बुलडाणा, गडचिरोली शाळांसाठी आर्थिक तरतूद

Financial provision for schools in Buldhana, Gadchiroli District

बुलडाणा व गडचिरोली या दोन जिल्ह्यांतील जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्ती व विकासासाठी जिल्हा नियोजन समिती व केंद्र सरकारकडून अनुक्रमे २० कोटी ३६ लाख आणि ११ कोटी ३६ लाखांचा निधी देण्यात आला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर केली.

नागपूर हायकोर्ट असोसिएशनने मागील वर्षी ‘न्यायदूत’ ही योजना राबवली होती. त्या योजनेनुसार, प्रत्येकी दहा वकिलांच्या चमूने गडचिरोली व बुलडाणा या दोन जिल्ह्यांचा दौरा केला होता. त्यात दोन्ही जिल्ह्यांतील शासकीय शाळांची दैनावस्था प्रकर्षाने समोर आली होती. तेव्हा एचसीबीएनेच हायकोर्टात जनहित याचिका दाखल करून त्या दोन जिल्ह्यांतील शाळांच्या देखभाल, दुरुस्ती व विद्यार्थ्यांना आवश्यक पायाभूत सुविधा देण्यासाठी सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती केली.

सदर याचिकेला गांभीर्याने घेताना हायकोर्टाने सरकारला नोटीस बजावून शाळांच्या दुरवस्थेबाबत जाब विचारला होता. त्यानुसार, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिवांनी संपूर्ण राज्यातील शाळांच्या दुरुस्तींबाबतची आर्थिक तरतूदच हायकोर्टात सादर केली. त्यानुसार, सरकारी शाळा व प्रसाधनगृहांच्या दुरुस्तीसाठी यावर्षी २३५ कोटी रुपये खर्चाची योजना मंजुरीसाठी सादर करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षांकरिता १०५ कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि ‘बालभारती’ने ५७ कोटी रुपये दिले आहेत. त्यासोबतच बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांकरिता जिल्हा नियोजन समितीने २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये २० कोटी तर, जिल्हा परिषदेने ६० लाख रुपये दिले. गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांकरिता जिल्हा नियोजन समितीकडून ११ कोटी तर, केंद्र सरकारकडून ३६ लाख रुपये मिळाले आहेत. याशिवाय ऑगस्ट २०१९ मध्ये राज्यात ५८२२ नवीन शिक्षकांची भरती करण्यात आली. त्यातील ३०८ शिक्षक विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये पाठविण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्याला ५९ तर, बुलडाणा जिल्ह्याला १०५ शिक्षक देण्यात आले आहेत. एचसीबीएच्या वतीने अॅड. विजय मोरांडे यांनी बाजू मांडली.

सौर्स : म. टा.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप