Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ITI च्या विद्यार्थ्यांना मिळाली रोजगाराची संधी!

ITI Students Get Employment Opportunities

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळाली रोजगाराची संधी; कुशल मनुष्यबळाला कंपन्यांकडून मागणी

लॉकडाऊनच्या काळात हजारो हात बेरोजगार झाले. त्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आयटीआयवाल्यांना लॉकडाऊनमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. उद्योगनगरीतील २५ कंपन्यांनी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, म्हणून महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे (आयटीआय) विचारणा केली आहे. त्यानुसार संबंधित कंपन्यांना दोन हजार प्रशिक्षित कामगारांबाबत आयटीआयकडून माहिती देण्यात आली असून, त्यातील शेकडो विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे.

ITI Jobs

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोरवाडी व कासारवाडी येथे आयटीआय आहे. या दोन्ही आयटीआयच्या माध्यमातून २० व्यवसायांचे (ट्रेड) अभ्यासक्रम व प्रशिक्षण दिले जाते. यातील नऊ ट्रेड एक वर्षाचे तर उर्वरित ११ ट्रेडचा कालावधी दोन वर्षांचा आहे. मोरवाडीतील आयटीआयमध्ये १४ ट्रेड असून त्यासाठी ७८४ तर कासारवाडी येथील महिला आयटीआयमध्ये सहा ट्रेड असून ११० प्रशिक्षणार्थ्यांना अशा ८९४ जणांना दरवर्षी प्रवेश दिला जातो. यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शहर व परिसरातील औद्योगिक आस्थापनांमध्ये संधी उपलब्ध होत आहेत. शिक्षकांचे व्हॉटसअप ग्रुप आहेत. कोणत्या कंपनीत पदभरती आहे, त्यांचे वेतन, सुविधा कोणत्या ट्रेडसाठी संधी आहेत याबाबत माहिती या ग्रुपवरून दिली जाते. त्यामुळे संबंधित प्रशिक्षणार्थी कंपनीकडे संपर्क साधतात.

कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रतिनिधी आयटीआयकडे संपर्क साधतात. त्यांच्या आवश्यकतेनुसार कुशल मनुष्यबळाची माहिती आयटीआयकडून त्यांना दिली जाते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्याचे नाव, त्याचा ट्रेड, संपर्क क्रमांक आदी माहिती उपलब्ध करून देण्यात येते. त्यानंतर संबंधित कंपनीकडून थेट प्रशिक्षणार्थ्याशु संपर्क साधला जातो. त्यानंतर पदभरतीची प्रक्रिया सुरू केली जाते.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही आस्थापनांनी पदभरतीची माहिती देऊन मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, म्हणून आयटीआयकडे विचारणा केली. यात सूक्ष्म, लघू उद्योग तसेच राष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. या माध्यमातून प्रशिक्षणार्थीना रोजगार संधी मिळत आहेत.

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
  1. Ajay damale says

    Iti 10th

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड