उज्जैनी आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेवेला कुलूप

Health department face issues due to lack of medical officers

वैद्यकीय अधिकारी नसल्याने आरोग्य विभाग हतबल

वाडा तालुक्यातील उज्जैनी या दुर्गम भागातील आरोग्य उपकेंद्रात रुग्णांना दिली जाणारी आरोग्यसेवा वैद्यकीय अधिकारी नसल्याने खंडित झाली असून आरोग्य विभागाच्या या हतबलतेमुळे येथील आदिवासी रुग्ण संकटात सापडला आहे.

करोना विषाणूच्या नुसत्या नावाने सर्वांनाच सुन्न करून सोडले असून आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मात्र वाड्यातील ग्रामीण भागात अपुऱ्या सोयीसुविधांमुळे आरोग्य यंत्रणेचा उडालेला बोजवारा येथील गोरगरीब आदिवासी रुग्णांच्या जीवावर उठला आहे, असे म्हणावे लागेल. वाड्यातील उज्जैनी हे अतिशय दुर्गम व शहरापासून जवळपास ३५ किमी अंतरावर असलेले गाव असून येथे असलेल्या आरोग्य उपकेंद्रामार्फत अद्याप पाच किमी परिसरातील आखाडा, वडवली, विऱ्हे यासोबत अनेक पाड्यातील रुग्णांना आरोग्य सेवा देणारे एकमेव सरकारी केंद्र आहे. या उपकेंद्राचे ‘आयुष्यमान भारत’ या योजनेतून सुशोभीकरणाचे काम सुरू असले तरी या आरोग्य केंद्रात आरोग्य सेवा देणारा वैद्यकीय अधिकारी गायब आहे.

उज्जैनी हा परिसर अतिशय दुर्गम व डोंगराळ असून सर्प व विंचू दंश नित्याचे आहेत, शिवाय तातडीच्या आरोग्य सेवेसाठी येथील लोकांना १६ किमी अंतरावर असलेल्या परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घ्यावी लावते किंवा जीव धोक्यात घालून वाडा व पुढे ठाणे येथे जावे लागते. या गैरसोयींमुळे आजवर अनेकांना आपला जीव गमवावा लावलेला असून आदिवासी लोकांच्या आरोग्याचे सरकारला काही देणेघेणे नाही, असे येथील लोक संतापाने सांगतात.

तालुक्यातील असनस आणि उज्जैनी येथे वैद्यकीय अधिकारी नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. नवीन भरती होईपर्यंत ही वस्तुस्थिती बदलणे शक्य होईल, असे वाटत नाही, मात्र या ठिकाणी लसीकरण व अन्य सेवा सुरळीत सुरू आहे. तसेच, ‘आयुष्यमान भारत’ योजनेतून लवकरच नवीन डॉक्टर येणे अपेक्षित आहे.

डॉ. संजय बुरपल्ले, तालुका वैद्यकीय अधिकारी

सौर्स : मटा

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप