Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

करवीर तालुक्यात शिक्षकांची तब्बल 219 पदं रिक्त ! – Kolhapur Shikshak Bharti 2023

Kolhapur Sikshan Sevak Bharti 2023

Kolhapur Shikshak Bharti 2023 Update

Kolhapur Shikshak Bharti 2023: 98 posts of Principal are sanctioned, out of which 26 posts are vacant. The Principal acts as the head of the office at the school level. At present senior teacher is in charge, due to which the education of students is being neglected. Graduate Teachers 252 posts are sanctioned, out of which 215 are working and 37 are vacant. 842 posts of teachers are sanctioned and 140 posts are vacant. As a total of 219 posts are vacant, the burden of education in the taluka has been lifted.

 

करवीर तालुक्यात १८ केंद्रप्रमुख मंजूर आहेत, त्यापैकी दोन केंद्रप्रमुख कार्यरत असून, १६ जागा रिक्त आहेत. हा अतिरिक्त कार्यभार शिक्षकांकडे दिला आहे. केंद्रस्तरावर १० शाळा असतात, जिल्हा परिषदेचे व शासनाचे शैक्षणिक उपक्रम शाळेपर्यंत पोहोचवण्याचे काम केंद्रप्रमुखांचे असते. केंद्रप्रमुख पद रिक्त असल्यामुळे शासनाच्या शैक्षणिक योजना शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत कशा पोहोचणार? असा प्रश्न आहे. या संदर्भातील अर्ज प्रक्रिया, पूर्ण माहितीसाठी दिलेली पडफ बघावी, तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

करवीर तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. शिक्षकांची तब्बल २१९ पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचा टक्का घसरला आहे. गतवर्षीपेक्षा विद्यार्थ्यांची १७६८ संख्या कमी दिसत आहे. पुन्हा एकदा खासगी इंग्रजी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. याचा आर्थिक फटका पालकांना बसणार आहे.

करवीर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्यावर्षी २८ हजार ६३ विद्यार्थी होते. जूनअखेर ही विद्यार्थी संख्या २६ हजार २९५ आहे. ३१ जुलै पट नोंदणीचा महिना आहे, तर सप्टेंबरला विद्यार्थी संख्या अंतिम धरली जाते. आजच्या घडीला १७६८ विद्यार्थी संख्या कमी राहिली आहे. विद्यार्थ्यांचा टक्का घसरण्याचे मुख्य कारण शिक्षकांची पदे रिक्त असणे हेच आहे.

मुख्याध्यापकांची ९८ पदे मंजूर

मुख्याध्यापकांची ९८ पदे मंजूर आहेत, यापैकी २६ पदे रिक्त आहेत. शाळास्तरावरचे कार्यालय प्रमुख म्हणून मुख्याध्यापक काम करतात. सध्या ज्येष्ठ अध्यापक हा पदभार सांभाळतो, यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. पदवीधर शिक्षक २५२ पदे मंजूर आहेत, यापैकी २१५ कार्यरत असून ३७ पदे रिक्त आहेत. अध्यापक ८४२ पदे मंजूर असून १४० पदे रिक्त आहेत. एकूण २१९ पदे रिक्त असल्यामुळे तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे.

पदे रिक्त
पदवीधर शिक्षक रिक्त पदेः ३७
अध्यापक शिक्षक रिक्त पदेः १४०
मुख्याध्यापक रिक्त पदेः २६
केंद्रप्रमुख रिक्त पदेः १६,
दरवर्षी सेवानिवृत्त शिक्षकः ४०

‘राज्य व जिल्हास्तरावर रोस्टरनुसार भरतीचे नियोजन सुरू आहे. अध्यापनाचे काम सुरळीत असून विद्यार्थ्यांच्यात शिक्षणाची गुणवत्ता टिकविली आहे. दोन महिन्यात विद्यार्थ्यांची संख्या वाढेल.

समरजीत पाटील, गटशिक्षणाधिकारी

 


Kolhapur Shikshak Bharti 2023 – Kolhapur Sikshan Sevak Bharti 2023 –  Under Zilla Parishad Cess Fund Scheme Year 2023 – 2024 for payment of remuneration of teaching volunteers in Zilla Parishad Primary/Higher Primary Schools on a temporary basis and for appointment within the limit of Rs.5000/- per month. 00,000/- has been approved vide Zilla Parishad General Meeting dated 24/03/2023.

 

उपरोक्त संदर्भिय विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, कोल्हापूर जिल्हयांतर्गत शिक्षकांची पदे मोठया प्रमाणात रिक्त असल्यामुळे स्थानिक पातळीवरुन वारंवार शिक्षक उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी असुन शिक्षकाची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. करीता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हिताचे दृष्टीने जिल्हा परिषद सेस फंडातुन शिक्षकांची आवश्यकता असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक/ उच्च प्राथमिक शाळामध्ये जिल्हा परिषद द्वारा ठरवून दिलेल्या अटी व शर्तीचे अधिन राहून गट शिक्षणाधिकारी यांचे सनियंत्रणाखाली संबंधित शाळा व्यवस्थापन समितीचे माध्यमातुन र.रु.५०००/- प्रति महिना या मर्यादेमध्ये तात्पुरत्या स्वरुपात शिक्षण स्वयंसेवकांची नेमणूक करण्याबाबत योजना प्रस्तावित करण्यात आलेली आहे. त्यास मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची अतिम मान्यता घ्यावी लागेल. संदर्भ क्रमांक १ ते २ अन्वये जिल्हा परिषद प्राथमिक/उच्च प्राथमिक शाळामध्ये तात्पुरत्या स्वरुपात शिक्षण स्वयंसेवकांचे मानधन अदा करण्याकरीता तसेच रु.५०००/- प्रति महिना या मर्यादेमध्ये नेमणूक करण्याकरिता जिल्हा परिषद सेस फंड योजना सन २०२३ – २०२४ अंतर्गत ३ शिक्षण, २२०२ शिक्षण या योजनांमधुन जिल्हा परिषदेसाठी तरतुद रु.२०,००,०००/- एवढी सुधारीत तरतुदीस जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा दिनांक २४/०३/२०२३ अन्वये मान्यता दिलेली आहे. 

या संदर्भातील अर्ज प्रक्रिया, पूर्ण माहितीसाठी दिलेली पडफ बघावी, तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पूर्ण GR आणि अर्ज प्रक्रिया पहा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड