लष्करात असे व्हा भरती

Join Indian Army

भारतीय लष्करातील भरतीसाठी स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. लष्करातील सर्व पदांची भरती या विभागामार्फतच होत असते. कर्तव्य, साहस आणि अभिमान याचा एकत्रित अनुभव घेतानाच देशसेवा साधण्याची संधी लष्करी सेवेतून मिळते. आज (१५ जानेवारी) देशभर साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘लष्कर दिना’निमित्त लष्करात भरती होण्यासाठीच्या पात्रता निकषांची माहिती.

  • अधिक माहितीसाठी वेबसाइट www.joinindianarmy.nic.in
  • कनिष्ठ अधिकारी (जेसीओ) व सैनिक (अदर रँक्स)

पद वय पात्रतेचे निकष

सैनिक (जनरल ड्युटी-ऑल आर्म्स) १७.६ ते २१ एकूण ४५, तर प्रत्येक विषयात ३३ टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण

सैनिक (तांत्रिक) १७.६ ते २३ एकूण ५० टक्के, तर प्रत्येक विषयात किमान ४० टक्के गुणांसह विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स व इंग्रजी विषयांसह)

सैनिक (तांत्रिक, एव्हिएशन, अॅम्युनिशन एक्झामिनर)

सैनिक निशस्त्र (आर्मी मेडिकल कोअर, व्हेट) १७.६ ते २३ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी व इंग्रजी विषयांसह एकूण ५० व प्रत्येक विषयात ४० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण

सैनिक क्लार्क, स्टोअर कीपर तांत्रिक (ऑल आर्म्स) १७.६ ते २३ कोणत्याही शाखेतून एकूण ६० टक्के व प्रत्येक विषयात किमान ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण (इंग्रजी व गणित, अकाउंट्स किंवा बुक किपिंगमध्ये ५० टक्के गुण आवश्यक)

शिपाई (फार्मा) १९ ते २५ वर्षे बारावीनंतर किमान ५५ टक्के गुणांसह फार्मसी डिप्लोमा उत्तीर्ण. संबंधित राज्यातील फार्मसी कौन्सिल किंवा फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणी असणे आवश्यक. किमान ५० टक्के गुणांसह बी. फार्म उत्तीर्ण व राज्य किंवा केंद्रीय फार्मसी कौन्सिलकडे नोंदणी केलेले उमेदवारही पात्र.

सैनिक ट्रेड्समन (ऑल आर्म्स) १७.६ ते २३ दहावी उत्तीर्ण. प्रत्येक विषयात किमान ३३ टक्के गुण ‌आवश्यक.

सैनिक ट्रेड्समन (ऑल आर्म्स) १७.६ ते २३ मोतद्दार, हाउस कीपर व मेस कीपरसाठी आठवी उत्तीर्ण. किमान ३३ टक्के गुणांसह आठवी उत्तीर्ण

हवालदार (सर्व्हेयर, ऑटोमेटेड कार्टोग्राफर, इंजिनीअर्स) २०-२५ गणित विषयासह बीए अथवा बीएस्सी उत्तीर्ण. बारावीतही गणित व विज्ञान विषय असणे बंधनकारक.

कनिष्ठ अधिकारी (रिलिजियस टीचर्स-ऑल आर्म्स) २७ ते ३४ वर्षे कोणत्याही शाखेची पदवी. आपल्या धर्माशी संबंधित कुठलेही शिक्षण फायद्याचे.

कनिष्ठ अधिकारी (केटरिंग-आर्मी सर्व्हिस कोअर) २१ ते २७ बारावी उत्तीर्ण किंवा किमान एक वर्ष किंवा अधिक कालावधीचा कुकरी किंवा हॉटेल मॅनेजमेंट-केटरिंग अभ्यासक्रम (एयआयसीटीई संलग्न संस्थेतूनच) पूर्ण केलेला असणे आवश्यक.

हवालदार एज्युकेशन (आर्मी एज्युकेशन कोअर) २० ते २५ वर्षे ग्रुप एक्स- एमए, एमएस्सी, एमसीए किंवा बीए, बीएस्सी, बीसीए, बीएस्सी (आयटी), बीटेक यापैकी कोणतीही पदवी व बी. एड

ग्रुप वाय – बीए, बीएस्सी, बीसीए, बीएस्सी (आयटी), बीई, बीटेक यापैकी कोणतीही पदवी

अधिकारी

एनडीए (पुणे) १६.६ ते १९.६ बारावी किंवा बारावी समकक्ष परीक्षा उत्तीर्ण (लष्करासाठी), तर नौदल व हवाई दलासाठी मॅथ्स व फिजिक्स विषय आवश्यक

बारावी (टेक्निकल एंट्री स्कीम) १६.६ ते १९.६ अर्ज करण्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथ्स विषयांसह बारावी उत्तीर्ण व एकूण ७० टक्के गुण आवश्यक

ओटीए, गया

इंडियन मिलिटरी अॅकॅडमी (डायरेक्ट एंट्री) १९ ते २४ कोणत्याही सरकारमान्य विद्यापीठाची पदवी (डेहराडून)

शॉर्ट सर्व्हिस कमिशन (अतांत्रिक)(पुरूष व महिला) ओटीए-चेन्नई १९ ते २५ कोणत्याही सरकारमान्य विद्यापीठाची पदवी

नॅशनल कॅडेट कोअर (एनसीसी) (स्पेशल एंट्री) ओटीए चेन्नई १९ ते २५ कोणत्याही सरकारमान्य विद्यापीठाची पदवी

शॉर्ट सर्व्हिस कमिशन (जज अॅडव्होकेट जनरल) पुरूष व महिला ओटीए चेन्नई २१ ते २७ पदवीनंतर ५५ टक्के गुणांसह एलएलबी किंवा बारावीनंतर कायद्याचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम उत्तीर्ण. सनद मिळण्यास पात्र.

टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (टीजीसी) ओटीए, चेन्नई २० ते २७ इंजिनीअरिंग अथवा बी.टेक पदवी (विशिष्ट विद्याशाखा)

शॉर्ट सर्व्हिस कमिशन (तांत्रिक) पुरूष व महिला ओटीए, चेन्नई २० ते २७ इंजिनीअरिंग अथवा बी. टेक पदवी (विशिष्ट विद्याशाखा)

आर्मी एज्युकेशन कोअर आयएमए, डेहराडून २३ ते २७ मान्यताप्राप्त विद्यापीठातून पहिल्या अथवा दुसऱ्या वर्गात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण

सौर्स : मटा

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Santosh says

    Sangli talati result

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप