‘सीएस’साठी आता प्रवेश परीक्षा

Entrance Exam For CS

कंपनी सेक्रेटरी (सीएस) होण्याच्या साखळीतील ‘फाऊंडेशन’ परीक्षेचा टप्पा काढून टाकण्यात येणार असून त्याऐवजी आता सीएस एक्झिक्युटिव्ह देण्यास पात्र होण्यासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेमुळे नऊ महिन्यांची वाट न पाहता उमेदवार लगेच पुढील परीक्षा देऊ शकतील.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ही संस्था घेत असलेल्या कंपनी सेक्रेटरी परीक्षेच्या रचनेत संस्थेने बदल केले आहेत. आतापर्यंत फाऊंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल अशा तीन टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेण्यात येत होती. यापैकी फाऊंडेशन हा टप्पा येत्या परीक्षेपासून रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. फाऊंडेशन परीक्षा बारावी झालेल्या विद्यार्थ्यांनाच द्यावी लागत असे. मात्र आता पदवी, पदव्युत्तर अशी कोणतीही पात्रता असली तरी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांनाच पुढील परीक्षांची दारे उघडणार आहेत. जानेवारी, मे, जुलै आणि नोव्हेंबर अशी वर्षांतून चार वेळा ही प्रवेश परीक्षा घेण्यात येईल. येत्या काळात १० मे रोजी ही परीक्षा होणार असून २० मे रोजी त्याचा निकाल जाहीर होणार आहे.

परीक्षेची रचना : यापूर्वी फाऊंडेशन परीक्षेसाठी बिझिनेस एन्व्हायर्नमेंट अ‍ॅण्ड लॉ, बिझिनेस मॅनेजमेंट, एथिक्स अ‍ॅण्ड इंटरप्रन्युअरशिप, बिझिनेस इकॉनॉमिक्स, फंडामेंटल्स ऑफ अकाऊंटिंग अ‍ॅण्ड ऑडिटिंग असे चार विषय होते. आता प्रवेश परीक्षेसाठी यातील अकाऊंटिंग अ‍ॅण्ड ऑडिटिंग हा विषय कमी करण्यात आला आहे. त्याऐवजी तर्कशास्त्र (लॉजिकल रिझनिंग), ताज्या घडामोडी (करंट अफेअर्स) असे विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार बिझिनेस कम्युनिकेशन, लीगल अ‍ॅप्टिटय़ूड अ‍ॅण्ड लॉजिकल रिझनिंग, इकॉनॉमिक अ‍ॅण्ड बिझिनेस एन्व्हायर्नमेंट, करंट अफेअर्स, प्रेझेंटेशन्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन असे चार विषय असतील. या चार विषयांमध्ये प्रत्येकी ४० गुण आणि एकत्रित ५० टक्के मिळालेले विद्यार्थी एक्झिक्युटिव्ह परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. लेखी आणि तोंडी अशी दोन्ही स्वरूपात ही परीक्षा असेल. लेखी परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न असून त्यासाठी दोन तासांचा अवधी आहे. तोंडी परीक्षेसाठी १५ मिनिटांचा वेळ असेल. तोंडी परीक्षेत दूरचित्रफीत व ध्वनिफितीवरून प्रश्न सोडवावे लागतील.

काय फरक पडणार? : आतापर्यंत फाऊंडेशन परीक्षा आणि त्यानंतर एक्झिक्युटिव्ह परीक्षेमध्ये साधारण नऊ महिन्यांचा कालावधी जात होता. आता प्रवेश परीक्षा आणि पुढील एक्झिक्युटिव्ह परीक्षेची तयारी विद्यार्थी एकाचवेळी करू शकतील. म्हणजेच २० मे रोजी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर त्यात पात्र ठरलेले विद्यार्थी लगेच ३१ मे रोजी एक्झिक्युटिव्ह परीक्षा देऊ शकतील. प्रवेश परीक्षेसाठी बारावी झालेले विद्यार्थीही पात्र ठरतील. त्यानुसार सीएसची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पदवी आणि सीएसाठी एकाच वेळी पात्र होऊ शकतील.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप