Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

१० वी उत्तीर्ण व पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी – लष्करात निघाली भरती

Indian Army Recruitment 2020 Vacancy

Indian Army Recruitment 2020 Vacancy : गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थाही अडचणीत सापडली आहे. अनेक कंपन्यांचा व्यवसाय बंद असल्यानं त्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिलेला आहेत. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केलेली आहे. पण अशा संकटाच्या काळातही आपल्याला लष्करात नोकरीची संधी मिळत आहे. जर आपण 10 वी, अभियांत्रिकी (BE/BTech) केली असेल किंवा अंतिम वर्षात असाल तर आपल्याला भारतीय लष्करात (Indian Army) दाखल होण्याची संधी मिळणार आहे. सैनिक सामान्य कर्तव्य (महिला सैन्य पोलिस) व टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी (TGC 132) भारतीय सैन्याने रिक्त जागा भरण्यासाठी भरती काढली आहे. लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वरही माहिती देण्यात आली आहे. या रिक्त जागांवर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या बातमीमध्ये त्याची आवश्यक माहिती, नोटिसा आणि अधिकृत वेबसाइट दिलेल्या आहेत.

Indian Army Recruitment

रिक्त पदांच तपशील – Vacancy Details

  • सैनिक सामान्य कर्तव्य (महिला सैन्य पोलिस) – 99 पदे
  • टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी (TGC 132) – 40 पदे

अर्ज माहिती – Application Details

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख
    • सैनिक सामान्य कर्तव्य (महिला सैन्य पोलिस) – 31-08-2020 आहे.
    • टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी (TGC 132) – 26-08-2020 आहे.

नोकरीसाठी काय आवश्यक?

टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी (TGC 132) – संबंधित प्रवाहात किंवा पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षामध्ये अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असावी. आपण अंतिम वर्षात असल्यास पदवी कोर्स सुरू झाल्याच्या 12 आठवड्यांच्या आत पदवी सादर करावी लागणार आहे. उमेदवारांचे वय 20 ते 27 वर्षांच्यादरम्यान असावे. आपल्याला नियमानुसार सूट मिळण्याचा लाभ मिळेल. ही रिक्त जागा अविवाहित पुरुषांसाठी आहे.

सैनिक सामान्य कर्तव्य (महिला सैन्य पोलिस) – मॅट्रिक / दहावी / एसएसएलसी किंवा सर्व विषयांमध्ये किमान 45% गुणांसह समकक्ष आणि किमान 33% गुण अनिवार्य आहेत. जाहीर झालेल्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १ 17 वर्षे व जास्तीत जास्त वय २१ वर्षे निश्चित केले जावे. उमेदवारांचा जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान असावा.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा – https://mahabharti.in/indian-army-recruitment-2020/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. Sunil says

    सर माझी उंची 162cm आहे आणि 10वि पास आहे मला पोलिस भारतीय stopsalection मधे job मिळेल का

  2. प्रवीण कांबळे says

    मला रोजगार हवाई

  3. Sharad chougule says

    सर पण या लिंकमध्ये आपण दिलेले आहे की appaly online पण ते होत नाही ती लिंक ओपन केलं की वेगळंच काहीतरी येतंय पण online form येत नाही applay करण्यासाठी

  4. Pruthviraj Patil says

    Army bharti and police bharti kadi ahi

  5. Durga damodhar shejul says

    भरती कोठे होईल

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड