१२ वी परीक्षा २०२० वेळापत्रक

HSC Time Table 2020

१२ वी परीक्षा वेळापत्रक २०२० – महाराष्ट्र राज्यात बारावीची परीक्षा दिनांक १८ फेब्रुवारी २०२० पासून होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत १२ वी ची परीक्षा घेण्यात येत आहे.

दहावी आणि बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहवी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार दहावीची लेखी परीक्षा ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० या दरम्यान होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा १८ फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे.

HSC Time Table 2020  – १२ वी परीक्षेचे वेळापत्रकाही सविस्तर माहिती मंडळाच्या  www.mahasscboard.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर आहे. उच्च माध्यमिक परीक्षा प्रमाणपत्र बारावी ची लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्र मंगळवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेच्या वेळापत्रकानुसार १२ वी ची लेखी परीक्षा दिनांक १८ फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२० या कालावधीत घेण्यात येत आहे.

कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांनी अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतून विद्यार्थ्यांच्या मनावरचे ताण कमी होण्याच्या दृष्टीने मार्च २०२० चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळेत कळविण्यात येईल.

सादर वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पाठवण्यात यावे.. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही.मंडळाच्या संकेतस्थळावरील सुविधा फक्त माहितीसाठी देण्यात अली आहे.

ज्युनिअर कॉलेज आणि त्यानंतर उच्च माध्यमिक शाळा स्तरावर नवे नियम लागू करण्यात आले आहेत. बारावीची अंतिम परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत असेल. या परीक्षेत किमान 25% बहुपर्यायी/वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश करण्यात येणार आहे.

परीक्षेपूर्वी माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळा यांचेकडे देण्यात आलेले वेळापत्रक हे अंतिम वेळापत्रक असेल. विद्यार्थ्यांनी छापील वेळापत्रकावरुन परीक्षेच्या तारखांची माहिती काळजीपूर्वक खात्री करून घ्यावी. विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रनेणे छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये तसेच व्हॉट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.

उपरोक्त बाबत समबंधितांनी नोंद घ्यावी.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Maroti hendre says
  2. Durgesh says

    १२ वी परीक्षा वेळापत्रक २०२०

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप