात घेता कृषी विभागातील ८० टक्के पदे भरण्याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल असे सांगतानाच शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला कांदाचाळ देण्याबाबतही धोरण निश्चित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.. कृषी विभाग परीक्षेचे संपूर्ण स्वरूप व अभ्यासक्रम येथे तपासा  तसेच कृषी विभाग अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर सोडवून बघावे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Krushi Vibhag Jalgaon Bharti 2023 | कृषी विभाग जळगाव अंतर्गत एकूण ५९५ पदे रिक्त; एक हजार ७१ पदे मंजूर

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात विभागस्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठक कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, महाबीजचे कार्यकारी संचालक सचिन कलंत्री, कृषी संचालक कैलास मोते, कृषी केली. संचालक दिलीप झेंडे, कृषी संचालक विकास पाटील, कृषी संचालक सुभाष नागरे, कृषी संचालक दशरथ तांबळे, रवींद्र भोसले, उपायुक्त रमेश काळे, संजय काटकर, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक पुणे रफिक नाईकवाडी, विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.

कृषी विभागातील टक्के पदे ८० भरण्याबाबत लवकरच कार्यवाही
यावेळी कृषिमंत्र्यांनी खरीप हंगामाचा आढावा घेतानाच कृषी विभागातील प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा केली. तत्पूर्वी खरीप हंगाम तयारी बैठकीत एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी कृषी विभागाने काटेकोरपणे नियोजन करताना खते व बियाणे उपलब्धता संदर्भात ग्रामसभेच्या माध्यमातून माहिती देण्यासोबत बियाण्यांची उगवण क्षमता तपासून त्याबाबत मार्गदर्शन करावे अशी सूचना केली. दरम्यान, शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये यासाठी खते, कीटकनाशके यांची भरारी पथकाद्वारे तपासणी करावी तसेच बाहेरील राज्यातील बोगस बियाणे आपल्या जिल्ह्यात येणार नाही याबाबत दक्षता घेऊन गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना सत्तार यांनी यावेळी दिल्या. कृषी विभागातील टक्के पदे ८० भरण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असेही कृषिमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

‘मागेल त्याला शेततळे या योजनेप्रमाणे कांदाचाळ बाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येणार आहे. कृषी विभागाने जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना पीक फेरपालट पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


Previous Update

www.krishi.maharashtra.gov.in recruitment

सुमारे ६० टक्याहून अधिक पदे रिक्त आहेत. यात उपविभागीय कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), व सात ते आठ तालुका कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे कृषी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. जिल्हा कृषी विभागातील पदे तात्काळ भरण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधिंनी ही पदे भरण्या संदर्भात सध्या सुरु असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून सदर पदे त्वरीत भरावीत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. जळगाव जिल्हा केळी, कापूस, या पिकासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या दशकात केळी पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. या संदर्भात तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावी पणे व्हावी यासाठी कृषी विभागातील कर्मचारी संख्या पुर्ण असणे आवश्यक आहे.

Krushi Vibhag Bharti 2023 Maharashtra – District Wise

कृषि विभाग नागपूर भरती 2023 – 113 पदे

कृषी विभाग अमरावती भरती 2023 – 109 पदे

कृषी विभाग पुणे भरती 2023 – 112 पदे

कृषी विभाग नाशिक भरती 2023 – 96 पदे

कृषी विभाग, औरंगाबाद भरती 2023 – 69 पदे

कृषी विभाग, ठाणे भरती 2023 – 79 पदे

कृषी विभाग, कोल्हापूर भरती 2023 – 82 पदे

कृषी विभाग, लातूर भरती 2023 – 99 पदे

तालुका कृषी अधिकारी – १ (१), कृषी अधिकारी – ४ (०), कृषीपर्यवेक्षक -७ (६). कृषी सहायक ३७ (२१), कृषी सहायक अधिक्षक – १(१), वरिष्ठ लिपीक – १ (०), लिपिक – ४ (३), अनुरेखक – ५ (५), वाहन चालक – १ (१), शिपाई – ६ (४), असे ६७ मंजुर पदे असतांना एकुण ४२ पदे रिक्त आहे.

रिक्त पदांचा आढावा
जिल्ह्यात तीन उपविभागीय कृषी अधिकारी पदे आहेत यात पाचोरा येथील पद रिक्त आहे. तसेच जिल्ह्या साठी प्रकल्प संचालक (आत्मा) हे पद रिक्त आहे. जिल्हयातील १५ तालुक्यांपैकी निम्या तालुक्यात यात रावेर, यावल, जामनेर, भुसावळ, चोपडा सह सहा, सात तालुक्यातील कृषी अधिकारी पद रिक्त आहे.

रावेर येथील हे पद चार, पाच वर्षा पासून रिक्त आहे. तसेच कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, सहायक अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक, अनुरेखक, वाहन चालक, शिपाई यांच्या जागा रिक्त आहेत. योजनांविषयी मार्गदर्शन मिळत नाही. कृषी अधिकारी अभावी शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत प्रशासनाने दखल घ्यायला हवी.

 


Previous Update –

कृषी विभागात तब्बल 91 पदे रिक्त; जाणून घ्या सविस्तर माहिती | Krushi Vibhag Bharti 2023

Krushi Vibhag Bharti 2022: There are a total of 91 Vacant posts at the Head and Taluka Offices of the Agriculture Department. The posts in the agriculture department have been lying vacant for several months. Krushi Vibhag Recruitment will be soon. Further details are as follows:-

केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जाणाऱ्या योजनांमधील दुवा असणाऱ्या कृषी विभागाच्या मुख्य व तालुका कार्यालयातील एकूण ९१ पदे रिक्त आहेत. काम करणारी यंत्रणा तोकडी असल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामांची धुरा आल्याने ते तणावाखाली असल्याचे समोर आले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

Krushi Vibhag Maharashtra Bharti 2023 Details

? Name of Department Department Of Agriculture Government Of Maharashtra
? Recruitment Details Krushi Vibhag Recruitment 2023
? Name of Posts Krushi Paryaveksha
? No of Posts
? Job Location Thane
✍? Application Mode Offline
✉️ Address  District Superintendent, Agriculture Officer, Thane
✅ Official WebSite krishi.maharashtra.gov.in

Educational Qualification For Krushi Vibhag Maharashtra Recruitment 2022

Resource Person  Any suitable person/ Retired Officer/ Graduate/ Diploma (Read Complete Details)

Maharashtra Krushi Vibhag Recruitment 2022 – Vacancy Details

Resource Person 

All Important Dates | krishi.maharashtra.gov.i Recruitment 2022

⏰ Last Date  4th Of July 2022

 

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

17 Comments
  1. MahaBharti says

    Online Application Started From 6th April 2023

  2. MahaBharti says

    Krushi Vibhag Bharti 2023 Online Application Form

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड