Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी तटरक्षक दलात भरती!

Indian Coast Guard Recruitment 2021

Indian Coast Guard Recruitment 2021 : Indian Coast Guard Bharti: दहावी, बारावी उत्तीर्णांना केंद्र सरकारी नोकरीची संधी आहे. भारतीय तटरक्षक दलात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. नाविक (DB, GD) आणि यांत्रिक पदे भरली जाणार आहेत. भारतीय तटरक्षक दलाचे अधिकृत संकेतस्थळ joincoastguard.cdac.in वर या भरती संदर्भातील विस्तृत माहिती उपलब्ध आहे आणि ऑनलाइन अर्जांची लिंकही उपलब्ध आहे.

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 358 पदांची भरती

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

इंडियन कोस्टगार्ड रिक्रुटमेंट २०२१ ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ५ जानेवारीपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अखेरची मुदत १९ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. एकूण ३५८ पदांसाठी भारतीय तटरक्षक दलाने ही भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

रिक्त पदांची माहिती

  • – नाविक (जनरल ड्यूटी) – २६० पदे
  • – नाविक (डोमेस्टिक ब्रांच) – ५० पदे
  • – यांत्रिक (मेकॅनिकल) – ३१ पदे
  • – यांत्रिक ( इलेक्ट्रिकल) – ७ पदे
  • – यांत्रिक (इलेक्ट्रोनिक्स) – १० पदे

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज प्रक्रियेला सुरुवात – ५ जानेवारी २०२१
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत – १९ जानेवारी २०२१ सायंकाळी ६ वाजेपर्यंत
  • ई अॅडमिट कार्डाचं प्रिंट घेण्याची तारीख – पहिल्या टप्प्यातील परीक्षेच्या दहा दिवस आधी
  • नाविक आणि यांत्रिक भरतीसाठी स्टेज – १ – मार्च २०२१ चा मध्य किंवा अखेर परीक्षेच्या संभाव्य तारखा
  • नाविक आणि यांत्रिक भरतीसाठी स्टेज – २ परीक्षेच्या संभाव्य तारखा – एप्रिल २०२१ चा मध्य किंवा अखेर
  • भरतीसाठी स्टेज – ३ आणि ४ परीक्षेच्या संभाव्य तारखा – ऑगस्ट २०२१ च्या सुरुवातीला
  • नाविक भरती (DB) स्टेज ३ आणि ४ परीक्षेच्या संभाव्य तारखा – ऑक्टोबर २०२१ च्या सुरुवातीला
  • निकालाची संभाव्य तारीख – २० दिवसांच्या आत स्टेज १ चा निकाल
  • नाविक आणि यांत्रिक भरती प्रशिक्षणाची तारीख – ऑगस्ट २०२१
  • नाविक (GD) भरती प्रशिक्षणाची तारीख – ऑक्टोबर २०२१

Indian Coast Guard Recruitment 2020 : Indian Coast Guard Navik (DB) Recruitment 2020:Indian Coast Guard Navik (DB) Recruitment 2020: भारतीय तटरक्षक दलाने नाविक भरती प्रक्रियेला आजपासून सुरूवात केली आहे. ०१/२०२१ बॅचसाठी ही भरती होती आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे, ते joinindiancoastguard.gov.in या तटरक्षक दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्र सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. भारतीय तटरक्षक दलात भरतीसाठी नोटिफिकेशन निघाले आहे. तटरक्षक दलाच्या देशांतर्गत शाखेत ही भरती होणार आहे.

या भरतीविषयीची अधिक माहिती या वृत्तात देत आहोत. सोबतच वृत्ताच्या अखेरीस नोटिफिकेशनची लिंकही देत आहोत. किती पदे, अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार याबाबत सविस्तरपणे जाणून घ्या.

कुक आणि स्टिवर्ड पदांसाठी ही भरती होत आहे. Navik (DB) 01/2021 बॅचसाठी ही भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे. साधारणपणे ५० जागा रिक्त आहेत.




ज्या उमेदवारांना भारतीय तटरक्षक दलाच्या नाविक (DB) पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे, त्यांनी तटरक्षक दलाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती जाणून घ्यावी. joinindiancoastguard.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांना तपशीलवार माहिती मिळेल.

अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२० पासून सुरुवात होत आहे. ७ डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज करता येणार आहेत. परीक्षेचे अॅडमिट कार्ड १९ ते २५ डिसेंबर २०२० या कालावधीत उपलब्ध केले जाईल.

शैक्षणिक पात्रता

किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण (एससी / एसटी उमेदवारांना ५ टक्के सवलत) आणि राज्यांतर्गत किंवा राष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही खेळात १ ते ३ पर्यंतचा रँक मिळालेला असावा.

कामाचे स्वरुप

स्वयंपाकी (कुक) मेनूनुसार शाकाहारी, मांसाहारी पदार्थ तयार करणे. याव्यतिरिक्त अतिरिक्त कामेदेखील दिली जातील.

स्टीवर्ड पदाच्या व्यक्तीने वेटरप्रमाणे पदार्थ सर्व्ह करणे, हाऊसकिपींग, वाइन, अन्य वस्तूंची हाताळणी, फंड मेंटेनन्स करणे अपेक्षित आहे.



वयोमर्यादा

१ एप्रिल २०२१ रोजी १८ ते २२ वर्षे वय पूर्ण असावे. (आरक्षित प्रवर्गां कमाल वयोमर्यादेत सवलत लागू.)

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा ..-https://mahabharti.in/indian-coast-guard-bharti-2020/

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Sk mali says

    Age is 17 years

  2. Tukaram sawale says

    Maharashtra Che mukhyamantri Kon aahe…

  3. करण गणेश शिंदे says

    जॉब

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड