नोकरी गेल्यास सरकार 2 वर्ष उचलणार खर्च

खाजगी नोकरधारकांसाठी मोदी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. जर तुमची नोकरी गेली असेल तर केंद्र सरकार 24 महिने म्हणजेच 2 वर्षांपर्यंत पैसे देणार आहे. ही मदत कर्मचारी राज्य बीमा निगमच्या (ESIC) ‘अटल बीमित कल्याण योजनेअंतर्गत (Atal Bimit Vyakti Kalyan Yojana) खाजगी नोकर धारकांना ही मदत केली जाणार आहे. ESICने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

ESICने ट्वीट करत, नोकरी जाणे म्हणजे आर्थिक नुकसान होण्यासारखे आहे, असे सांगितले. त्यामुळे ESICच्या वतीनं नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना सशक्त करण्यासाठी 24 महिने एक ठराविक रक्कम नोकरधारकांच्या बॅंक अकाउंटमध्ये टाकण्यात येणार आहे.

असा करा अर्ज

अटल कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी ESICच्या बेवसाइटवर जाऊन एक फॉर्म डाऊनलोड करावा लागणार आहे. हा फॉर्म भरून तो ESIC कोणत्याही शाखेत जमा करू शकता. या फॉर्मसह 20 रुपयांचा नॉन-ज्‍यूडिशिअल पेपरला नोटरीने एफिडेविड करावे लागेल. यात AB-1पासून AB-4 फॉर्म जमा करावा लागणार आहे. यासठी लवकरच ऑनलाईन सुविधा सुरू करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी www.esic.nic.in या वेबसाईटवर काढू शकता. दरम्यान ही सुविधा मिळवण्यासाठी आधी 2 वर्षांचा रोजगार असणे महत्त्वाचे होते, मात्र आता हा कलावधी 6 महिने करण्यात आला आहे.

कोणाला नाही होणार या योजनेचा फायदा

ESICच्या या नव्या योजनेचा फायदा ज्या कामगारांना कंपनीने बाहेर काढले आहे त्यांना घेता येणार नाही. तसेच, ज्या कामगारांवर न्यायालयात केस चालू आहे, तेही या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही. त्याशिवाय साच्छुक निवृत्ती (VRS) घेणाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार नाही.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप