जळगाव । जिल्हा बॅंकेच्या २२० लिपीकपदांच्या भरतीसाठी मुलाखतीस प्रारंभ

Interview for Recruitment of 220 Clerk Posts

जिल्हा बॅंकेच्या 220 लिपीकपदांच्या भरतीसाठी आज पासून मुलाखतीस प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आज 50 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सन 1987 नंतर ही प्रथमच भरती प्रक्रिया होत आहे. विशेष राज्यात प्रथमच या “इन कॅमेरा’मुलाखती होत आहेत. जिल्हा बॅंकेत गेल्या अनेक वर्षांपासून पदे रिक्त आहेत. मात्र, त्याला मंजूरी मिळत नव्हती. युती सरकारच्या काळात ही पदे भरण्यास मंजूरी देण्यात आली. पहिल्या टप्प्यात लिपीकांची 220 पदे भरण्यास मंजूरी देण्यात आली होती.

शासनाच्या मंजुरीनंतर जिल्हा बॅंकेने प्रक्रिया सुरू केली. लेखी परिक्षेसाठी शासनमान्य कंपनीला मक्ता देण्यात आला. जाहिरातीव्दारे आलेल्या ऑनलाईन अर्जातून लेखी परिक्षा घेण्यात आली. त्यात 68 उमेदवारपात्र ठरले. 14-1 मुलाखतीस बॅंकेतर्फे आता उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. बॅंकेच्या अध्यक्ष जिल्हा उपनिबंधक, बॅंकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख या मुलाखती “इन कॅमेरा’ होत आहेत. दहा गुणांची ही परिक्षा आहे. पात्र उमेदवारांची अंतीम यादी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लावण्यात येणार आहे.

सोर्स : AM News


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप